Home » IAS बनण्यासाठी 6 महिने निधी सिवाचने घरात कोंडून घेतले, वाचा प्रेरणादायी प्रवास

IAS बनण्यासाठी 6 महिने निधी सिवाचने घरात कोंडून घेतले, वाचा प्रेरणादायी प्रवास

संघ लोक सेवा आयोग परीक्षेसाठी प्रत्येक वर्षाला लाखो उमेदवार अर्ज करतात. शासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहण्यासाठी लाखो लोक परीक्षा देतात.

by Team Gajawaja
0 comment
Success story
Share

संघ लोक सेवा आयोग परीक्षेसाठी प्रत्येक वर्षाला लाखो उमेदवार अर्ज करतात. शासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहण्यासाठी लाखो लोक परीक्षा देतात. मात्र त्यापैकी फार कमी लोक आपल्या उद्देशापर्यंत पोहचतो. अशातच आपण आज अशा एका महिलेबद्दलच्या यशाची कथा पाहणार आहोत तिने आपल्या यशासाठी फार कष्ट केले आणि अखेर तिला त्यात यश ही मिळाले.(Success story)

आयएएस निधी सिवाचने युपीएससी परीक्षेत पास होण्यासाठी स्वत: ला सहा महिन्यापर्यंत खोलीत बंद करुन ठेवले होते आणि अभ्यासासाठी संपूर्ण वेळ ती देत होती. आयएएस निधी २०१८ बॅचची अधिकारी आहे. तिचा हा तिसरा प्रयत्न होता. त्यामध्ये तिने ८३ व्या रँक मिळवला होता.

आयएएस निधी सिवाचने आपल्या ऑप्शन सब्जेक्टच्या रुपात इतिहासला निवडले आणि वैकल्पिक ऑप्शनच्या माध्यमातून इंग्रजीला निवडले होते. निधीने कोणत्याही कोचिंगशिवाय सहा महिने स्वत:साठी दिले. तिसऱ्या वेळेस युपीएससी परीक्षेत यशस्वी झाली आणि आपले आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

परिवाराने ठेवली होती ही अट
प्रशासनिक सेवेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर निधीने इंजिनिअरची नोकरी सोडली. त्यानंतर युपीएससीची तयारी सुरु केली. तिने संपूर्ण फोकस युपीएससी परीक्षेवर केला आणि त्यानंतर दोन वेळेस पेपर मध्ये उत्तीर्ण होता आले नाही. अशातच घरातल्यांनी सुद्धा तिच्यावर नोकरीसाठी दबाव टाकला. त्याचसोबत परिवाराने लग्नाची अट ही घातली. घरातील मंडळींनी निधीला संधी देत परीक्षा उत्तीर्ण हो किंवा लग्न कर अशी अट घातली.

निधीने घरातील मंडळीची ही अट मान्य केली आणि परीक्षेसाठी तयारी सुरु केली. निधी आपल्या खोलीतून सहा महिने कधीच बाहेर पडली नाही. अखेर तिची मेहनत फळाला आली. जेव्हा तिने तिसऱ्यांदा परीक्षा दिली तेव्हा त्यात उत्तीर्ण झाली.ती गुजरातच्या कॅडरची आयएएस अधिकारी आहे. (Success story)

हेही वाचा- श्रीराम ग्रुपच्या फाउंडर्सनी कर्मचाऱ्यांमध्ये विभागली ६ हजार कोटींची संपत्ती

निधि सिवाच मूळ रुपा हरियाणातील गुरुग्राममध्ये राहणारी होती. तिला १० वी मध्ये ९५ टक्के आणि १२ वी मध्ये ९० टक्के मिळाले होते. तिने दीनबंधु छोटूराम युनिव्हर्सिटी सोनीपत, हरियाणा मधून मॅकेनिकल इंजीनिअरिंग ग्रॅज्युएशन केले आहे. इंजीनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर निधि टेक महिंद्रा मध्ये एक डिझाइन इंजिनिअरिंगच्या रुपात काम करण्यासाठी हैदराबादला गेली. तिने २०१७ मध्ये नोकरी सोडली होती आणि युपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली होती.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.