Home » १८ दिवस चाललेला रेस्क्यू ऑपरेशन !

१८ दिवस चाललेला रेस्क्यू ऑपरेशन !

by Team Gajawaja
0 comment
Tham Luang cave rescue
Share

तुम्ही फिरायला म्हणून एका गुफेत शिरला आहात. गुफेत असतो तसा एकदम काळाकुट्ट अंधार आहे. तुम्ही गुफेत दोन तीन किलोमीटर आत जाता, आणि पुन्हा परतण्यासाठी मागे वळता तेव्हा पूर्ण गुफेत पाणी भरलेलं असतं. आणि त्याची पातळी सेकंदागणिक वाढत आहे. आता तुम्ही बाहेर कसं जाणारं? बाहेर तुम्ही आत अडकला आहात हे कळणार कसं? Exact अशी परिस्थिती ओढवली होती एका फुटबॉल टीम आणि त्यांच्या कोचवर. आजची गोष्ट आहे जगातल्या सर्वात थरारक, कठीण आणि तरीही यशस्वी झालेल्या रेस्क्यू ऑपरेशनची. १ कोच, १२ लहान मुलं, गुफेतला काळाकुट्ट अंधार आणि प्रत्येक सेकंदाला वाढत जाणारी पाण्याची पातळी. पूर्ण गोष्ट जाणून घेऊया. (Tham Luang cave rescue)

थायलंडमधलं एक छोटसं शहर ‘मे साई’ फुटबॉलची प्रॅक्टिस संपल्यानंतर टीमच्या हेड कोच टीमला सुट्टी देऊन तिथून निघुन गेले. आता टीम सोबत २५ वर्षीय असिस्टंट कोच होते, त्यांनी फुटबॉल टीमला गुफेत फिरायला नेण्याचा प्लॅन बनवला. जवळच असणाऱ्या थम लुआंग नंग नॉन या गुफेत जाण्याचा हा प्लॅन होता. असिस्टंट कोच खूप वेळा या गुफेत फिरायला जात होते. म्हणून त्या दिवशी असिस्टंट कोच फुटबॉल टीमला या गुफेत फिरायला घेऊन गेले. या टीममध्ये १२ – १५ वर्षांची १२ मुलं होती. जून महिना सुरू होता पाऊस आला नव्हता पण आभाळ दाटलं होतं. असिस्टंट कोच सोबत ती मुलं गुफेत शिरली. त्यांनी गुफेत जाताना आपापल्या सायकल गुफेच्या बाहेर लावल्या होत्या. (International News)

या गुफेच एक वैशिष्ट्य म्हणजे या गुफेची बॅकस्टोरी या गुहेच नाव म्हणजे “थम लुआंग नंग नॉन” ज्याचा इंग्रजी अर्थ ग्रेट केव ऑफ स्लीपींग लेडी. आता या स्लीपींग लेडीचीच ही स्टोरी आहे. ती अशी आहे की, फार पूर्वी एक राजकुमारी एका सामान्य मुलाच्या प्रेमात पडली होती. घरच्यांना ते मान्य नव्हतं. त्यामुळे राजकुमारीला प्रियकरासह घरातून पळून जावं लागलं. राजकुमारीच्या कुटुंबीयांनी तिचा पाठलाग सोडला नाही. आणि एके दिवशी कुटुंबीयांपासून लपत छपत असलेली राजकुमारी मरण पावली. जेव्हा ती मरण पावली तेव्हा ती गर्भवती होती. असं बोललं जात की मेल्यानंतर तिच्या शरीराच रूपांतर दगडात झालं. आणि तो दगड म्हणजे ही गुफा. पावसाळ्यात या गुफेत पाणी भरतं. स्थानिकांच्या मान्यतेनुसार ते पानी नसून ते त्या राजकुमारीचं रक्त आहे. (Tham Luang cave rescue)

गुफेत फिरताना खूप आत गेल्यानंतर कोच यांच्या लक्षात आलं की पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे गुफेत पाणी भरू शकतं. याच चिंतेमुळे त्यांनी पूर्ण टीमला बाहेर जाण्याचे आदेश दिले. पण तेव्हा वेळ निघून गेली होती. ते ज्या रस्त्याने गुफेच्या आत आले होते, तो संपूर्ण रस्ता पाण्याने भरला होता. गुफेच्या बाहेर मुसळदार पाऊस पडत होता, त्यामुळे पाण्याची पातळी वाढत चालली होती. पाण्यापासून वाचण्यासठी कोच यांनी सर्वांना गुफेच्या आणखी आत जाण्याचे आदेश दिले. बराच वेळ पाणी वाढत राहिल्याने त्यांनी गुहेच्या आतील एका ठिकाणी आश्रय घेतला. पोहता कुणालाच येतं नव्हतं. गुफेच्या अंधरात अरुंद जागेत पोहणं त्यापेक्षा कठीण काम होतं. (International News)

