Home » सिंहस्थ महाकुंभ उज्जैन

सिंहस्थ महाकुंभ उज्जैन

by Team Gajawaja
0 comment
Simhastha Mahakumbh
Share

सिंहस्थ महाकुंभमेळा हा हिंदू धर्मासाठी मोठा उत्सव असतो. दर बारा वर्षांना होणारा सिंहस्थ महाकुंभ (Simhastha Mahakumbh) आता 2028 मध्ये मध्यप्रदेशामधील उज्जैन नगरीमध्ये होणार आहे. बाबा महाकालच्या नगरीमध्ये होणा-या या महाकुंभची तयारी आतापासूनच सुरु झाली आहे. नुकत्याच या महाकुंभ मेळ्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून या मेळ्यासाठी करोडो रुपयांची विकासकामे उज्जैनमध्ये करण्यात येत आहेत. 2028 साली उज्जैन शहरात होणाऱ्या या सिंहस्थ कुंभमेळ्याचे (Simhastha Mahakumbh) आयोजन लक्षात घेऊन श्री महाकालेश्वर नगरीत भव्य भक्त निवासही बांधण्यात येणार आहे. उज्जैन येथे होणारा सिंहस्थ महापर्व 27 मार्च 2028 ते 27 मे 2028 या कालावधीत होणार आहे. या काळात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

कुंभमेळा हा एक हिंदू आध्यात्मिक मेळा आहे. पवित्र नद्यांच्या काठावर हा मेळा भरतो. पूर्ण कुंभमेळा प्रयागराज, उज्जैन, नाशिक येथील त्र्यंबकेश्वर, हरिद्वार येथे होतो. आता पुढचा महाकुंभ मेळा बाबा महाकालची नगरी उज्जैनमध्ये 2028 मध्ये होत आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्याची (Simhastha Mahakumbh)  तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. कारण या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी (Simhastha Mahakumbh) देशभरातून आणि विदेशातूनही करोडो भाविक उज्जैन नगरीमध्ये दाखल होणार आहेत. या भाविकांच्या सोयीसाठी आणि यानिमित्त येणा-या साधुसंतांसाठी सर्व व्यवस्था करण्यासाठी आता उज्जैन नगरीमध्ये भव्य विकासकामे सुरु झाली आहेत. यासाठी या नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण सुरु करण्यात आले आहे.

क्षिप्रा नदीच्या काठावर 200 रोपांची लागवड करण्यात आली. या संपूर्ण कामाच्या पाहणीसाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. त्यानुसार उज्जैन-इंदूर विभागाचा सिंहस्थ-2028 साठी धार्मिक-आध्यात्मिक सर्किट म्हणून विकास करण्यात येणार आहे. 27 मार्च 2028 ते 27 मे 2028 या कालावधीत होणा-या या महापर्वात विविध कार्यक्रम होणार आहेत. 9 एप्रिल ते 8 मे या कालावधीत 3 शाही स्नान आणि 7 पर्व स्नान होणार आहेत. यासाठी देशभरातील मान्यवर आखाडे सहभागी होणार आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात साधुसंतही यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या विकासकामांना आत्तापासून वेग आला आहे. सिंहस्थ महापर्वासाठी सुमारे 14 कोटी भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यांच्या सोयीसाठी सिंहस्थ महापर्वात (Simhastha Mahakumbh) 18 हजार 840 कोटी रुपयांची 523 कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

उज्जैननगरीचा विकास गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. आता त्यात सिंहस्थ कुंभमेळा जाहीर झाल्यानं महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या नगरीत विकास कामांना सुरुवात करण्यात आली आहे. उज्जैनमध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा(Simhastha Mahakumbh)  हा एक भव्य करण्यात येणार आहे. क्षिप्रा नदीच्या काठी होणा-या या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी (Simhastha Mahakumbh) प्रशासन सज्ज झाले आहे. क्षिप्रा नदीच्या काठावर श्री महाकालेश्वर व्यवस्थापन समिती 2 हजार 250 खोल्यांचे भक्त निवास उभारणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात करोडो भक्त सहभागी होतात. त्यांच्या सुविधेसाठी इंदौर मार्गावरही असेच मोठे भक्त निवासस्थान उभारण्यात येणार आहे. तसेच कुंभमेळ्यात(Simhastha Mahakumbh)  वाहन पार्किंगच्या जागांचीही आत्तापासून नोंदणी करण्यात येत आहे. याशिवाय मदत केंद्र, चार्जिंग युनिटसह ई-स्टेशन, ई-वाहन स्टँड यांचीही उभारणी करण्यात येत आहे. शिवाय भक्त निवास ते श्री महाकालेश्वर मंदिरापर्यंत अभ्यागतांना मोफत वाहतूक प्रदान करण्यात येणार आहे.

==========

हे देखील पहा : ‘या’ मंदिरात होतो महाशिवरात्रीला चमत्कार!

==========

2028 साली उज्जैन शहरात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी (Simhastha Mahakumbh) अन्नक्षेत्रही उभारण्यात येत आहेत. सुमारे 15 कोटी रुपये खर्च करुन वातानुकूलित सुविधा बांधण्यात येत आहेत. या सुविधा केंद्राच्या तळमजल्यावर चौकशी केंद्र, शू स्टँड, लॉकर, मोबाईल लॉकर, स्टोअर, टॉयलेट, तिकीट काउंटर, भक्तांसाठी प्रतीक्षालय आदी मूलभूत सुविधा उपलब्ध असतील. सुविधा केंद्र-3 च्या पहिल्या मजल्यावर फूड कोर्टही बांधण्यात येणार आहे. अग्निशामक यंत्रांसारखी सुरक्षा व्यवस्थाही असेल. विमानतळाच्या धर्तीवर सुविधा केंद्र-3 बांधण्यात येणार आहे.
महाकुंभ मेळ्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक उज्जैन नगरीत दाखल होणार आहेत. यासाठी येथील रेल्वेस्थानकांमध्येही नव्या मार्गिकांचे काम सुरु झाले आहे. मुख्य शहरांमधून उज्जैनला थेट रेल्वे व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यातून भाविक थेट या नगरीत दाखल होतील अशी योजना आहे.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.