Home » दक्षिण दिशेला पाय करुन का झोपू नये?

दक्षिण दिशेला पाय करुन का झोपू नये?

आपल्या दिनचर्येमधील सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप. पुरेश्या झोपेमुळे आपण काही आजारांपासून दूर राहतो.

by Team Gajawaja
0 comment
sleeping direction
Share

आपल्या दिनचर्येमधील सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप. पुरेश्या झोपेमुळे आपण काही आजारांपासून दूर राहतो. याबद्दल काही शास्रांमध्ये सुद्धा दिले आहे की, झोपताना आपले पाय दक्षिणेला नसावेत. म्हणजेच उत्तर दिशेला डोक ठेवून झोपावे. पूर्व किंवा दक्षिण दिशेला डोकं करुन झोपले तरीही चालते. या दिशेला डोक करुन झोपल्यास दीर्घायुष्य लाभते असे मानले जाते. या विरुद्ध उत्तर किंवा पश्चिम दिशेला डोकं ठेवून झोपल्यास आरोग्यास नुकसान पोहचते. शास्रानुसार हा अपशकुन सुद्धा मानला जातो. तर जाणून घेऊयात झोपण्यासंदर्भातील काही खास गोष्टी आणि त्यामागील वैज्ञानिक तर्क. (Sleeping direction)

झोपेचा आपल्या शरिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी सखोल संबंध आहे. हेच कारण आहे की, आपले ऋषी मुनींनी सुद्धा यासाठी काही नियम ठरवले होते. जेणेकरुन झोपेमुळे अधिकाधिक लाभ होईल. संध्याकाळाच्या वेळेस झोपू नये, झोपताना दक्षिण दिशेला पाय नसावेत असे काही नियम शास्रांमध्ये दिले आहेत.

कोणत्या दिशेला डोकं असावे-
पूर्व किंवा दक्षिण दिशेला डोकं ठेवून झोपल्याने काही आजारांपासून आपण दूर राहतो. वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिल्यास ध्रुवाच्या आकर्षणामुळे दक्षिण ते उत्तर दिशेकडून प्रगतिशील विद्युत प्रवाह आपल्या डोक्यात प्रवेश करतो आणि पायांच्या दिशेने निघून जातो. असे केल्याने आपल्याला भोजन पचले जाते. सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा फ्रेश राहतो. त्यामुळेच रात्री झोपताना दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये.

दक्षिण दिशेला पाय आणि उत्तर दिशेला डोकं
ही असी पोजिशन आहे ज्यामध्ये एखादे शव ठेवले जाते. या दिशेला कधीच झोपू नये. जेव्हा आपण उत्तर दिशेला डोकं करुन झोपतो तेव्हा आपल्याला वाईट स्वप्न येतात आणि आपली झोप होत नाही.

पृथ्वीचा उत्तर आणि डोक्याचा उत्तर दोन्ही गोष्टी एकत्रित आल्यास तर प्रतिकर्षण बल काम करते. उत्तरेला तुम्ही जेव्हा डोकं ठेवता तेव्हा प्रतिकर्षण बल काम करू लागते. जर शरिरात संकुचन आल्यास तर रक्तप्रवाह पूर्णपणे नियंत्रणाबाहेर होतो. ब्लड प्रेशर वाढल्यास झोप ही येत नाही. मन नेहमीच चंचल राहते.

पूर्व दिशेबद्दल पृथ्वीसंदर्भात रिसर्च करणाऱ्या वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की, पूर्व दिशा ही न्यूट्रल आहे. म्हणजेच तेथे ना अधिक आकर्षण बल आहे ना प्रतिकर्षण बल. जरी असेल तरीही त्या दोघांचा समतोल आहे. त्यामुळे जर तु्म्ही पूर्व दिशेला पाय करून झोपलात तर तुम्ही सुद्धा न्युट्रल रहाल. तुम्हाला शांत झोप लागेल. (Sleeping direction)

या व्यतिरिक्त डाव्या कुशीत झोपण्यामागे सुद्धा वैज्ञानिक कारण आहे. हे प्रक्रिया स्वर विज्ञानावर आधारित आहे. आपल्या नाकातून जो श्वास बाहेर पडतो आणि आतमध्ये येतो त्याला स्वर असे म्हटले जाते. नाकाच्या डाव्यापुडीतून श्वास घेणे आणि सोडण्याच्या क्रियेला चंद्र स्वर असे म्हटले जाते. अशाच प्रकारे डाव्या बाजूला सूर्य स्वर असे म्हटले जाते. सुर्य स्वर नेहमीच आपल्या शरिरात उष्मा तयार करते. यामुळे जेवण पचण्यास मदत होते. त्यामुळेच आपल्या शास्रात सुद्धा डाव्या कुशीत झोपण्यास सांगितले आहे.

हेही वाचा- ‘या’ चुकीच्या सवयींमुळे तुम्ही व्हाल Insomnia चे शिकार

रात्री जेवल्यानंतर लगेच झोपू नये. झोपण्यापूर्वी मेडिटेशन किंवा देवाचे नामस्मरण करावे. या व्यतिरिक्त झोपण्याआधी दुसऱ्या दिवशीच्या कामांचे टाइम टेबल बनवले तर अधिकच उत्तम. हात-पाय स्वच्छ धुतल्यानंतर पूर्व किंवा दक्षिणेला डोक करुन डाव्या कुशीत झोपल्याने अनेक फायदे होतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.