दुसरीकडे गुफेत अडकलेल्या मुलांचे पालक मुलं घरी न परतल्यामुळे चिंतेत होते. त्यामुळे ते मुलांच्या शोधात गुफेपर्यंत पोहचले. गुफेच्या बाहेर असलेल्या सायकलस मुळे ते गुफेत गेले असल्याची शंका आली. तत्काळ बचाव पथकाला बोलवण्यात आलं. थायलंडच्या नौदलाचे अधिकारी सुद्धा मदतीला आले पण मुलांचा कुणालाच ठावठिकाण सापडला नाही. मुलं कदाचित आत असतील. पण पाण्याने भरलेल्या गुफेत जाण्यासाठी केव डाइविंग येणे आवश्यक होतं. केव डाइविंग म्हणजे ‘गुफेत पोहणे’, ज्यासाठी विशेष प्रशिक्षण आणि स्किल्सची आवश्यकता असते. जगात निवडक लोकांनाच केव डाइविंग येते. तरीही, केव डाइवर्स येईपर्यंत काहीतरी करणे आवश्यक होतं, म्हणून अनेक दिवसांपासून पंपच्या मदतीने गुफेतून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचाही काही उपयोग झाला नाही, कारण मधेमधे होणाऱ्या पावसामुळे गुफा पुन्हा पाण्याने भरत होती. (Tham Luang cave rescue)

थायलंड सरकारने गुफेत अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी UK, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशातील केव डाइवर्सना बोलवण्याचा निर्णय घेतला. बघता बघता अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, चीन अशा अनेक ठिकाणांहून केव डाइवर्स बारा मुलांच्या आणि त्यांच्या कोचच्या मदतीसाठी हजर होते. पण प्रॉब्लेम असा होता की, गुफेत खूप चढ उतार होते. काही ठिकाणी तर गुफेतील जागा अरुंद होती की एखादा व्यक्ती उभा ही राहू शकत नव्हता. महत्त्वाच म्हणजे गुफेतला अंधार आणि गुफेत साचलेलं गढूळ पाणी यामुळे आता पोहत जाऊन मुलांना शोधणं आणखी कठीण होतं. पण आत अडकलेल्या मुलांकडे ना प्रकाश होता, ना जेवण होतं, ना पिण्याचं पाणी त्यावर गुफेत ऑक्सिजनचं प्रमाणही सतत कमी होत होतं. मुलांच्या जीवंत असण्याची आशा खूप कमी होती. पण बचाव दल आणि केव डाइवर्स त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. (International News)

जवळ जवळ मुलांना गुफेत अडकून ८ दिवसं झाले होते.  Uk चे दोन केव डाइवर्स कसंबसं करत मुलांपर्यंत पोहचले. तेव्हा त्यांनी पहिलं की मुलं थोडी कमकुवत झाले होते, पण सुरक्षित होते. एक आठवडा त्यांनी गुफेच्या छतावरून येणाऱ्या पाण्याच्या थेंबांना गोळा करून पिण्याचं पाणी पिऊन स्वत:ला जीवंत ठेवलं होतं. शिवाय मुलांसोबत अडकलेले त्यांचे कोच, एक बौद्ध भिक्षू होते. त्यांनी मुलांना गुफेत ध्यान करायला शिकवलं होतं, ज्यामुळे त्यांची श्वासक्रिया स्थिर राहिली आणि ते घाबरले नाहीत. गुफेत अडकलेल्या मुलांचा व्हिडिओ जेव्हा जगाने पाहिला, तेव्हा सर्वत्र आनंदाची लहर पसरली. आता जगभरातून या मुलांसाठी मदत सुरू झाली. पुढील काही दिवसांत मुलांपर्यंत ऑक्सिजनचे सिलेंडर आणि खाण्याचं सामान पोचवण्यात आलं. (Tham Luang cave rescue)

आता पुढचा टप्पा होता, त्यांना गुफेतून सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा. पण जेव्हा या बचाव ऑपरेशनची तयारी सुरू झाली, तेव्हा लवकरच सर्वांना समजलं की हे काम जवळजवळ अशक्य आहे. ज्या मार्गाने स्किलड डाइवर्स सुद्धा येऊ शकत नाहीत, त्या मार्गाने मुलं कशी येणार, हा मोठा प्रश्न होता. सर्वांनी वेगवेगळ्या उपाययोजना सुचवल्या. टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्कने मुलांच्या आकाराची एक सबमरीन बनवण्याचा प्रस्ताव दिला, हे सबमरीन बनवणार होते त्यांच्याच कंपनीचे इंजिनियर्स. पण गुफेचा मार्ग इतका अरुंद होता की हा प्लान लवकरच नाकारण्यात आला. (International News)

