Home » स्वर्गाचे द्वार असणा-या तुंगनाथ मंदिराचे अस्तित्व धोक्यात

स्वर्गाचे द्वार असणा-या तुंगनाथ मंदिराचे अस्तित्व धोक्यात

by Team Gajawaja
0 comment
Tungnath Temple
Share

उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात जगातील सर्वात उंचावर असलेले शिवमंदिर आहे.  या शिवमंदिराचा समावेश पंचकेदारांमध्ये केलेला आहे.  पांडवांनी हे मंदिर बांधले असल्याची माहिती पौराणिक ग्रंथामध्ये आहे.  हे मंदिर म्हणजे, तुंगनाथ मंदिर.  जगातील सर्वात उंच ठिकाणावर असलेल्या या शिवमंदिराचे अस्तित्व धोक्यात आले आहे.  समुद्रसपाटीपासून 3690 मीटर उंचीवर हे मंदिर आहे. (Tungnath Temple)

मात्र अलिकडे भारतीय पुरातत्व विभागाने केलेल्या सर्वेक्षणात तुंगनाथ मंदिर 6-10 अंशांनी झुकल्याचे स्पष्ट झाले आहे.  या मंदिराचे हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे.  या मंदिरात भगवान शिवाच्या हृदयाची आणि बाहूंची पूजा केली जाते.  तुंगानाथ मंदिराबाबत असेही मानले जाते की, या ठिकाणी रावणाने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली होती.

याशिवाय जेव्हा प्रभू रामांनी रावणाचा वध केला तेव्हा ब्राह्मण मारण्याच्या शापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी याच ठिकाणी भगवान शिवाची तपश्चर्या केली. तेव्हापासून या ठिकाणाचे नाव चंद्रशिलाही प्रसिद्ध झाली  आहे.  शिवाय माता पार्वतीनंही याच ठिकाणी तपश्चर्या केल्याची माहिती आहे.  असे पौराणिक दृष्ट्या महत्त्वाचे असेलेले हे तुंगनाथ मंदिर जमिनीमध्ये जात असल्याचा सर्वेक्षण भारतीय पुरातत्व खात्यानं केले आहे.  त्यामुळे या पुरातन मंदिराला वाचवण्याचे आव्हान संबंधित विभागापुढे आले आहे.  (Tungnath Temple)

रुद्रप्रयागमधील तुंगनाथ मंदिर हे भगवान शंकर आणि माता पार्वतीला समर्पित आहे. 18 व्या शतकात संत शंकराचार्यांनी या मंदिराचा शोध लावल्याची माहिती आहे.  हा तुंगनाथ मंदिराचा परिसर नितांत सुंदर आहे.  त्यामुळेच या मंदिरात बर्फवृष्टी होत असतांनाही गर्दी असते.  मंदिराच्या आसपास मोठ्या प्रमाणात बर्फ साठतो.  अशा कडक थंडीच्या काळातही या मंदिर परिसरातील सौदर्य हे मंत्रमुग्ध करणारे असते. 

त्यामुळे या तुंगनाथ मंदिरात मंदिरात कायम भाविकांची गर्दी असते.  अशा पौराणिक मंदिराचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे.  तुंगनाथ मंदिराचे बांधकाम अप्रतिम आहे. रुद्रप्रयागमधील पाच पंच केदार मंदिरांपैकी हे सर्वात उंच मंदिर आहे.  मात्र अलिकडे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, रुद्रप्रयागचे तुंगनाथ मंदिर 6-10 अंशांनी झुकले आहे.  त्यामुळे या मुख्य मंदिराच्या बाहेरील भिंतीवर तराजू बसवण्यात आल्या आहेत. (Tungnath Temple)

तुंगनाथ मंदिराच्या एकाच संकुलात अनेक मंदिरे आहेत. भारतीय पुरातत्व खात्यानं केलेल्या सर्वेक्षणात या मुख्य मंदिर परिसरातील लहान मंदिरेही 10 अंशापर्यंत झुकल्याची माहिती पुढे आली आहे.  यामुळे हे संपूर्ण मंदिर संकुल जिथे उभे आहे, त्याखाली जमिनीत काही हालचाली होत असल्याचा अनुमान भारतीय पुरातत्व खात्यानं काढला आहे.  ही गंभीर घटना असल्याची नोंदही त्यांनी केली आहे.  

तुंगनाथ मंदिरात भगवान शंकराच्या हृदयाची आणि बाहूंची पूजा केली जाते.  तुंगानाथ पर्वतावरील स्थानामुळे या मंदिराला तुंगानाथमंदिर असे नाव पडले आहे.  हे भगवान शंकराच्या पंच केदारांपैकी एक आहे. या मंदिराची उभारणी पांडवांनी केल्याची माहिती आहे.  पांडवांनी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी मंदिराची स्थापना केली. (Tungnath Temple)

महाभारत युद्धामध्ये झालेल्या नरसंहारामुळे भगवान शंकर पांडवांवर रागावले होते.  त्यांचा राग दूर करण्यासाठी आणि भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पांडवांनी या ठिकाणी तपश्चर्या केली आणि या मंदिराची स्थापना केली.  याच ठिकाणी माता पार्वतीनेही भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केल्याची माहिती आहे.  

या मंदिरजवळ असलेल्या चंद्रशिलाच्या दर्शनाशिवाय तुंगानाथ मंदिराची यात्रा अपूर्ण मानली जाते. मंदिरापासून हाकेच्या अंतरावर चंद्रशिला मंदिर आहे.  येथे रावण शिला आहे.  याला स्थानिक बोलणारा पर्वत म्हणूनही ओळखतात.  

===============

हे देखील वाचा : चीनकडून जगातील सर्वाधिक वेगवान इंटरनेट सेवा लॉन्च 

==============

या मंदिरात अलिकडे वर्षभर भाविकांची गर्दी असते.  मे ते नोव्हेंबर हा काळ तुंगनाथाच्या दर्शनासाठीचा सर्वात चांगला काळ मानला जातो.  मात्र  अनेक स्थानिक आणि ट्रेकींगची आवड असणारे भगवान शंकराचे भक्त बर्फ पडायला लागल्यावर तुंगनाथाच्या दर्शनाला येतात.  बर्फ, मखमली गवत, रंगीबेरंगी फुले आणि ढगांनी वेढलेला हा परिसर पर्यटकांना भुरळ घालतो. (Tungnath Temple)

जानेवारी-फेब्रुवारीमध्ये येथे फक्त बर्फाची चादर दिसते. त्यामुळे लोक या तुंगनात परिसराला मिनी स्वित्झर्लंड असेही म्हणतात.  नोव्हेंबरपासून या ठिकाणी बर्फवृष्टी सुरू होते आणि मंदिर बर्फाची पांढरी चादर पांघरून जाते. यावेळीही तुंगनाथ मंदिरात भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी असते.  आता हेच तुंगनाथ मंदिर धोक्यात आले आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.