Home » Valley Of Peace : जगातील सर्वात मोठं स्मशान !

Valley Of Peace : जगातील सर्वात मोठं स्मशान !

by Team Gajawaja
0 comment
Valley Of Peace
Share

मराठी चित्रपट पछाडलेलामध्ये एक डायलॉग आहे. जगातील समदे रस्ते शेवटी मसनवाटीतच जातात. आता हे वाक्य चित्रपटात विनोदी अंगाने घेतलं असलं, तरी बघायला गेलं तर ती एक true फिलॉसफी आहे. स्मशानभूमी- कब्रिस्तान यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन नेहमीच नकारात्मक असतो. पण जगात एक अशी स्मशानभूमी आहे जी पाहण्यासाठी लोकं देश विदेशातून येतात. मृत्यूनंतर तिथे दफन केलं जावं असं अनेकांच स्वप्नं असतं. ते म्हणजे वादी-ए-सलाम कब्रिस्तान. जिथे ५० लाखपेक्षा जास्त मृतदेह दफन आहेत. जगातील या सर्वात मोठ्या स्मशानभूमीबद्दल जाणून घेऊ. (Valley Of Peace)

Valley Of Peace, इराकच्या नजफ शहरात असलेलं जगातील सर्वात मोठं स्मशान आहे, ज्याला “वादी अल-सलाम” (Valley Of Peace) असंही म्हटलं जातं. इथे राजा-महाराजांपासून भिकाऱ्यांपर्यंत सर्वांचे शव दफन केलेले आहेत. संपूर्ण जगातून लोक, आणि खासकरून मुस्लिम समुदायातील लोक, या जागेला पाहण्यासाठी येतात. या जागेला खूप पवित्र मानल जातं. या Valley of Peace मध्ये सुमारे ५० लाखांपेक्षा अधिक शव दफन केलेले आहेत, ज्यामध्ये सुलतानांपासून, विविध शास्त्रज्ञ, नेते, भिकारी यांचा समावेश आहे. इतकंच नाही तर इथे पैगंबर सालेह आणि हूद यांची कब्रही आहे. हे कब्रिस्तान सुमारे 1,485.5 एकर क्षेत्रात पसरलेलं आहे, म्हणजेच जवळपास 1700 पेक्षा अधिक फुटबॉल मैदानांच्या बरोबरीचं आहे. (Marathi News)

Valley of Peace हा नजफ शहराचा आत्मा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तुम्ही जर याला पाहिलंत, तर तुम्हाला हे कब्रिस्तान नसून एक शहर वाटेल, कारण इथल्या कबरी इमारतींसारख्या दिसतात. वादी अल-सलाम हे जगातील असं एकमेव कब्रिस्तान आहे, जिथे 1400 वर्षांपूर्वीपासून लोकांना दफन करण्याची प्रक्रिया सुरू आहे, जी आजही सुरू आहे. प्रत्येक कुटुंबासाठी इथे स्पेशल खोल्या तयार केल्या असून तिथे जाण्यासाठी शिड्या आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने या कब्रिस्तानाला जगातील सर्वात मोठं कब्रिस्तान म्हणून मान्यता दिली असून युनेस्कोने याला जागतिक स्थळांच्या यादीत स्थान दिलं आहे.

==================

हे देखील वाचा : Black Turmeric : भारताच्या काळ्या सोन्याला परदेशात मोठी मागणी !

==================

असं मानलं जातं की इराक युद्धाच्या काळात इथे दररोज सुमारे 200-250 शव दफन केले जात होते, तर 2010 मध्ये ही संख्या 100 च्या खाली गेली. प्रत्येक वर्षी जगभरातून सुमारे 50 हजार नवीन शवांना या कब्रिस्तानात जागा दिली जाते. 2014 मध्ये एक वेळ अशी आली होती कि इथे जागेची कमतरता असल्यामुळे शव ठेवण्यास नकारदिला जात होता. पण त्यानंतर इथे अनेक शव चोरीला गेले आणि काही शव विकले जात असल्याची घटना समोर आली. या कब्रिस्तानात कब्र खोदण्यासाठी 100 डॉलर आणि शव दफन करण्यासाठी 170-200 डॉलरचा खर्च येतो. या कब्रिस्तानात एक मकबरासुद्धा आहे. इथे फिरायला येणारे जगभरातील शिया मुस्लिम नवस मागतात की त्यांना या कब्रिस्तानात दफन केलं जावं. (Valley Of Peace)

सामान्यतः कोणत्याही कब्रिस्तानात किंवा अशा कोणत्याही ठिकाणाच्या जवळून जाताना सुद्धा लोकांना भीती वाटते, पण आज हे Valley of Peace कब्रिस्तान जगातील पॉप्युलर डेस्टिनेशन बनलं आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.