Home » पोट कमी करण्यासाठीचे काही उपाय

पोट कमी करण्यासाठीचे काही उपाय

by Jyotsna Kulkarni
0 comment
Remedies For Reducing Belly Fat
Share

आजच्या काळात आरोग्याची सर्वात मोठी समस्या ठरत आहे, वाढणारे वजन. प्रत्येक व्यक्तीलाच तिच्या वाढणाऱ्या वजनाचा प्रश्न सतावत आहे. कोणाचे विशिष्ट आजारामुळे वजन वाढते, कोणाचे प्रेग्नन्सीनंतर वजन वाढते, तर कोणाला अगदी सुरुवातीपासूनची ही समस्या असते. कारणं कोणतेपण असो समस्या एकच आहे. वजन कमी करण्यासाठी आपण पाहिले तर अनेक उपाय, औषधं, व्यायाम प्रकार पाहायला मिळतात. कधी कधी तर अनेक उपाय करूनही वजन कमी होत नाही. (Remedies For Reducing Belly Fat)

अनेकदा आपण पाहिले तर बैठ्या जीवनशैलीमुळे प्रत्येक व्यक्तीचेच वजन वाढताना दिसत आहे. वाढलेले पोट जास्त डोकेदुखी ठरत आहे. हे पोट कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. या लटकलेल्या पोटाला सहजासहजी कमी करणे सोपे नाही.

आपण पाहिले तर लोकं म्हणतात वजन नंतर कमी झाले तरी चालेल मात्र पोट कमी झाले पाहिजे. पोट कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करताना लोकांना पाहिले आहे. मात्र तरीही फरक पडत नाही. अशावेळेस तुम्ही खालील व्यायाम प्रकार आणि उपाय केले तर तुम्हाला नक्कीच फायदा होऊन तुमचे लटकणारे पोट कमी होऊ शकते.

सायकल क्रंच :

जमिनीवर पाठीवर झोपून, हात डोक्याच्या मागे ठेवा. उजवा गुडघा छातीजवळ वरच्या दिशेने वाकवा आणि डावा पाय सरळ ठेवा. शरीराचा वरचा भाग अशा प्रकारे वर करा की डाव्या कोपरचा उजव्या गुडघ्याला स्पर्श होईल. आता काही सेकंद थांबा आणि नंतर दुसऱ्या गुडघा आणि कोपराने असेच करा. हा एक सोपा व्यायाम असून, तुम्ही हा व्यायाम घरात देखील करु शकता. याकरता तुम्हाला जास्त वेळ देखील लागणार नाही.

फ्लटर किक :

फ्लटर किक हा देखील एक सोपा व्यायाम आहे. यासाठी जमिनीवर सरळ झोपा. शरीराच्या अनुषंगाने तळवे ताणा. आता दोन्ही पाय ४५ अंशांपर्यंत वर करा आणि १० सेकंद धरुन ठेवा. आता पाय खाली आणा.

Remedies For Reducing Belly Fat

सिट-अप :

हा पण सोपा व्यायाम प्रकार आहे. जमिनीवर सरळ झोपा, गुडघे थोडेसे वाकवून आता धडाचा भाग जमिनीपासून थोडा वर आणा आणि हातांनी गुडघ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. काही सेकंद धरुन ठेवा आणि ही प्रक्रिया पुन्हा करा.

कार्डिओ :

कार्डिओ एक्सरसाइजसाठी तुम्ही चालणे, जॉगिंग, पोहणे, सायकलिंग करू शकता. याचा थेट परिणाम शरीरातील चरबीवर होतो आणि ते कमी होण्यास मदत होते. यासोबतच बेली फॅटचे स्नायूही कमकुवत होतात. जे कमी करणे सोपे करते.

नौकासन :

नौकासन आणि व्ही सिटअप्स हे समान व्यायाम आहेत. यामध्ये पाय आणि कंबर अशा प्रकारे वाकलेली असते की शरीर V चा आकार घेतो. हा व्यायाम दररोज ३ च्या सेटमध्ये केल्याने बेली फॅटचे मसल्स बर्न होण्यास मदत होते.

जर तुम्हाला व्यायाम न करता वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करायचे असतील तर तुम्ही त्यासाठी खालील उपाय करू शकतात.

  • साखरेमुळे वजन मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. खासकरून पोटाची चरबी जास्त वेगाने वाढते. त्यासाठी साखर खाणे बंद केले किंवा कमी केले तर तुम्हीच तुमच्या शरीरातील बदल अनुभवाल. तुमच्या शरीरात जास्त ऊर्जा निर्माण होऊन तुम्हाला कमी थकवा जाणवेल. आणि पोटाची चरबी देखील कमी होईल.
  • वजन कमी करण्यात आणि पोटाची चरबी कमी करण्यास पाणी अतिशय मदत करते. भरपूर पाणी प्यायले तर तुमची भूक कमी करण्यास, शरीरातील चरबी जाळण्यास मदत करू शकते. पाणी जास्त प्यायल्यामुळे चयापचय क्रिया देखील वाढून सुरळीत होते. वजन कमी करण्यासाठी दररोज किमान 2 ते 4 लिटर पाणी प्यावे असा सल्ला तज्ञ देतात.
======
हे देखील वाचा : ‘या’ घरगुती गोष्टींचे सेवन थायरॉइड नियंत्रणात आणू शकतो
======
  • व्हिटॅमिन सीने समृद्ध अन्न आणि फळं खाल्ली तर त्यामुळे देखील पोट कमी होऊ शकते. व्हिटॅमिन सी तुम्हाला शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करेल, ते चयापचय वाढविण्यात मदत करते. त्यामुळे पचन आणि आतड्याच्या निगा राखली जाणून त्यांचे काम योग्य पद्धतीने चालते.
  • दररोज सकाळी एक कप डिटॉक्स ज्यूस पोटाची चरबी कमी करण्यास मदत करू शकते. सोबतच सकाळी हर्बल चहा पिणे हा देखील पोटाची चरबी कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे.

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.