Home » कोव्हिड लसीचे दुष्परिणाम जाहीर

कोव्हिड लसीचे दुष्परिणाम जाहीर

by Team Gajawaja
0 comment
Covishield Vaccine
Share

टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते हृदयात, दुनियादारी या चित्रपटातील या गाण्यासारखी कोविशिल्ड लस घेतलेल्यांची अवस्था झाली आहे.  कोव्हिड-१९ महामारीपासून बचाव करण्यासाठी घेतलेल्या या लसीचे दुष्परिणाम जाहीर झाल्यावर तमाम लसधारकांच्या ह्दयाची धडकन वाढली आहे.  कारण कोविशील्डमुळे रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात, हे ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी AstraZeneca ने कोर्टात कबूल केले आहे. (Covishield Vaccine)

कोविड-१९ लसीमुळे धोकादायक दुष्परिणाम होऊ शकतात.  AstraZeneca ची ही लस भारतात कोविशिल्ड म्हणून ओळखली जाते. या लसीमुळे TTS होऊ शकते. यात शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि प्लेटलेट्सची संख्या कमी होते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि लखवा मारण्याचा धोका असतो. कोविशिल्डचे १७५ कोटी डोस भारतात दिले गेले आहेत. ही लस देशातील ८० टक्के लोकसंख्येला देण्यात आली आहे. 

ब्रिटिश उच्च न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये, AstraZeneca ने दुष्परिणाम मान्य केले आहेत. मात्र, या लसीमुळे होणारे दुष्परिणाम मान्य करूनही कंपनी या लसीमुळे होणाऱ्या आजारांच्या किंवा दुष्परिणामांच्या दाव्याला विरोध केला आहे. तमाम भारतासाठीही ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे.  कारण  भारतीय कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने AstraZeneca कडून मिळालेल्या परवान्याअंतर्गत ही लस देशात तयार केली. (Covishield Vaccine)

ही लस भारताच्या कोविड लसीकरण मोहिमेत वापरली गेलीच. शिवाय  जगातील अनेक देशांमध्ये निर्यातही झाली आहे. Covishield व्यतिरिक्त, ही लस अनेक देशांमध्ये Vaxjaveria या ब्रँड नावाने विकली गेली. आता ही बाब उघड झाली कारण AstraZeneca  या कंपनीविरुद्ध जेमी स्कॉट यांनी खटला दाखल केला आहे.  जेमी स्कॉट यांनी ही लस घेतली आणि त्यांच्या मेंदूला नुकसान झाले आहे. जेमी यांनी कंपनीकडून शरीराला झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव ब्रिटनने आता या लसीवर बंदी घातली आहे. कंपनीच्या या मान्यतेनंतर नुकसानभरपाईची मागणी करणाऱ्यांची संख्याही वाढू शकते.  कारण या लसीच्या दुष्परिणामांची अनेक कुटुंबांनी न्यायालयात तक्रारही केल्या आहेत.  

या सर्वांबाबत चालू असलेल्या लस निर्माता AstraZeneca ने ब्रिटीश न्यायालयात प्रथमच दिलेल्या कबुली जबाबानं जगभरात खळबळ उडाली आहे.   त्यांच्या कोविड-१९ लसीमुळे TTS सारखे दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात. TTS म्हणजेच थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोममुळे शरीरात रक्त गोठते. यामुळे ग्रस्त व्यक्तीला स्ट्रोक, हार्ट फेल्युअर अशा गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. (Covishield Vaccine)

भारतात कोविड नंतर, ह्दयविकारानं मृत्यू होण्याच्या संख्येत लक्षणीय वाढली झाली.  त्यामागे कोरोनाची लस असल्याचा आरोप करण्यात येत होता.  मात्र यासंदर्भात अधिक संशोधन झाले नाही. तसेच अनेक तक्रारदारांना अन्यही शारीरिक समस्या जाणवत होत्या.  पण यामागे कोविशिल्ड असल्याचा दावा फेटाळण्यात आला. आता कंपनीच्या या मान्यतेनंतर भारतातही खटल्यांची फेरी सुरू होण्याची शक्यता आहे.

यापूर्वीही केरळमधील नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष जयदेवन यांनी यालसीबाबत शंका व्यक्त केली होती.  कोविशिल्डमुळे अनेकांचे मृत्यू टाळण्यास मदत झाली असली तरी त्या लसीचे काही दुष्परिणाम नाहीत, हे स्विकारता येणार नाही.   आता हा निर्णय आल्यावर वैद्यकीय क्षेत्रात वादविवाद सुरु झाले आहेत.  काही तज्ञांच्या मते, लसींच्या वापरानंतर रक्ताच्या गुठळ्या होणे हे अत्यंत दुर्मिळ आहे. यासंदर्भात काही अहवाल नामांकित जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्डची निर्मिती ही पूर्णपणे त्या फॉर्म्युलाचावापर करत न झाल्याचे सांगितले आहे. (Covishield Vaccine)

============

हे देखील वाचा : पत्रकार ऑस्ट्रेलियाची, प्रश्न पाकिस्तानचा आणि उत्तर अमेरिकेचे

============

त्यामुळे कोविशिल्डच आजाराला पूर्णपणे जबाबदार आहे, याचा इन्कार करण्यात आला आहे. असे असले तरी कंपनीविरोधात ब्रिटीश न्यायालयात, पीडितांनी १००  दशलक्ष पौंडपर्यंत नुकसान भरपाईची मागणी केली आहे. याला सरकार कशापद्धतीनं तोड़ं देते हे महत्त्वाचे आहे.  शिवाय भारतातही यासंदर्भात अधिक संशोधन होण्याची गरज असल्याची मागणी करण्यात येत आहे.  तसेच सिरमनं यासंदर्भात पुढे येऊन पूर्णपणे माहिती द्यावी असेही आवाहन करण्यात आले आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.