भारतीय वंशाच्या नागरिकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आधार घेतला आहे.
ट्रंप यांच्या निवडणूक प्रचार टीमने 107 सेकंदांचा व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींच्या भाषणाचं फुटेज आहे.या व्हीडिओत अहमदाबादमध्ये ट्रंप आणि मोदी यांनी केलेल्या भाषणातील काही क्षण दिसतात. व्हीडिओचं नाव आहे- फोर मोअर इयर्स.
अमेरिकेत यंदा नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका होत आहेत. ट्रंप व्हिक्टरी फायनान्स कमिटीचे अध्यक्ष किंबर्ले ग्युलफ्यॉले यांनी ट्वीटरवर हा व्हीडिओ शेअर करताना म्हटलं आहे की, अमेरिका आणि भारत यांचे संबंध अतिशय सौहादपूर्ण आहेत. आमच्या प्रचाराला अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.ट्रंप यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेची धुरा सांभाळणारे ट्रंप ज्युनियर यांनी हा व्हीडिओ रीट्वीट केला आहे.सोशल मीडियावर हा व्हीडिओ काही सेकंदात व्हायरल झाला आहे. काही सेकंदात 70 हजारहून अधिक जणांनी हा व्हीडिओ पाहिला आहे.
मोदी आणि ट्रंप यांनी याच वर्षी अहमदाबाद इथल्या मोटेरा स्टेडियममध्ये प्रचंड जनसमुदायासमोर भाषण केलं होतं.’नमस्ते ट्रंप’ नावाच्या या कार्यक्रमाला ट्रंप यांच्याबरोबरीने त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रंप, मुलगी इव्हान्का, जावई जेरेड कुश्नर यांच्यासह अनेक महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.व्हीडिओची सुरुवात ह्यूस्टन इथल्या स्टेडियमच्या दृश्यांनी होते. यामध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रंप आणि पंतप्रधान मोदी एकमेकांचा हात धरून चालताना दिसत आहेत. हा गेल्या वर्षी अमेरिकेत झालेला कार्यक्रम आहे. ‘हाऊडी मोदी’ असं या कार्यक्रमाचं नाव होतं.या कार्यक्रमासाठी पन्नास हजारहून अधिक अमेरिकेतील भारतीय जमले होते. अमेरिकेतील भारतीय नागरिकांमध्ये मोदी अतिशय लोकप्रिय आहेत.
America enjoys a great relationship with India and our campaign enjoys great support from Indian Americans! 👍🏻🇺🇸 pic.twitter.com/bkjh6HODev