अखेर बचाव दलाला समजलं की मुलांना बाहेर काढण्यासाठी एकच मार्ग आहे. त्यांना ऑक्सिजन मास्क घालणे आणि मग एकेक करून प्रत्येक मुलाला डाइवर्ससोबत बाहेर आणणे. या कामातही एक अडचण होती. बचावाच्या सुरुवातीला थाई नेवीचे काही लोक आतच अडकले होते. जेव्हा त्यांना पोहून बाहेर आणलं गेलं, तेव्हा त्यांपैकी एक नेवी अधिकारी अंधारात घाबरून झटापट करू लागला. त्याला बाहेर काढण्यात खूप मेहनत करावी लागली. बचाव दलाला वाटलं की, जर मुलंही ऑपरेशनच्या दरम्यान घाबरली, किंवा त्यांनी झटापट करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यासाठी आणि डाइवर्स या दोघांसाठीही धोका निर्माण होईल. त्यामुळे ठरलं की सर्व मुलांना बाहेर आणण्यापूर्वी बेशुद्ध केलं जाईल. (Tham Luang cave rescue)

हे खूप किचकट काम होतं कारण बेशुद्धीच औषध, खासकरून मुलांमध्ये, योग्य मात्रेत द्यावं लागतं. यासाठी एक अनेस्थेटिस्ट म्हणजेच बेशुद्धीच औषध देणारा तज्ज्ञ डॉक्टर लागतो. या कामासाठी एक असा डॉक्टर पाहिजे होता जो अनेस्थेटिस्टसोबतच स्किल्ड केव-डायवरसुद्धा असेल. जगात असे मोजकेच लोक असतात. संकटाच्या या क्षणी ऑस्ट्रेलियाचा डॉक्टर रिचर्ड हैरिस मदतीसाठी आलं. जे दोन्ही कामांमध्ये तज्ज्ञ होता. हैरिसला सुरुवातीला या ऑपरेशनबद्दल सांगितल्यानंतर त्याने नकार दिला. त्यांच्या मते हे ऑपरेशन अशक्य होतं. पण जेव्हा त्यांना सांगितलं की त्यांच्या नकारामुळे मुलांचा मृत्यू होऊ शकतो, तेव्हा हैरिस लगेचच तयार झाले. ६ जुलैपर्यंत जगभरातून सुमारे १०० केव डाइवर्स या कामासाठी थायलंडमध्ये पोहोचले होते. गुफेतून पाणी पंपाने बाहेर काढण्याच काम चालू होतं, जेणेकरून ऑपरेशन आणखी सोपं होईल. जवळ जवळ आता मुलांना गुफेत अडकून १४ दिवस झाले होते. ७ जुलैला अधिकाऱ्यांनी अचानक घोषणा केली की ते त्वरित रेस्क्यू ऑपरेशन सुरू करत आहेत. स्थानिक लोकांच्या अनुभवानुसार १० जुलैपर्यंत गुफा पावसाच्या पाण्याने भरून जाईल. त्यामुळे मुलांना लवकरात लवकर बाहेर काढणे आवश्यक होतं. (International News)

बचाव दलाने गुफेत आत सुमारे दीड किलोमीटर अंतरावर ऑपरेशनचा बेस तयार केला. जिथून डाइविंग करून मुलांपर्यंत पोहोचता येईल. त्यानंतर या संपूर्ण मार्गावर एक गाइडिंग रस्सी टाकण्यात आली, जेणेकरून कोणीही रस्ता चुकू नये. डाइविंगसाठी प्रत्येक मुलाला एक डाइविंग सूट घालण्यात आला होता, ज्यात ऑक्सिजन सिलेंडर आणि चेहऱ्यावर मास्क मुलांना देण्यात आलं होतं. प्रत्येक मुलाला डाइवर्ससोबत दीड ते दोन किलोमीटर खोल पाण्यात पोहायचं होतं. खरतर त्यांना फक्त डाइवर्सना पकडून ठेवायचं होतं, ते जास्त हालचाल करू शकत नव्हते, कारण त्यांना बेशुद्धीच Injection दिलं होतं. बाकीचा रस्ता असा होता जिथे मुलं पाण्याच्या बाहेर तोंड काढू शकत होते. (Tham Luang cave rescue)

======

हे देखील वाचा : तरुणीला 21 कोटी पगार !

====

डाइवर्स मुलांना घट्ट पकडून हळूहळू बाहेर आणत होते. अशा पद्धतीने पहिल्या दिवशी चार मुलांना बाहेर काढण्यात आलं, आणि त्यानंतर पुढील दोन दिवसांत चार चारच्या गटांमध्ये मुलांना बाहेर काढलं गेलं. मुलांबरोबर असणारे कोच हे सर्वात शेवटी बाहेर आले. ११ जुलै २०२३ जेव्हा १२ मुलांची ती फुटबॉलची टीम आणि त्यांचे कोच सुखरूप बाहेर आले, संपूर्ण जगभरात तेव्हा आनंद साजरा केला गेला. १८ दिवस चाललेल्या या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अनेक देश आणि स्वयंसेवकांनी मदत केली होती. ज्यामध्ये भारताचासुद्धा समावेश होता. पंप बनवणाऱ्या किर्लोसकर कंपनीने आपल्या काही तज्ञांना थायलंडमध्ये पाठवलं होतं, जेणेकरून गुफेतून पाणी काढण्यात ते मदत करू शकतील. (International News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.