सनातन धर्माचा विचार केला तर या धर्मामध्ये प्रत्येक देवी देवतांची एक खास दिवस ठरवण्यात आला आहे. तो दिवस त्या देवाला समर्पित असतो. असाच एक हिंदू धर्मातील एक महत्वाचा दिवस म्हणजे स्कंद षष्ठी. स्कंद षष्ठी ही हिंदू दिनदर्शिकेनुसार दर महिन्याला शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला असते. स्कंद षष्ठीचे व्रत अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे मानले जाते. स्कंद षष्ठीच्या दिवशी भगवान शंकराचे ज्येष्ठ पुत्र आणि देवतांचे सेनापती भगवान कार्तिकेय यांची पूजा केली जाते. भगवान कार्तिकेयचे बहुतांश भक्त तामिळ हिंदू आहेत. त्यांची विशेषत: तामिळनाडू आणि भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये पूजा केली जाते. भगवान स्कंदाचे सर्वात प्रसिद्ध मंदिर तामिळनाडूमध्येच आहे.
खासकरून दक्षिण भारतात भगवान कार्तिकेयाची पूजा केली जाते. मान्यता आहे की, तारकासुर राक्षसाचा वध करून भगवान कार्तिकेय यांनी जगाला त्याच्या अत्याचारापासून वाचवले. भगवान कार्तिकेयची पूजा केल्याने मनुष्याला मोठे लाभ होतात. स्कंद हे कार्तिकेयाचे दुसरे नाव आहे. म्हणून या व्रताला स्कंद षष्ठी असे नाव देण्यात आले आहे. याशिवाय या व्रताला संत षष्ठी असेही म्हणतात. स्कंद षष्ठीचे व्रत कुटुंबात सुख-शांती आणि संतानप्राप्तीसाठीही विशेष महत्त्व आहे. यंदा हे व्रत शनिवार, २७ सप्टेंबर रोजी पळाले जाणार आहे. स्कंद षष्ठीला रवि योग आणि सर्वार्थ सिद्धी योग असे अतिशय शुभ योग तयार होत आहे. (Marathi)
पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची षष्ठी तिथीची सुरुवात २७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.०३ वाजता सुरु होणार आहे. उद्यतिथीनुसार स्कंद षष्ठीचे व्रत २७ सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे. या शुभ मुहूर्तावर भगवान कार्तिकेयेची पूजा केल्यास भक्ताला अपेक्षित यश मिळते. दरम्यान या स्कंद षष्ठीला रवि योग आणि सर्वार्थ सिद्धी योग असे अतिशय शुभ योग तयार होत आहे. रवी योगामुळे सूर्यदेवाचे आशीर्वाद मिळतात आणि सर्व नकारात्मक प्रभाव दूर होतात. (Navratri)
मान्यतेनुसार सर्वार्थ सिद्धी योग या योगामध्ये केलेली पूजा अधिक फायदेशीर मानली जाते. सर्व इच्छा आणि प्रयत्नांमध्ये यश मिळवून देणारा हा योग मानला जातो. या योगाच्यावेळी भगवान कार्तिकेयाची पूजा केल्याने व्यक्तीच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. या दुर्मिळ योगायोगांमुळे स्कंद षष्ठीचे व्रत आणि पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते. स्कंद षष्ठीचे व्रत चैत्र, आश्विन आणि कार्तिक षष्ठीपासून सुरू करणे शुभ मानले जाते. स्कंद षष्ठी व्रताची शुभ मुहूर्त आणि उपासना पद्धत जाणून घ्या. (ToDAYS Marathi Headline)
स्कंद षष्ठीच्या व्रताचा पूजा विधी
या दिवशी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. देव्हाऱ्या स्वच्छ करावा. मंदिरात ताजी फुले ठेवावीत. यानंतर पदावर भगवान कार्तिकेयाची मूर्ती किंवा चित्र ठेवावे. अगरबत्ती लावल्यानंतर चंदन लावावे. त्यानंतर फळे व फुले अर्पण करावीत. भगवान कार्तिकेयाची चंपा फुलांनी पूजा करण्याचा विशेष विधी आहे. त्यानंतर दीप प्रज्वलित करून कार्तिकेयची पूजा करावी. या दिवशी भगवान कार्तिकेयच्या मंत्रांचा जप करावा. यासोबतच स्कंदषष्ठी व्रताचे पठण करावे. शेवटी देवाची आरती अवश्य करावी. मोराची पिसे कार्तिकेयाला खूप प्रिय आहेत. यानंतर ओम स्कंदाय नमः या मंत्राचा एक जप करावा. षष्ठी कवच पठण करावे. (Marathi News)
कापूराने भगवान कार्तिकेयची आरती करा आणि मिठाई आणि फळे अर्पण करा. मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा. संध्याकाळी पुन्हा पूजा. दुसऱ्या दिवशी पूजा करून उपवास सोडावा. स्कंद षष्ठी व्रतामध्ये एका वेळी अन्न सेवन करता येते. दिवसा फळे खाऊ शकतात. स्कंद षष्ठीनिमित्त मंदिरांमध्ये शिव-पार्वतीची विशेष पूजा केली जाते. तसेच या दिवशी स्कंददेव कार्तिकेयाची स्थापना व पूजा करून अखंड दिवे लावले जातात. विशेष कार्य सिद्धीसाठी यावेळी केलेली उपासना विशेष फलदायी ठरते. (Top Marathi News)
