Home » यशोदा मातेच्या मंदिराची परदेशातही ख्याती…

यशोदा मातेच्या मंदिराची परदेशातही ख्याती…

by Team Gajawaja
0 comment
Temple of Yashoda Mata
Share

देशभरात कृष्ण जन्मसोहळा उत्साहात साजरा करण्यात येत आहे.  फक्त भारताताच नव्हे तर परदेशातही भगवान श्रीकृष्ण जन्मसोहळा (Temple of Yashoda Mata)  साजरा होतो.  आज जगभरात श्रीकृष्णाची मंदिरे आहेत.  मात्र भगवान श्रीकृष्णाची माता असलेल्या यशोदेचे मंदिर कुठे आहे, याची आपल्याला माहिती आहे का?  भगवान श्रीकृष्णाची माता असलेल्या यशोदेचे मंदिर मध्यप्रदेशमधील इंदौर येथे आहे.  जवळपास अडीचशे वर्ष जुने असलेल्या या मंदिरात यशोदा मातेची पूजा करण्यासाठी देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही भाविक येतात.  विशेष करुन ज्यांना मुल होत नाही, असे भाविक या यशोदा मातेच्या मंदिरात येतात. माता यशोदेचा आशीर्वाद घेतल्यावर मुल झालेल्या माता पुन्हा माता यशोदेच्या चरणी लीन होण्यासाठी या मंदिरात गर्दी करतात. एरवी वर्षाचे सर्व दिवस या यशोदा मातेच्या मंदिरात (Temple of Yashoda Mata) भक्तांची गर्दी असते.  विशेष करुन विवाहित महिलांची या मंदिरात गर्दी असते. मात्र जन्माष्टमीच्या सोहळ्यासाठी या मंदिरात जवळपास आठवडाभर उत्सव साजरा करण्यात येतो.  या उत्साहादरम्यान माता यशोदेचा चेहरा हा नेहमीपेक्षा आनंदी दिसतो, अशी भक्तांची धारणा आहे. या प्रसन्न यशोदा मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी भक्तांची गर्दी झाली आहे.  

मध्यप्रदेशमधील इंदौरमध्ये यशोदा मातेचे मंदिर (Temple of Yashoda Mata) अडीचशे वर्ष जुने असल्याची माहिती आहे.  इंदौरच्या प्रसिद्ध राजबाडाजवळील खजुरी बाजारात हे यशोदा मातेचे मंदिर आहे.  या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, येथे भगवान कृष्ण माता यशोदाच्या कुशीत विराजमान आहेत.  माता यशोदेच्या कुशीमध्ये बाळरुपात भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेता येते.  या मंदिरात भगवान श्रीकृष्णाच्या आधी, त्यांची माता, यशोदा हिची पूजा करण्यात येते. अपत्यप्राप्तीसाठी परदेशातूनही मोठ्या प्रमाणात महिला या मंदिरात येतात, आणि माता यशोदेची मनोभावे पूजा करतात.  

भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात (Temple of Yashoda Mata) जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. मात्र या माता यशोदेच्या मंदिरात कृष्ण जन्माष्टमीच्या दुस-या दिवशी मोठा उत्सव साजरा करण्यात येतो.  अपत्यप्राप्तीसाठी देवाची आशीर्वाद घेण्यासाठी आलेल्या महिलांसोबत माता यशोदेच्या आशीर्वादानं ज्यांना बाळ होणार आहे, अशा महिलाही येथे गर्दी करतात.  माता यशोदेच्या मंदिरात (Temple of Yashoda Mata) महिलांचे डोहाळजेवण करण्यात येते. महिला माता यशोदेची ओटी भरुन तिचा आशीर्वाद घेतात.  महिला माता यशोदेची पूजा करुन बाळ श्रीकृष्णाला जायफळाचा हार घालतात. असे केल्यानं होणा-या बाळाचे आयुष्य आरोग्यदायी असते अशी भावना आहे.  या मंदिरात श्रीकृष्णाचे संपूर्ण कुटुंब पाहता येते.  माता यशोदा आणि बाळ श्रीकृष्णासोबत नंद बाबा आणि त्यांच्या सर्व कुटुंबाच्याही मुर्ती आहेत.  तर मंदिराच्या दुस-या भागात श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत घेऊन उभे असल्याचे दाखवण्यात आले आहे.  यावेळी भगवान श्रीकृष्णासोबत (Temple of Yashoda Mata) देवी राधाही आहे.  भगवान श्रीकृष्णाच्या मातेचे आणि देवाच्या सर्व कुटुंबाचे हे असे एकमेव मंदिर असल्याची माहिती आहे.  

==========

हे देखील वाचा : भर श्रावण महिन्यातही बंद असणारे शिवमंदिर

==========

या माता यशोदा मंदिरात (Temple of Yashoda Mata) श्रीकृष्ण जन्मानंतरचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो.  या दिवशी मंदिरात माता यशोदेला स्नान घातले जाते. मातेला नवे वस्त्र आणि अलंकार घालून तिची पूजा करण्यासाठी येते.  या सोहळ्यासाठी मोठ्याप्रमाणात महिलांची गर्दी असते.  महिला पारंपारिक गाणी गाऊन माता यशोदेचे अभिनंदन करतात.  बाळ श्रीकृष्णासाठीही गाणी म्हटली जातात.  माता यशोदेची प्रसुती होऊन बाळ श्रीकृष्णाचा जन्म झाल्याचा देखावा साकारण्यात येतो.  यानंतर मातेची आरती होते.  यावेळी मोठा होमही करण्यात येतो.  बाळ श्रीकृष्णाच्या गुणांचे गौरव करणारी गाणी म्हणण्यात येतात.  या सोहळ्यानिमित्त मंदिरात दोन दिवस भक्तांसाठी मोठ्या प्रमाणात प्रसादाचे आयोजन करण्यात येते.  भगवान श्रीकृष्णाला छप्पन भोग प्रसाद अर्पण करण्यात येतो.  तर माता यशोदेसाठी सुका मेवा असलेल्या 100 किलो विशेष प्रसाद दाखवण्यात येतो.  हा सर्व प्रसाद मग उपस्थित भक्तांना वाटण्यात येतो.  याशिवाय बाळ कृष्णाला 11 जायफळांची माळ घालण्यात येते.  विशेष म्हणजे, ही माळ गुरुवारीच घातली जाते.  माता यशोदेची पूजा करत बाळ श्रीकृष्णाला माळ घातल्यास विवाह होतो, अशी मान्यता आहे.  माता यशोदेच्या मंदिरात (Temple of Yashoda Mata) श्रीकृष्णाचा जन्मसोहळा आगळ्यावेगळ्या पद्धतीनं साजरा होत आहे. 

सई बने  

 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.