Home » अज्ञात क्रमांकांवरुन फोन येतात? ब्लॉक करण्यासाठी ‘या’ टीप्स जरुर वापरा

अज्ञात क्रमांकांवरुन फोन येतात? ब्लॉक करण्यासाठी ‘या’ टीप्स जरुर वापरा

by Team Gajawaja
0 comment
Spam Call Block
Share

अज्ञात फोन कॉल्सकडे दुर्लक्ष करण्याच्या नादात आपण महत्वाचे फोन ही घेत नाहीत. तर टेलिमार्केटिंग आणि रोबो कॉल्समळे युजर वैतागतात. यापासून बचाव करण्यासाठी काही लोक आपला फोन सायलेंटवर ठेवतात. अथवा अज्ञात आणि युजलेस क्रमांक ब्लॉक करणे योग्य असल्याचे त्यांना वाटते. परंतु प्रत्येक वेळी क्रमांक ब्लॉक करणे यापासून काहीही होणार नाही. स्पॅम कॉलर नेहमीत नंबरची अदलाबदली करुन युजर्सला त्रास देतात. अशातच आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही काही क्रमांक एकत्रिक क्रमांक ब्लॉक करु शकतात. (Spam Call Block)

नॅशनल Do Not Call वर रजिस्टर करा
इंडियन टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटीने युजर्सला स्पॅम कॉल पासून बचाव करण्यासाठी NCPR लॉन्च केले आहे. यापूर्वी NDNC रजिस्ट्रीच्या नावाने ओळखले जायाचे. या सर्विसच्या माध्यमातून DND सर्विसला अॅक्टिव्ह केले जाऊ शकते. यामुळे युजर्सला टेलीमार्केटिंग किंवा निवडलेल्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून येणारे कॉल्स बंद होतील.

फोन क्रमांकावर DND कसे अॅक्टिव कराल
-फोनमध्ये SMS सुरु करा
-मेसेज बॉक्समध्ये START टाइप करुन १९०९ वर तो पाठवा
-मेसेज पाठवल्यानंतर सर्विस प्रोवाइड तुम्हाला तुमच्या कोडसह बँक, हॉस्पिटल आणि दुसऱ्या कॅटेगरीचा ऑप्शन पाठवेल
-तुम्हाला ज्या कॅटेगरीला ब्लॉक करायचे आहे त्याचा कोड खाली लिहून त्यांना रिप्लाय करु शकता
-रिक्वेस्ट प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला DND सर्विस अॅक्टिवेट होण्याचे कंन्फर्मेशनचा मेसेज मिळेल
-DND सर्विस सुरु झाल्यानंतर कमीत कमी २४ तासांचा वेळ लागतो

एनसीपीआरच्या मते डीएनडी सर्विस केवळ थर्ट-पार्टीच्या नको असलेले टेलीमार्केटिंग कॉल्स आणि निवडलेली इंडस्ट्री कॉल्स ब्लॉक करेल. डीएनडी अॅक्टिव झाल्यानंतर तुम्हाला बँकेचे एसएमएस अलर्ट, ऑनलाईन पोर्टल्स आणि पर्सनल थर्ड-पार्टी कॉल ब्लॉक केले जाणार नाहीत. सर्व युजर्स आपल्या टेलिकॉम सर्विस ऑपरेटर्सच्या मदतीने सर्व डीएनडी अॅक्टिव्ह करुन स्पॅम कॉल्स थांबवू शकता. जर तुम्ही जिओ अथवा एअरटेलच्या सिम कार्डचा वापर करत असाल तर पुढील प्रोसेस फॉलो करा (Spam Call Block)

हे देखील वाचा- WhatsApp चॅट करण्याप्रकरणी महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक, सर्वेतून खुलासा

Reliance Jio साठी
MyJio app सुरु करा आणि तेथे सेटिंग्स सुरु करा. आता Service Setting सेक्शनवर Do not distrub वर क्लिक करा. त्यानंतर ती कॅटेगरी निवडा जे कॉल्स आणि मेसेज तुम्हाला ब्लॉक करायचे आहेत.

Airtel साठी
एअरटेलची अधिकृत वेबसाइट airtel.in/airtel-dnd ला भेट द्या, आता आपला फोन क्रमांक एंटर करा. त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी मिळेल. आता ती कॅटेगरी निवडा जी तुम्हाला ब्लॉक करायची आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.