Home » कलियुगातील कुबेर: थायलँन्डचा राजा

कलियुगातील कुबेर: थायलँन्डचा राजा

जगातील सर्वाधिक श्रीमंत राजाकडे गडगंज दौलतच नव्हे तर मोठ्या संख्येने एयरक्राफ्ट आणि शेकडो आलिशान गाड्या आहेत. या राजाचे नाव किंग महा वजिरालोंगकोर्न असे आहे.

by Team Gajawaja
0 comment
Thailand King
Share

जगातील सर्वाधिक श्रीमंत राजाकडे गडगंज दौलतच नव्हे तर मोठ्या संख्येने एयरक्राफ्ट आणि शेकडो आलिशान गाड्या आहेत. या राजाचे नाव किंग महा वजिरालोंगकोर्न असे आहे. त्याला थायलँन्डमधील किंग रामा X नावाने ओळखले जाते. थायलँन्डचा राजा झाल्यानंतर तो जगातील सर्वाधिक श्रीमंत राजांच्या लिस्टमध्ये अव्वल आहे. त्याच्याकडे हिरे, रत्नांचे शानदार कलेक्शन आहे. म्हणूनच त्याला कलियुगातील कुबेर असे म्हटले जाते. (Thailand king)

बिझनेस इनसाइडरच्या एका रिपोर्ट्सनुसार, किंग राम याचे नेटवर्थ ३.२ लाख कोटी रुपये आहे. किंगा रामाची बहुतांश संपत्ती क्राउन प्रॉपर्टी ब्युरो मध्ये ठेवण्यात आली आहे. राजाजवळ हजारो एकर जमीन आहे. त्यावर बहुतांश कंपन्या उभारल्या गेल्या आहेत. काही जमीनी भाड्याने दिल्या गेल्या आहेत.

१६ हजार एकरपेक्षा अधिक जमीन
रॉयटर्सच्या एका रिपोर्ट्सनुसार, थायलँन्डच्या राजाजवळ ६५६० हेक्टरची जमीन आहे. यासाठी देशभरात ४० हजार भाडेतत्त्वावर दिले गेले आहेत. याचा अर्थ असा होतो की, एग्रीमेंट अंतर्गत जमीवर काही कंपन्यांचे संचालन होते. केवळ राजधानी बद्दल बोलायचे झाल्यास तर तेथे १७ हजार भाडेकरू आहेत. या सर्व प्रॉपर्टी क्राउन प्रॉपर्टी ब्युरो अंतर्गत आहेत. ज्या राजाने २०१७ मध्ये आपल्या नियंत्रणाखाली ठेवल्या होत्या आणि राजाचा खासगी सचिव एअर चीफ मार्शल सॅटिटपोंग सुकविमोला २०१७ मध्ये क्राउन प्रॉपर्टी ब्युरोचे अध्यक्षपद दिले गेले. केवळ बँकॉकमध्ये क्राउट प्रॉपर्टी ब्युरोजवळ १३२८ हेक्टर जमीन आहे.

Newly crowned Thai king begins 2nd day of coronation events | Fox News

राजाकडे जगातील दु्र्मिळ हिरा
थायलँन्डच्या मुकुटावरील रत्नांमध्ये ५४५.६७ कॅरटचा एक गोल्डन रंगाचा जुबली हिरा आहे. जो जगातील दुर्मिळ हिरा मानला जातो. ज्वेलरी वेबसाइट द डायमंड अथॉरिटीने याची किंमत १२ मिलियन डॉलर असल्याचे म्हटले आहे. राजाला पाच शाही उपकरणे भेट देण्यात आली होती. त्यात ७.३ किलोग्रॅम सोन्याचा मुकुट आहे. हा मुकुट रत्नांनी भरलेला आहे.या मुकुटावर कोलकाता मधील एक मोठा हिरा सुद्धा आहे. या व्यतिरिक्त खजान्यात रत्न आणि सोने सुद्धा भरपूर प्रमाणात आहे.

३८ एअरक्राफ्टसह काही हेलीकॉप्टर्स
एका रिपोर्ट्सनुसार राजाजवळ एकूण ३८ एअरक्राफ्ट्स आहेत. त्याचसोबत काही हेलीकॉप्टर्स ही आहेत. यामध्ये चार बोईंग आणि तीन एअरबस बिझनेस एअरक्राफ्ट, तीन सुखोई सुपरजेट १००, चार नॉर्थ्रॉप एफ-५ ई लढावू जेट आणि २१ हेलिकॉप्टर्स आहेत. एफटीजवळ शेअर करण्यात आलेल्या डॉक्युमेंटनुसार याची देखरेख आणि इंधनाचा खर्च जवळजवश ६४ मिलियन डॉलर आहे. बिझनेस इनसाइडरच्या मते, राजाच्या परिवाराकडे एस्कॉर्टसाठी वापरल्या जाणाऱ्या ३०० आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. (Thailand king)

हेही वाचा- देशातील सर्वाधिक महागडी गणपतीची मुर्ती

या राजाने केलेत चार विवाह
किंग रामा X ने चार वेळा लग्न केले आहे. त्याचे पहिले लग्न १९७७ मध्ये चुलत बहिण राजकुमारी सोमसावली कितियाकारा हिच्यासोबत झाले होते. तर १६ वर्षांनी किंगने थाय सिनेमातील अभिनेत्री सुजारिन विवाचरावोसे हिच्याशी लग्न केले. पण दोन वर्षात घटस्फोट झाला. तर आणखी दोन लग्न केले. त्यातील एक राज्याभिषेापूर्वी करण्यात आले होते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.