Home » साठ वर्षाची आजी बनली मिस युनिव्हर्स

साठ वर्षाची आजी बनली मिस युनिव्हर्स

by Team Gajawaja
0 comment
Miss Universe
Share

वयाची चाळीशी ओलांडली की, महिलांना अनेक प्रश्न सतावू लागतात.  त्यांच्या मासिक पाळीच्या तारखा बदलतात.  मोनोपॉज नावाचा रोग त्यांना त्रस्त करतो. काहीवेळा कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करता करता या महिला स्वतःला विसरुनच जातात.  अशाच धावपळीत आणखी दहा वर्ष गेल्यावर वयाची पन्नाशी येते. या टप्प्यावर तर बहुतांशी महिला स्वतःला ज्येष्ठ नागरिक म्हणून समजायला लागतात. (Miss Universe)

आणखी दहा वर्षानंतर याच महिला मग आजीच्या भूमिकेत जातात.  मुला-मुलींची मुले सांभाळतांना त्यांची तारांबळ होते. मात्र या सर्व महिलांना आरसा दाखवणारे काम अर्जेंटिनाच्या तरुणीने केले आहे.  या तरुणीचे वय आहे, अवघे ६० वर्षे आणि या साठ वर्षाच्या तरुणीने सौदर्यस्पर्धा जिंकून सर्वांनाच आश्चर्यचकीत केले आहे. अर्जेंटिनाची ही साठीची तरुणी आता पुढच्या स्पर्धेची तेवढ्याच तडपेनं तयारी करत आहे.  यापट्ट्यावर ती यशस्वी झाल्यावर अर्जेंटिनाचे २०२४ मध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी ती नेतृत्व करत जगभरातील सौदर्यवतींना आव्हान देणार आहे.  

अर्जेंटिनाच्या स्थानिक पातळीवरील सौदर्यस्पर्धेमध्ये एक लक्षणिय घटना घडली. यामुळे अवघ्या जगभरातील महिलांचे लक्ष वेधून घेतले आहे. येथे ६० वर्षीय अलेजांड्रा मारिसा रॉड्रिग्जने मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्स २०२४ या स्पर्धेत विजेतेपदाच मुकुट जिंकून एक नवा इतिहास रचला आहे. सध्या याच ६० वर्षीय अलेजांद्र मारियाचे फोटो सर्वाधिक व्हायरल होत आहेत. अलेजांड्रा मारिया ही पेशानं वकील आणि पत्रकार आहे. जगभरातील सौदर्याच्या ज्या व्याख्या आखून दिल्या आहेत, त्या व्याख्या तोडून अलेजांड्रा मारिया सौदर्यवती स्पर्धेची विजेती झाली आहे. त्यामुळेच तिच्या या विजयाचे रहस्य आणि तिच्या फिटनेसचे रहस्य जाणण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. (Miss Universe) 

सौदर्य स्पर्धा म्हणजे केवळ शारीरिक सौदर्य महत्त्वाचे नसते.  तर त्यात तुमचा फिटनेस, बुद्धीमत्ता याचीही चाचणी होते. यासर्वात सरस ठरलेल्या अर्जेंटिनाच्या अलेजांड्रा मारिसा रॉड्रिग्ज या ६० वर्षीय महिलेनं सौदर्यवतीचा मान मिळवला आहे.  मुळात ३० वर्षीय अलेजांड्रा मारिसाने सौदर्य स्पर्धेत भाग घेतल्यावर तिची काहींनी टिंगल केली होती.  तिच्याबद्दल आणि तिच्या वयाबद्दलही टिका झाली.  ती या स्पर्धेत टिकूच शकणार नाही, अशा बातम्याही प्रसिद्ध झाला.  पण आपल्या टिकाकारांना चोख उत्तर देत अअलेजांड्रा मारिसा विजयी ठरली.  अलेजांड्रा मारिसा रॉड्रिग्ज अर्जेंटिनाच्या ब्युनोस आयर्स प्रांताची राजधानी ला प्लाटा येथील रहिवासी असून अलेजांड्रा व्यवसायाने वकील आणि पत्रकार आहे. 

वयाच्या ६० व्या वर्षी मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्स 2024 चा मुकुट जिंकून, अलेजांड्रा मारिसा रॉड्रिग्जने सौदर्यस्पर्धेतील ठराविक वयाच्या तरुणींच्या वर्चस्वाला चोख प्रत्युत्तर दिले आहे.  त्यासोबत सौंदर्यस्पर्धेत वयाचा अडसर घालणा-यांनाही अलेजांड्राने खडे बोल सुनावले आहेत. अलेजांड्राच्या या यशाने जगभरातील महिलांना प्रेरणा मिळणार आहे. अलेजांड्रा च्या यशाचे सर्वच मान्यवर वृत्तसंस्थांनी एक ऐतिहासिक क्षण आणि शतकानुशतके स्मरणात राहील असे यश, अशा शब्दात वर्णन केले आहे. (Miss Universe)  

अर्थातच अलेजांड्राला हे यश सहससाध्य मिळाले नाही. वयाच्या साठीतही  ती वीशीच्या तरुणीसारखी फिट आहे. कारण ती आहार आणि व्यायाय या दोन्ही गोष्टी चांगल्या पद्धतीनं सांभाळते.  शिवाय आपल्या दैनंदिन कामात ती प्रचंड व्यस्त राहते. आपल्या आसपास काय घडत आहे, यासाठी वृत्तपत्राचे वाचन आणि जगभरातील बातम्यांची ती नेहमी नोंद घेते. 

यामुळेच अलेजांड्राने तिच्यासोबत आलेल्या  ३४ सुंदर महिलांना मागे टाकत मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्स २०२४ हा किताब पटकावला आहे.  वास्तविक, मिस युनिव्हर्स संस्थेने गेल्या वर्षीच या स्पर्धेसाठी वयोमर्यादा काढून टाकली होती. आता या निर्णयानंतर अवघ्या वर्षभरात अलेजांद्राने हे विजेतेपद पटकावले आहे. (Miss Universe)

गेल्या वर्षी या स्पर्धेसाठी झालेल्या बदलांमुळे १८ वर्षांवरील कोणतीही महिला या सौंदर्य स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहे.  त्याआधी फक्त १८ ते २८ वयोगटातील महिलाच या स्पर्धेत भाग घेऊ शकत होत्या.  या विजयानंतर अलेजांड्राने सौंदर्याला वय नसते. आपल्या धैर्याने आपण सर्व अडथळे पार करू शकतो, असे आवाहन सर्व महिलांना केले आहे.  अलेजांड्रा आता २५ मे २०२४ रोजी होणाऱ्या मिस युनिव्हर्स अर्जेंटिना स्पर्धेची तयारी करत आहे.  जर अलेजांड्राने हा किताब जिंकला तर ती मिस युनिव्हर्स २०२४ मध्ये अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व करणार आहे.  अलेजांड्राच्या भावी यशासाठी आता अनेक महिला तिला शुभेच्छा देत आहेत.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.