हिमाचल प्रदेश हा पर्यटनासाठी ओळखला जातो. देवभूमी म्हणून या राज्याचा उल्लेख केला जातो. रावी, ब्यास, चिनाव सारखा समृद्ध नद्या या राज्यातून वाहतात. सफरचंद, नाशपाती, लीची सारखी फळे या राज्याची ओळख आहे. येथील डलहौजी, धर्मशाळा, मनाली, कुल्लू, शिमला सारख्या पर्यटन स्थळांवर वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. आत्तापर्यंत हे पर्यटनच हिमाचल प्रदेशमधील जनतेचे अर्थाजनाचे प्रमुख साधन होते. मात्र आता यात ट्राउट नावाच्या माशाची भर पडली आहे. पिवळ्या गर्द रंगाचा आणि अंगावर ठिपके असलेला हा ट्राउट मासा गोडयापाण्यातील सॅल्मन मासा म्हणून ओळखला जातो. (Trout fish)
सध्या हिमाचल प्रदेशमध्ये या माशाची चांगली निर्मिती होत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये येणा-या पर्यटकांमध्ये परदेशी पर्यंटकांची संख्या अधिक असते. त्यांना हा ट्राउट मासा विशेष आवडत असून पंचतारांकित हॉटेल ते अगदी धाब्यावरही या माशाला मागणी वाढती आहे. पण ही मागणी पूर्ण करत आता हा हिमाचल प्रदेशचा ट्राउट मासा देशभरातील हॉटेलमध्ये पाठवला जात आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशच्या आर्थिक नियोजनात या माशाला महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. हिमाचल प्रदेश हे समृद्ध राज्य आहे. या भागात मोठ्याप्रमाणात शेती होते. मात्र आता मत्स शेतीही वाढली आहे. यात ट्राउट माशाची मत्सशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. (Social News)
हिमाचल प्रदेशात ट्राउट माशांच्या उत्पादनात दरवर्षी वाढ होत आहे. 2023-24 मध्ये हिमाचल प्रदेशमधील ट्राउट माशाच्या उप्तादनात नवा विक्रम झाला आहे. येथे 1 हजार 388 मेट्रिक टनांच्याही पुढे हे ट्राउट मासे तयार झाले आहेत. फक्त मासे तयार झाले आहेत असे नाही, तर या माशांना मागणीही मोठी वाढली आहे. 2022-23 मध्ये ट्राउट माशांचे उत्पादन 1 हजार 170.50 मेट्रिक टन होते. राज्यसरकारही या मत्स शेतीला पाठिंबा देत असून हिमाचल प्रदेशला या ट्राउट माशांच्या शेतीमुळे नवी ओळख मिळाली आहे. ट्राउट हा गोड्या पाण्यात होणारा मासा आहे. ट्राउटचा सॅल्मन या खाद्यप्रेमींमध्ये लोकप्रिय असलेल्या माशाबरोबर अगदी जवळचा संबंध आहे. मोठ्या तळ्यात या माशांचे उत्पादन केले जाते. त्यांची निगराणीही फारशी करावी लागत नाही. (Trout fish)
त्यामुळे हिमाचलप्रदेशमध्ये मोठ्या शेतीतळ्यांमध्ये या ट्राउट माशांचे अतिरिक्त उत्पादन घेतले जात आहे. हिमाचल प्रदेश, दिल्ली, चंदीगढ येथील पंचतारांकित हॉटेल्समध्येही ट्राउटला मोठी मागणी आहे. याशिवाय हिमाचल प्रदेशमध्ये येणारे पर्यटक आवर्जून या ट्राउट माशाची मागणी करतात. त्यामुळे वर्षाचे बाराही महिने ट्राउट मासा विकला जातो. या माशाला मिळणारी वाढती मागणी आणि त्याच्यामुळे समृद्ध होत असलेली अर्थव्यवस्था पाहून राज्यसरकारनंही प्रत्येक जिल्ह्यात ट्राउट माशाच्या मत्सशेतीसाठी प्रशिक्षण केंद्र चालू केले आहेत. कुल्लू, सिरमौर, शिमला, चंबा, किन्नौर येथे ट्राउट माशांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होतेच, शिवाय या भागात ट्राउटची मत्सशेती कशी करावी याचे प्रशिक्षणही दिले जात आहे. या माशाला चांगला भाव मिळत असल्यामुळे हिमाचल प्रदेशातील हजारो कुटुंबे आपल्या उदरनिर्वाहासाठी मत्स्यपालनावर अवलंबून आहेत. (Social News)
ट्राउट मासा हा थंड पाण्यात अधिक चांगला वाढतो. हिमाचलप्रदेशमधील थंड वातावरण हे या माशाला पोषक ठरले आहे. छोट्या तलावातही या माशांचे उत्पादन घेतले जाऊ शकते, त्यामुळे हिमाचल प्रदेशमधील शेतकरही या मत्सशेतीचे प्रशिक्षण घेत आहेत. हिमाचल प्रदेशमधील निसर्ग हा अदभूत आहे. मात्र अनेकवेळा हाच निसर्ग येथील जनजीवनास अडथळा ठरतो. वादळी पावसामुळे अनेकवेळा फळांच्या शेतीला नुकसान होते. मात्र अशी कुठलीही शक्यता ट्राउट माशाच्या उत्पादनात येत नाही. (Trout fish)
======
हे देखील वाचा : अलिगढचे लड्डूगोपाल
======
कितीही पाऊस झाला तरी त्याचा या माशाच्या वाढीवर परिणाम होत नाही. त्यामुळेच हा ठिपक्यांची नक्षी असलेला मासा सर्वाधिक लोकप्रिय ठरला आहे. शिवाय ट्राउट मासा हा अनेक प्रथिनांनी युक्तही असतो. त्यात ओमेगा -3 फॅटी ऍसिड, नियासिन आणि व्हिटॅमिन बी 12 याचे पुरेसे प्रमाण असते. हा मासा अत्यंत कमी साधनसामुग्रीत तयार करता येतो. हिमाचल प्रदेशमधील पंचतारांकित हॉटेल ते सध्या धाब्यापर्यंत सर्वत्रच हेच ट्राउट मासे विक्रीस असतात. याच माशांनी आता हिमाचल प्रदेशची अर्थव्यवस्था अधिक भक्कम करायला सुरुवात केली आहे. (Social News)
सई बने