आज शुक्रवार, २६ डिसेंबर २०२५. आजची तिथी शुक्ल षष्ठी असून, नक्षत्र शततारका आहे. आजच्या दिवसातील अमृतकाळ ०८:२९ ते ०९:५१ पर्यंत असून, राहूकाळ हा ११:१४ ते १२:३६ पर्यंत असेल. आजच्या दिवशी सुर्योदय ०७:०७ सकाळी वाजता होईल तर सुर्यास्त ०६:०६ सायंकाळी वाजता होईल. आजच्या दिवसाचे बारा राशींचे राशिभविष्य जाणून घेऊया.
मेष
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. नशिबाची साथ तुम्हाला मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना सदस्यांची नाराजी ओढवून घेऊ नका. परदेशात जाण्याचे प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल. आज तुम्हाला एखादे नवीन काम मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विशेषतः व्यापार-व्यवसाय करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे. नोकरीत पदोन्नती संभवते. कार्यालयात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
मिथुन
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल, ज्यामुळे तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्यात यश मिळेल.
कर्क
मुलांच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या योजना आखाल. आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवा. घर नूतनीकरणाचे काम आज सुरू करू शकता.
सिंह
आज तुमच्या कौटुंबिक जीवनात चढ-उतार येतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी काही मोठे बदल होऊ शकतात. कुटुंबाबद्दल तुम्ही निश्चिंत असाल. आजचा दिवस चांगला सुरू होईल. मित्र किंवा कुटुंबासोबत तुमचे चांगले प्रवास होतील.

कन्या
कन्या राशीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आत्मविश्वास मजबूत राहील आणि आजूबाजूला सकारात्मकता जाणवेल. एखाद्या खास व्यक्तीसोबत चांगले सामंजस्य निर्माण होईल. एकंदरीत आजचा दिवस उत्साहवर्धक आणि समाधान देणारा आहे.
तूळ
आज कौटुंबिक वाद संपुष्टात येतील. तुम्हाला कुटुंबाची साथ नक्की मिळेल त्यामुळे धीर सोडू नका आणि येणाऱ्या कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना करा. आज नशिबाची साथ तुम्हाला मिळेल.
वृश्चिक
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. एखाद्या खास व्यक्तीला भेटून तुमचे प्रलंबित काम पूर्ण होईल. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मनास यातना होतील. स्थावर संपत्ती व वाहन इत्यादींच्या व्यवहाराशी निगडित कागदपत्रावर सही करताना सावध राहा.
धनु
काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर जात असल्यासारख्या वाटू शकतात. मानसिक ताण आणि चिंता जाणवू शकते. प्रभावशाली व्यक्तींच्या गाठीभेटीमुळे तुमच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होईल.
मकर
आजचा दिवस फारसा चांगला जाणार नाही. तुम्हाला कुटुंबाची साथ मिळेल. नोकरीत तुमची कामगिरी उत्तम राहील. आजचा दिवस कामाच्या क्षेत्रात फायदेशीर ठरेल.
कुंभ
प्रेमसंबंधातील जुने तणाव निवळतील. जोडीदाराशी जवळीक वाढेल. अनोळखी व्यक्तींवर अतिविश्वास ठेवणे आर्थिक नुकसानीला कारणीभूत ठरु शकते. व्यापारी वर्गाला चांगले फळ मिळेल ज्यामुळे धनलाभाचे योग बनतील.
मीन
शरीर स्वास्थ्य बिघडेल. नोकरी करणाऱ्या लोकांची देखील वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य मिळत राहील.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
