Home » चंद्राला काबीज करु पाहणाऱ्या चीनची जमीन खचू लागली…

चंद्राला काबीज करु पाहणाऱ्या चीनची जमीन खचू लागली…

by Team Gajawaja
0 comment
China
Share

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी चीनबाबत धक्कादायक दावा केला आहे.  त्यानुसार चीन (China) चक्क चंद्रावर हक्क सांगण्यासाठी अवकाशात गुप्त लष्करी कार्यक्रम राबवत आहे. आत्तापर्यंत चीन आपल्या शेजारी देशांना कर्ज देऊन त्यांच्यावर आपली सत्ता मिळवू पाहत होता.  मात्र चक्क चंद्रावरच सत्ता मिळवण्याचे स्वप्न चीनला पडू लागली आहेत. 

पण चंद्रावर आणि अन्य देशांवर विजय मिळवण्याची स्वप्न बघणा-या चीनची राजधानी पाताळात जाईल एवढी धसू लागली आहे. बिंजींग आणि चीनमधील अन्य महत्त्वाच्या शहरांमधील जमीन बुडत असल्याचे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. २०१५ ते २०२२ या कालावधीत दशलक्षाहून अधिक लोकसंख्या असलेल्या चीनच्या शहरातील जमिनीचे परिक्षण करण्यात आले.  त्यात ८२ शहरांपैकी काही शहरे झपाट्याने बुडत असल्याचे आढळून आले आहे. एकीकडे जगावर विजय मिळवण्याचे स्वप्त जरी चीनचे असे तर खुद्द चीनमधील शहरे रसातळाला जात आहेत. (China)बीजिंगसह चीनची जवळपास निम्मी मोठी शहरे बुडत असल्याचा धक्कादायक अहवला नुकताच प्रसिद्ध झाला आहे. ही शहरे चीनच्या पूर्व भागात आणि समुद्रकिनाऱ्यालगत आहेत. चीनमध्ये गेल्या अनेक वर्षापासून निसर्गाच्या विरुद्ध अशी विकासकामे होत आहेत.  तेथील नद्यांचे प्रवाहमार्गही बदलण्यात आले आहेत. नैसर्गिक पाण्याचे स्त्रोतही बंद करण्यात आले आहेत.  या ठिकाणी विकासकामांच्या नावावर मोठ्या इमारती उभ्या करण्यात येत आहेत.  त्यासाठी  भूगर्भातील पाण्याचा झपाट्याने होणारा उपसा करण्यात आला आहे.  त्यातच चीनमध्ये जणू उंचच उंच इमारती उभ्या करण्याची स्पर्धा लागली आहे. (China)

या मोठ्या इमारतींच्या उभारणीसाठी सिमेंट आणि लोखंडचा वापर होत आहे.  याच उंच इमारतींचे वजन चीनच्या नाशास कारणीभूत ठरेल असा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार चीनमध्ये अनेक प्रयोग सातत्याने करण्यात येत आहेत.  त्यामध्ये पाऊसाचा वेगही निदर्शित करण्यात येतो.  नद्यांचे प्रवाह बदलण्यात आले आहेत.  या जागांवर घरांची आणि कारखान्यांची उभारणी करण्यात आली आहे. या सर्वांमुळे चीनमधील निसर्गाचे चक्र पूर्णपणे बिघडले आहे.  याचा भूभार्गावर विपरित परिणाम झाला आहे.  सातत्यानं होणा-या  कामांमुळे जमिनीवर भार पडत आहे. 

गेल्या काही महिन्यातच चीनमध्ये (China) जमिन खचल्याच्या बातम्या पुढे आल्या. त्यावरुन आता भूभार्गावरील वाढता दाब असह्य झाल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या अहवालात २०१५ ते २०२२  या कालावधीत २० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ८२  शहरांमध्ये परिक्षण करण्यात आले. या शहरात सातत्यानं जमिन खचल्याच्या बातम्या पुढे येत होत्या. त्याची तपासणी केल्यावर चीनमधील जमिनीवर भार जास्त झाल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.  

या काळात संशोधकांनी या चिनी शहरांमधील जमिनीचा उतार मोजला. या ८२ शहरांपैकी निम्म्या शहरांची जमीन वेगाने खचत असल्याचे स्पष्ट झाले. चीनची ७५ टक्यांहून अधिक लोकसंख्या या शहरांमध्ये राहते.  चिंताजनक गोष्ट म्हणजे, चीनची राजधानी बीजिंगचाही यात समावेश आहे. बिजींगमधील ४५ टक्के शहरे ३ मिमीहून अधिक जमिनीत खचल्याचे स्पष्ट झाले आहे.  

संशोधकांनी ही जमीन खचल्याचा वेगही शोधून काढला आहे. त्यांच्यानुसार १६ टक्के जमीन दरवर्षी १० मिलीमीटर पेक्षा जास्त वेगानं खचत आहे.  हा वेग चिंताजनक आहे. कारण ठराविक टप्प्यापर्यंत हाच वेग कायम राहिल. मात्र काही अंतरानं हा वेग दुप्पट किंवा तिप्पटही होऊ शकतो. अचानक जमिनीला मोठ्या भेगा पडण्याची शक्यता आहे. (China)

यामुळे शहरांमधील निवासी बांधकामांना फटका बसणार आहे. ज्या भव्य इमारती चीनची शान वाढवत आहेत, त्याच भव्य इमारती पत्त्याच्या इमारतींसारख्या कोसळ्याची भीती आहे. यामुळे मोठी मनुष्यहानीही होण्याची शक्यता आहे. चीनचे सर्वात मोठे शहर शांघाय गेल्या शतकात ३ मिमीने खचले आहे. तर बीजिंगचा भुयारी मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांजवळील भाग दरवर्षी ४५ मिलीमीटर खचत आहे.  यामुळे भविष्यात चीनमध्ये मोठी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आहे.  यामुळे चीनचा विकासाचा डोलारा कोसळणार आहे.  

हा अहवाल आल्यावर संशोधकांनी उपग्रहामार्फतही याची पडताळणी केली. यातून जे निष्कर्ष समोर आले आहेत, ते पाहून संशोधक हादरले आहेत. चीनमधील काही शहरे ही खडकावर वसलेली आहेत, ती या धोक्यापासून दूर आहेत. मात्र हे प्रमाण फक्त २० टक्के आहे.  बाकीचे ८० टक्के चीनमधील जमिन ही खचत असून भविष्यात याचा वेगही वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (China)

==========

हे देखील वाचा : दिल्लीतील ‘या’ हनुमान मंदिरात व्हिसा मिळण्याची इच्छा होते पूर्ण

==========

त्यातच हे संशोधक अधिक चिंतीत आहेत, कारण चीनमध्ये या शतकातील सर्वात मोठा पूर येऊ शकतो, अशी भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या पुरामुळे 12 कोटी लोक बाधित होतील, असे सांगण्यात आले आहे.  चिनच्या क्विंगयुआन शहरात एका मजल्यापर्यंत पाणी भरले आहे. येथे दर ५० वर्षांनी पूर येतो. 

सध्या झओकिंग, शाओगुआन, किंगयुआन आणि जिआंगमेन या शहरांमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे.  ही परिस्थिती चिंताजनक असून यामुळे चीनमध्ये (China) काही ठिकाणी जमीन खचल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.  हवामान खात्यानं संपूर्ण आठवडा येथे जोरदार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. ही सर्व परिस्थिती पहाता चीनमधील संशोधक चिंतेत आहे. अर्थात चीनच्या सरकारला मात्र चंद्राचा ताबा कसा मिळेल याची चिंता सतावत आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.