Smoked Biscuit : जगभरात विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. त्याबद्दल जाणून घेतल्यानंतर किळस वाटते. पण काही गोष्टी अशा असतात ज्या व्यक्तींनीच इन्वेंट केलेल्या असतात आणि फार विचित्र असतात. त्यापैकीच एक म्हणजे स्मोक्ड पदार्थ. गेल्या काही दिवसांपासून स्मोक्ड पदार्थांची क्रेझ अत्याधिक वाढल्याचे दिसून आले आहे.
चॉकलेट बिस्किट, व्हेनिला बिस्किट आणि अन्य काही फ्लेवर्स असतात. जे वेगवेगळ्या गोष्टींपासून तयार केले जातात. पण स्मोक्ड बिस्किट म्हणजे नक्की काय हे तुम्हाला माहितये का?
स्मोक्ड बिस्किट म्हणजे नक्की काय?
स्मोक्ड बिस्किट म्हणजे खाल्ल्यानंतर लगेच तोंडातून धूर निघू लागतो. जसे की, धुम्रपान केल्यानंतर धूर निघतो. दुकानदार स्मोक्ड बिस्किटला सामान्य बिस्किटांचया तुलनेत अधिक किंमतीत विक्री करतात. जसे की, फायर पान खाल्ल्यानंतर तोंडातून धूर निघतो त्याचप्रमाणे स्मोक्ड बिस्किट खाल्ल्याने तोंडातून धुर निघतो. खरंतर स्मोक्ड बिस्किट अथवा पान अत्याधिक प्रमाणात खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. (Smoked Biscuit)
कसे तयार केले जाते स्मोक्ड बिस्किट?
स्मोक्ड बिस्किट वेगवेगळ्या पद्धतीने तयार केले जात नाहीत. यामध्ये सामान्य बिस्किटचाच वापर केला जातो. पण बिस्किट लिक्विड नाइट्रोजनमध्ये बुडवले जाते. यामुळे बिस्किट खाल्ल्यानंतर तोंडातून धुर येतो.