कर्नाटकमधील ऐतहासिक विजयाच्या तब्बल सहा दिवसानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला आणि सिद्धरामया यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची तर डी के शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बंगळूरूच्या कांतीरावा स्टेडीयमवर हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. त्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी देशभरातून अनेक महत्वाच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. (CM of Karnataka)
कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे उपस्थित होते. सिद्धरामया यांच्यासोबत आणखी आठ मंत्र्यांनी शपथ घेतली. डॉ. जी. परमेश्वरा, के एच मुनियप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, सतीश जराकिहोली, प्रियांक खर्गे, रामालिंगा रेड्डी, बी झेड झमीर अहमद खान ह्या आठ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.(CM of Karnataka)
कॉंग्रेसच्या मुख्य नेत्यांव्यतिरिक्त देशभरातून अनेक पक्षांच्या नेत्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला, अभिनेते कमल हसन, शिवसेना खासदार अनिल देसाई, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माकप नेते सीताराम येचुरी, भाकप नेते डी. राजा उपस्थित होते.(CM of Karnataka)
निवडणुकीनंतर सिद्धरामया (CM of Karnataka) आणि शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीत तळ ठोकून बसले होते. अखेर यात सिद्धरामया यांनी बाजी मारली आणि मुख्यमंत्रीपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली. मुख्यमंत्रीपद मिळवण्यात ते यशस्वी ठरले यामागे बरेच कारणं सांगितली जात आहेत. महत्वाचं म्हणजे स्वच्छ प्रतिमा आणि ग्रामीण बाजाचा नेता म्हणून ते लोकांमध्ये प्रचलित आहेत.
लोकसंख्येत जवळपास आठ टक्के लोकसंख्या असलेल्या सामुदायचे ते नेते आहेत, त्यामुळे एक मोठी वोट बँक त्यांच्याकडे आहे. मुख्यमंत्रीपदाचा अनुभव गाठीशी असलेले सिद्धारामया अत्यंत कुशल प्रशासक आणि गरिबांना डोळ्यासमोर ठेवून कारभार करणारे नेते असल्याचं सांगितलं जात. मागच्या तीन साडेतीन वर्षांच्या काळात भाजपा त्यांच्यावरील एकही आरोप लावू शकली अथवा सिद्ध करू शकली नाही. निवडणूकानंतर झालेल्या सर्वेक्षणात जवळपास ३९ टक्के लोकांची मुख्यमंत्री म्हणून त्यांना पसंती दिली होती.
=======
हे देखील वाचा : तहव्वूर राणाला भारतात आणणार…
=======
याउलट शिवकुमार यांच्यावर बरेच आरोप आणि केसेस दाखल झालेल्या आहेत. निवडणूकापूर्वी बरेच दिवस ते जेलमध्ये होते. भाजपा हेच मुद्दे धरून सरकारला टार्गेट करू शकते या भीतीमुळेच शिवकुमार यांना टाळल्याचे बोलले जाते. शिवकुमार यांचा स्वभाव तितकासा सर्वसमावेशक नाही. माझ्याशी जुळत नसेल तर जाऊ शकता असा त्यांचा स्वभाव असल्याचे सांगण्यात येते. निवडून आलेल्या आमदारांपैकी बऱ्याचशा आमदारांची सिद्धारामया (CM of Karnataka) यांच्या नावाला पसंती आहे त्याचबरोबर निवडणुकानंतर झालेल्या सर्वेक्षाणात केवळ ४ टक्के लोकांनी त्यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली होती. इत्यादी कारणांमुळे शिवकुमार यांच्या हातून मुख्यमंत्रीपद निसटल्याचे बोलले जाते.