नवं वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे नव्या वर्षात म्हणजेच २०२३ मध्ये टॅक्स मध्ये बचत करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. सर्व टॅक्स धारकांना प्रत्येक वर्षाला इनकम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर भरणे गरजेचे असते. आयटीआरमध्ये टॅक्सधारकाच्या वार्षिक उत्पान्नाची माहिती असते. त्यानुसारच टॅक्स किती भरायचा हे ठरवले जाते. खरंतर टॅक्स धारकाला उत्पन्नावर टॅक्स भरणे गरजेचे असते. इनकम टॅक्स अॅक्ट १९६१ अंतर्गत ग्राहकांना सरकार टॅक्स मध्ये सु्द्धा काही प्रमाणात सूट देते. ज्याबद्दल प्रत्येक टॅक्स धारकाला माहिती असावे. त्यामुळे टॅक्सची बचत कशी करावी याबद्दल गोंधळा असाल तर आम्ही तुम्हाला त्याच संदर्भातील काही टीप्स सांगणार आहोत. जेणेकरुन तुम्ही टॅक्सची बचत करु शकता. (Tax Saving)
–टॅक्स सेविंग स्किममध्ये करा गुंतवणूक
इनकम टॅक्सचा कलम 80C अंतर्गत गुंतवलेल्या रक्कमेवर सरकार टॅक्स डिडक्शनची परवानगी देते. या स्किममध्ये आपली बचत गुंतवून तुम्ही अधिकाधिक १.५ लाखांच्या रक्कमेपर्यंत टॅक्स डिडक्शनचा दावा करु शकतात. २०२२ मध्ये या योजनेअंतर्गत गुंतवणूक केलेल्यांना टॅक्समध्ये सूटचा लाभ घेता आला आहे. त्यामुळे नव्या वर्षात तुम्ही सुद्धा टॅक्सची बचतीसाठी या योजनेचा फायदा घेऊ शकता.
इनकम टॅक्स नियमाअंतर्गत पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF), एप्लॉइ प्रोविडेंट फंड (EPF), इक्विटी लिंक्ड सेविंग स्किम (ELSS), नॅशनल पेंन्शन सिस्टिम (NPS), सुकन्या समृद्धी योजना (SSY), सीनियर सिटिजन सेविंग स्किम (SCSS) आणि ५ किंवा त्यापेक्षा अधिक टेन्योर असणाऱ्या फिक्स्ड डिपॉजिटच्या स्किमवर टॅक्स डिडक्शनचा लाभ मिळतो. टॅक्स तज्ञांच्या मते, या योजनेत आपली बचतीची गुंतवणूक करुन अटीनुसार टॅक्समध्ये सूट मिळण्याचा दावा करु शकता. त्याचसोबत तुम्ही दीर्घकाळासाठी तुमच्यासाठी अधिक फंड जमवू शकता.
-सर्वोत्तम कर व्यवस्था
देशात सध्या दोन प्रकारची कर व्यवस्था आहे. त्यामध्ये जुनी कर व्यवस्था आणि नवी कर व्यवस्था. तुम्ही तुमच्या सुटनुसार आणि मनाप्रमाणे कर व्यवस्थेची निवड करु शकता. दोघांपैकी असा ऑप्शन निवडा जो तुम्हाला अधिक टॅक्स बचतीचा लाभ देईल. नव्या टॅक्स करात टॅक्स रेट कमी आहे. मात्र यामध्ये टॅक्स धारकाला डिडक्शनचा लाभ मिळत नाही. याच्या तुलनेत जुन्या कर व्यवस्थेत टॅक्स रेट अधिक आहे. तसेच यामध्ये टॅक्सधारकाला इनकम टॅक्सचा कलम 80C अंतर्गत टॅक्स डिडक्शनचा लाभ मिळतो.
-हेल्थ इंन्शुरन्स प्लॅनमध्ये करा गुंतवणूक
नव्या वर्षात टॅक्स बचतीसाठी तुम्ही स्वत:सह परिवारासाठी हेल्थ इंन्शुरन्स खरेदी करु शकता. असे करुन तुम्ही 80D अंतर्गत इंन्शुरन्स प्लॅनचे प्रीमियम पेमेंट करण्यासाठी २५ हजारांपर्यंत टॅक्स डिडक्शनचा दावा करु शकतात. जेष्ठ नागरिक उत्पन्न टॅक्स अॅक्टचा कलम 80D अंतर्गत ५० हजारांपर्यंत टॅक्समध्ये सूटचा दावा करु शकता. जेव्हा तुम्ही पालकांसाठी हेल्थ इंन्शुरन्स खरेदी करता तेव्हा तुम्हाला अतिरिक्त ५० हजारांपर्यंट टॅक्स बचत करु शकता. (Tax Saving)
-होम लोनवर टॅक्ससाठी सूटचा लाभ
जर तुम्ही एखाद्या बँक किंवा नॉन-बँकिंग फाइनेंशियल इंस्टिट्युट मधून होम लोन घतले असेल तर तुम्हाला लोनच्या इंटरेस्ट आणि लोन रक्कमेसंदर्भात नियमाअंतर्गत टॅक्स डिडक्शनचा दावा करण्यास पात्र ठरता. इनकम टॅक्सचा कलम २४ अंतर्गत होम लोन इंटरेस्टवर अधिकाधिक २ लाख रुपयांपर्यंत टॅक्स डिडक्शन आणि कलम 80C अंतर्गत होम लोनच्या रक्कमेवर अधिकाधिक १.५ लाख रुपयांपर्यंत टॅक्स डिडक्शनचा लाभ मिळवू शकता.
हे देखील वाचा- क्रेडिट कार्डच्या माध्यमातून रिकामे होऊ शकते तुमचे बँक खाते, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
-वेळेवर दाखल करा आयटीआर
प्रत्येक व्यक्ती किंवा कंपनीला ३१ जुलै किंवा इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडून ठरवण्यात आलेल्या तारखेपूर्वी आयटीआर फाइल करावे लागते. ते दाखल करताना चूक झाल्यास नियमांसह दंड द्यावा लागू शकतो.