Home »  विषारी शेवाळ्याच्या जाळ्यात समुद्र….

 विषारी शेवाळ्याच्या जाळ्यात समुद्र….

by Team Gajawaja
0 comment
poisonous algae
Share

अरबी समुद्रापासून ते पॅसिफिक महासागरापर्यंत सर्वत्र एक विचित्र अशा शेवाळाची व्याप्ती वाढत आहे.  गेल्या काही वर्षापासून वाढत असलेले हे शेवाळ (poisonous algae) आता फक्त समुद्रासाठीच नव्हे तर समुद्रातील जीवांसाठीही मारक ठरले आहे.  याचा मानवी जीवनावरही व्यापक  परिणाम होणार आहे.  जगभरातील समुद्रांवर या विषारी शेवाळांचे (poisonous algae) आवरण वाढत चालले आहे. या शेवाळाचे क्षेत्रफळ 13.2 टक्क्यांवर पोहोचले आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी उपग्रहावरून घेतलेल्या छायाचित्रांच्या आधारे हा खुलासा केला आहे.  भारताचा गुजरात किनारा आणि पाकिस्तान समुद्र किनारा देखील या शेवाळांच्या विळख्यात आल्याचे या चित्रांवरुन स्पष्ट झाले आहे.  ही शेवाळ आता 3 कोटी 14 लाख चौरस किलोमीटर समुद्रात पसरली आहे.  ही शेवाळ विषारी आहे. मात्र याची एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ होण्यासाठी मानवालाच जबाबदार धरण्यात येत आहे.  रासायनिक खते, गटाराचे पाणी, वायू प्रदूषण यामुळे या शेवाळांना अधिक पोषक वातवरण मिळत असून यातच त्यांचे खाद्य आहे. त्यामुळे त्यांचा मोठ्याप्रमाणावर फैलाव होत आहे. शेवाळांचा हा असा फैलाव ही मानवाला निसर्गानं दिलेला मोठा धोक्याचा इशारा असल्याचे तज्ञांना स्पष्ट केले आहे.  

भारत, पाकिस्तान, इराण, व्हिएतनामसह जगभरात पसरलेल्या अथांग समुद्रावर या विषारी शेवाळांनी (poisonous algae) ताबा मिळवला आहे.  ही विषारी शेवाळं (poisonous algae) 3 कोटी 14 लाख चौरस किलोमीटर समुद्रात पसरली आहेत.  याचा फैलाव गेली अनेक वर्ष होत असून मानवी वस्तीतील जल प्रदूषण याला मुख्यत्वे कारणीभूत आहे.  उपग्रहावरून घेतलेल्या ताज्या छायाचित्रांमध्ये समुद्रावर या शेवाळांनी जणू ताबाच मिळवल्याचे चिंताजनक चित्र पाहायला मिळाले.  चीनी शास्त्रज्ञांच्या मते, 2003 पासून, या शेवाळांचा प्रसार झपाट्यानं वाढला आहे.  आता हा हिरवट रंगाचा थर सर्वदूर पसरत जाईल अशी शक्यता आहे.  यासाठी संशोधन करणा-या चीनच्या सदर्न युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांना सांगितले की रासायनिक खते, गटाराचे पाणी, वायू प्रदूषण आणि सेंद्रिय पदार्थ पाण्याद्वारे समुद्रात जात आहेत. त्याच्यावर काहीच प्रक्रीया करण्यात येत नाही. यामुळे असे शेवाळ पोसले जात आहे. हेच प्रदूषित पाणी या शेवाळांचे (poisonous algae) जीवन आहे. समुद्रात थेट असे प्रदूषित पाणी गेल्यमुळे त्याला अधिक खाद्य मिळते आणि मोठ्या प्रमाणात शेवाळांची निर्मिती होत आहे. इतकेच नाही तर समुद्राच्या पाण्याच्या सततच्या वाढत्या तापमानामुळे गेल्या दोन दशकांत शेवाळांचा (poisonous algae) वाढीचा वेग लक्षणीय वाढला आहे. हा वेग असाच राहिला तर जगभरातील सर्वच समुद्रावर या शेवाळांचा तवंग पहायला मिळणार आहे.  आणि असे झाल्यास मानवी वसाहतीस आणि मानवी जीवनासही मोठा धोका होऊ शकतो, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. 

यामुळे जगभरात पर्यावरणाची मोठी समस्या निर्माण होऊ शकते, असेही चिनी शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. शेवाळ (poisonous algae) पाण्यात झपाट्याने वाढतात आणि गोड्या पाण्यातही येऊ शकतात.  या शेवाळाच्या प्रसारामुळे पाण्याचा रंग खराब होऊ शकतो.  पाणी पिवळे, लाल किंवा हिरव्या रंगाचे होते.   याशिवाय माशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. काही शेवाळा बायोटॉक्सिन तयार करतात ज्याचा वन्यजीवांवर गंभीर परिणाम होऊ शकतो.  यामुळे  असे क्षेत्र तयार होऊ शकते  जिथे कुठलाही जीव जगू शकत नाहीत.  या शेवाळांसदर्भात अधिक संशोधन जर्नल नेचरमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.   त्यात नासाच्या 7,60,000 चित्रांचा वापर संदर्भासाठी करण्यात आला आहे. 2020 पर्यंत या शेवाळांचे क्षेत्रफळ समुद्रात 8.6 टक्क्यांपर्यंत होते. भारतात ही विषारी हिरवळ गुजरातच्या किनाऱ्यापासून ते अरबी समुद्रात पाकिस्तानपर्यंत वाढलेली दिसते. त्याचबरोबर तामिळनाडू आणि केरळच्या किनारपट्टीवरही हे शेवाळ दिसून येत आहेत. याशिवाय जपानच्या समुद्रातही ही एकपेशीय वनस्पती मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. उपग्रहामधून आलेल्या छायाचित्रात हा हिरवा समुद्र दिसायला छान दिसत असला तरी त्याचे परिणाम गंभीर होणार आहेत.  समुद्रातील जीवसृष्टीसही त्यामुळे गंभीर धोका आहे.  तसेच समुद्रीवाहतुकीवरही याचा परिणाम होऊ शकतो.  विशेष म्हणजे त्याचा अटकाव करणेही सहजसोप्पे नाही.  त्यासाठी सर्वत्र प्रदूषीत पाणी थेट समुद्रात सोडण्याची सवय बंद करावी लागणार आहे.  हे खाद्यच नाही मिळाले तर या शेवाळाची वाढ कमी होईल, अन्यथा येत्या काही वर्षात समुद्राचे पाणी हिरवे झालेले बघण्याची वेळ येणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.