स्कंद षष्ठी व्रताचे महत्त्व
स्कंदपुराणातील नारद-नारायण संवादात या व्रताचे नियम सांगितले आहेत. षष्ठीला एक दिवस आधी अर्थात पंचमीला उपवास करून कार्तिकेयाची पूजा करावी. भगवान कार्तिकेयचे हे व्रत केल्यास शत्रूंवर विजय प्राप्त होतो. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या समस्याही दूर होतात. पुराणानुसार स्कंद षष्ठीच्या उपासनेने च्यवन ऋषींना डोळ्यांची ज्योती प्राप्त झाली. असे म्हटले जाते की हे व्रत योग्य प्रकारे पाळल्यास संतती सुख प्राप्त होतो. दुसरीकडे, जर तुम्हाला आधीच मूल असेल आणि मुलाला कोणतीही समस्या किंवा कोणत्याही प्रकारची आरोग्य समस्या असेल तर हे व्रत मुलाचे या सर्वांपासून संरक्षण करण्यास मदत करते. (Latest Marathi Headline )
भगवान कार्तिकेय हे षष्ठीतिथी आणि मंगळ ग्रहाचे स्वामी असल्याचे सांगितले जाते. म्हणजेच ज्याच्या कुंडलीत मंगळाची स्थिती चांगली नाही किंवा ज्या राशीत मंगळ दुर्बल आहे अशा व्यक्तीने आज स्कंद षष्ठीच्या दिवशी भगवान कार्तिकेयची पूजा करावी आणि त्याच्यासाठी व्रत करावे. भगवान कार्तिकेयाचे निवासस्थान दक्षिण दिशेला असून त्यांचे वाहन मोर असल्याचे सांगितले जाते. (Top Marathi Headline)
एखाद्या कुटुंबात कोणाला भयंकर आजार झाला असेल तर कुटुंबातील व्यक्तीने हे व्रत पाळावे आणि पूजेत मोराची सात पिसे ठेवावीत. पूजेच्या दुसऱ्या दिवशी ही मोराची पिसे रुग्णाच्या उशीत ठेवावीत आणि तीच उशी रुग्णाला लावायला सांगावी. या आजारात सात दिवसात आराम मिळतो. स्कंद षष्ठीचे व्रत केल्याने ग्रह दोषही शांत होतात. हे व्रत केल्याने शनि, कालसर्प, ग्रहण दोष इत्यादीपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख-शांती प्राप्त होते, अशी धारणा आहे. (Top Marathi Headline)
स्कंद षष्ठी व्रत कथा
पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान शिवाची पत्नी ‘सती’ यांनी वडील दक्ष यांच्या यज्ञात भस्मात उडी मारली तेव्हा शिव शोक करत होते आणि गहन तपश्चर्येत मग्न झाले होते. असे केल्याने विश्व शक्तीहीन होते. राक्षस या संधीचा फायदा घेतात आणि तारकासुर नावाचा राक्षस पृथ्वीवर सगळीकडे दहशत पसरवतो. देवांना पराभवाला सामोरे जावे लागते. सगळीकडे कोलाहल पसरतो आणि सर्व देव ब्रह्मदेवाची प्रार्थना करतात. तेव्हा ब्रह्माजी म्हणतात की शिवपुत्र तारकांचा अंत होईल. (Latest Marathi News)
इंद्र आणि इतर देव भगवान शिवाकडे जातात, त्यानंतर भगवान शंकर पार्वतीच्या प्रेमाची परीक्षा घेतात आणि पार्वतीच्या तपश्चर्येवर प्रसन्न होतात आणि अशा प्रकारे, एका शुभ मुहूर्तावर, शिव आणि पार्वतीचा विवाह होतो. अशा प्रकारे कार्तिकेयाचा जन्म होतो. कार्तिकेय तारकासुराचा वध करतो आणि देवांना त्यांचे स्थान प्राप्त करवून देतो. (Top Trending News)
=======
Durga Puja : सप्तमीपासून सुरु होणाऱ्या दुर्गा पूजेची संपूर्ण माहिती
Uttar Pradesh : या मंदिरात होते, देवीच्या पाळण्याची पूजा !
=======
पुराणानुसार भगवान कार्तिकेयाचा जन्म षष्ठीतिथीला झाला होता, त्यामुळे या दिवशी त्यांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. शिव पुत्र कार्तिकेय यांना सुब्रमण्यम, मुरुगन आणि स्कंद म्हणूनही ओळखले जाते. कार्तिकेयाची पूजा प्रामुख्याने दक्षिण भारतात केली जाते. अरबस्तानातील याझिदी जातीचे लोकही त्यांची पूजा करतात, ते त्यांचे मुख्य दैवत आहे. उत्तर ध्रुवाजवळील उत्तर कुरुच्या एका विशिष्ट प्रदेशात त्यांनी स्कंद नावाने राज्य केले. त्यांच्या नावावरून स्कंदपुराण असे आहे. (Social News)
(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics