भारतीय रेल्वे कायम या ना त्या कारणांमुळे चर्चेमध्ये असते. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वच लोकांचे प्रवासाचे आवडते साधन म्हणून रेल्वेची विशेष ओळख आहे. भारतीय रेल्वे जगातील चौथे आणि आशियातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. या भारतीय रेल्वेतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. संपूर्ण भारतामध्ये रेल्वेचे मोठे जाळे पसरलेले आपल्याला पाहायला मिळते. भारतातील कोणत्याही ठिकाणावरून आपल्याला रेल्वेने प्रवास करता येतो. प्रवासी वाहतुकीशिवाय मालवाहतुकीमध्ये देखील रेल्वेची महत्त्वाची भूमिका आहे. (Train)
मात्र जेव्हा तुम्ही रेल्वेने प्रवास करता तेव्हा कधी एक निरीक्षण केले आहे का? रेल्वेच्या कोचचे रंग वेगवेगळे असतात. कधी कधी संपूर्ण ट्रेन एकाच रंगाची असते तर कधी एकाच ट्रेनला विविध रंगाचे कोच लावले जातात. मग असे का असते? रेल्वेकडे ज्या रंगाचा कोच आहे तोच ते जोडतात का? की छान वाटावे, हटके काहीतरी दिसावे यासाठी असे असते? का अजून काही वेगळे कारण आहे? का रल्वेच्या कोचचे रंग असे वेगळे असतात? आज या लेखात आपण याबद्दलच जाणून घेऊया. (Marathi Top News)
रेल्वनेच्या कोचचे विविध रंग हे डिझाइन किंवा आवड म्हणून नसतात. त्यामागे एक अर्थ आणि एक मोठा विचार असतो. प्रत्येक रेल्वेनेनुसार तिला हे विविध रंगाचे कोच जोडले जातात. रेल्वेच्या डब्ब्यांचा रंग आणि डिझाईन वेगवेगळे असते. या रंग आणि डिझाईन मागे काही कारणं असतात. रेल्वेत वेगवेगळ्या रंगाचे कोच विविध श्रेणींसाठी वापरले जातात. तर डब्ब्यांचा रंग ट्रेनचा वेगही दर्शवतो. ट्रेनचा स्पीड काय असेल हे तिला जोडलेल्या कोचच्या रंगावरुन कळते. वेगळ्या रंगांवरून रेल्वेची ओळख असते. (Marathi Latest News)
१. निळ्या रंगाचे कोच
आपण जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, ट्रेनमध्ये सर्वाधिक निळ्या रंगाचे कोच असतात. या कोचला ICF म्हणतात म्हणजे इंटीग्रल कोच फॅक्टरी असे म्हणतात. याचा कारखाना तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये आहे. निळ्या रंगाचे कोच हे एक्सप्रेस किंवा सुपरफास्ट ट्रेनमध्ये असतात. या कोचला एअर ब्रेक असतात. तसेच हे कोच लोह असून ११० किमी ताशी वेगासाठी बनलेले असतात. (MArathi News)
२. लाल रंगाचे कोच
लाल रंगाच्या कोचला LHB म्हणजे Linke Hofmann Busch म्हटले जाते. सन २००० मध्ये जर्मनीमधून हे कोच भारतात आणले गेले. हे कोच बनवण्याची फॅक्टरी पंजाबच्या कपूरथलामध्ये आहे. लाल रंगाचे डबे स्टेनलेस स्टीलचे बनलेले असतात जे निळ्या रंगाच्या डब्यांपेक्षा हलके असतात. या कोचचा वेग ताशी २०० किलोमीटरपर्यंत आहे. हे लाल रंगाचे कोच राजधानी आणि शताब्दी सारख्या गाड्यांमध्ये असे लाल डबे बसवण्यात आले आहेत जेणेकरून ते अधिक वेगाने पळतील. (Social News)
३. हिरव्या रंगाचे कोच
लाल आणि निळ्या डब्यांव्यतिरिक्त, तुम्ही काही गाड्यांमध्ये हिरवे डबे देखील पाहिले असतील. गरीब रथ सारख्या गाड्यांमध्ये हिरव्या रंगाचे डबे वापरले जातात. वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनसाठी वेगवेगळ्या रंगाचे ट्रेनचे डबे वापरले जातात.
इंटिग्रल कोच फॅक्टरी
इंटिग्रल कोच फॅक्टरीचा कारखाना तमिळनाडूतील चेन्नईमध्ये आहे. तिथे निळ्या रंगाचे कोच बनवले जातात. या कारखान्याची स्थापना स्वातंत्र्यानंतर १९९५ मध्ये झाली. तेव्हापासून येथे ट्रेनचे कोच तयार केले जात आहेत. निळ्या रंगाचे डबे लोखंडापासून बनवलेले असतात आणि त्यामध्ये एअर ब्रेक्सचा वापर केला जातो. या प्रकारच्या कोचमध्ये स्लीपर क्लाससाठी ७२ सीट्स असतात तर एसी-३ क्लासमध्ये ६४ सीट्स असतात. इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये बनवलेल्या डब्यांना १८ महिन्यांतून एकदा पिरीयॉडिक ओव्हरहॉलिंगची (POH) गरज असते. त्यामुळे त्यांच्या देखभालीसाठी अधिक खर्च येतो. त्यांचा रायडर इंडेक्स 3.25 असतो आणि ते ड्युअल बफर सिस्टीमद्वारे एकमेकांना जोडलेले असतात. परिणामी, अपघातात हे डबे एकमेकांवर चढण्याचा धोका असतो. (Top Stories)
============
हे देखील वाचा : Railway : रेल्वे स्टेशन होणार हायटेक; मिळणार एयरपोर्ट सारखी डिजिटल लाऊंज सुविधा
============
लिंक हॉफमन बुश
लिंक हॉफमन बुश हे डबे २००० साली जर्मनीहून भारतात आणले गेले. हे डबे बनवण्याची फॅक्टरी पंजाबमधील कपूरथला येथे आहे. हे लाल रंगाचे डबे स्टेनलेस स्टीलपासून बनलेले असतात आणि त्यात डिस्क ब्रेक वापरले जातात. या डब्यांना २४ महिन्यांतून एकदा ओव्हरहॉलिंगची गरज असते त्यामुळे त्यांच्या देखभालीचा खर्च कमी असतो. त्यांचा रायडर इंडेक्स २.५ ते २.७५ आहे. त्यांचा मॅक्सिमम पर्मिसिबल स्पीड ताशी २०० किलोमीटर असतो आणि ऑपरेशनल स्पीड ताशी १६० किलोमीटर असतो. या डब्यांच्या स्लीपर क्लासमध्ये ८० सीट्स असतात तर एसी-३ क्लासमध्ये ७२ सीट्स असतात. (Marathi Update)
कोणत्या रंगाचा कोच सुरक्षित?
लिंक हॉफमन बुश कोच इंटिग्रल कोच फॅक्टरी डब्यांपेक्षा चांगले आहेत. एलएचबी डबे हे आयसीएफ डब्यांपेक्षा १.७ मीटर लांब असतात, म्हणून त्यामध्ये बसण्याची जागा जास्त असते. लाल रंगाच्या एलएचबी कोचचा वेगही जास्त असतो. याशिवाय ते डबे स्टेनलेस स्टीलचे बनलेले असल्यामुळे हलके असतात. अपघात झाला तरी निळ्या रंगाच्या डब्यांपेक्षा लाल रंगाचे डबे अधिक सुरक्षित असतात.