Home » Shreyas Iyer : ३ टीम, ३ फायनल अय्यरचा जलवा कायम !

Shreyas Iyer : ३ टीम, ३ फायनल अय्यरचा जलवा कायम !

by Team Gajawaja
0 comment
Shreyas Iyer
Share

आयपीएल २०२५ ची दुसरी क्वालीफायर Match ! मुंबईचं २०३ रनांचं तगडं आव्हान… आणि त्याला चेस करायला उतरलेला पंजाब किंग्सचा संघ… ओपनर्स प्रभसिमरन आणि प्रियांश आर्या स्वस्तात आउट झाले. यानंतर आलेल्या जॉश इंग्लिसने थोडीफार तोडमताडी केली. पण त्याचा विकेट गेला आणि मुंबई इंडियन्सच्या गोटात एकच राडा सुरु झाला. मुंबई फायनलला जाणार म्हणजे जाणार… हेच सगळ्यांना वाटत होतं पण मैदानात अजून एक माणूस उभाच होता. पहिल्या क़्वालिफ़ायर मध्ये बँगलोरकडून हरल्यानंतर त्याने एक वाक्य म्हटलं होतं, ‘We lost the battle, not the war ! तो म्हणजे कॅप्टन श्रेयस अय्यर…(Shreyas Iyer)

यानंतर त्याने वन man show वाला गेम दाखवत मुंबईला हैराण करून सोडलं. आपण अनेकदा म्हणतो, bat च्या खाली बॉल देऊ नको… मारेल तो… मुंबईच्या बॉलर्सनी तिच चूक केली आणि पंजाबकडून खेळणाऱ्या या मुंबईकर पठ्ठ्याने लंबे लंबे छक्के हाणले आणि पंजाबला फायनलपर्यंत पोहोचवलं. गोष्ट इथेच संपत नाहीये. आयपीएलच्या इतिहासात तीन वेगवेगळ्या टीम्सना फायनलपर्यंत घेऊन येण्याचा पराक्रम आजवर कोणी करू शकला नाहीये. तो श्रेयस अय्यरने करून दाखवलाय. पण आयपीएलबाहेरही त्याने आपली दमदार captaincy दाखवून दिली आहे. त्यामुळे एकंदरीत त्याची क्रिकेटची गाडी सुसाटच आहे. पण बीसीसीआयच त्याच्याबाबतीत काय बिनसलं आहे, हे जय shahच जाणो… आज आपण श्रेयसचा गेल्या ५-६ वर्षांमधला धमाका पाहणार आहोत. (Shreyas Iyer)

श्रेयस संतोष अय्यर…जन्म मुंबईचा… मुळचा केरळचा… क्रिकेटची आवड आधीपासून म्हणून नेट practice करतच होता. त्याच्या अंगी असलेली चुणूक कोच प्रवीण आमरे यांनी ओळखली. शाळा, कॉलेजकडूनही त्याचं क्रिकेट सुरूच होतं. २०१४ साली त्याने list a क्रिकेटमध्ये डेब्यू केलं. नंतर एमसीएकडून खेळताना विजय हमारे ट्रॉफी, रणजी ट्रॉफी… सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी असा त्याचा प्रवास सुरु झाला. २०१५ ला त्याने दिल्लीकडून आयपीएलमध्ये डेब्यू केलं. २.६ कोटी देऊन दिल्लीने त्याला विकत घेतलं. इथेही आपल्या batting ची चुणूक दाखवल्या नंतर पुढच्या दोनच वर्षात म्हणजे २०१७ साली त्याना बीसीसीआयचा call आला. आणि मग काय भाऊचं इंडियन क्रिकेट टीममध्ये आगमन झालं.

Shreyas Iyer

सुरुवात टी२० पासून झाली. नंतर वनडेमध्येही जागा मिळाली. पण उत्तम खेळ करूनही बीसीसीआयचं कुठेतरी त्याच्यासोबत वाकडच होतं, कधी टीममध्ये घ्या… कधी नका घेऊ… कधी घ्या… कधी नका घेऊ… हे चक्र असच सुरु होतं. एक काळ होता की, जो रणजीमध्ये चांगला performance देईल, तो इंडियन टीममध्ये फिक्स… पण आता आयपीएलच्या बेसवर टीम सिलेक्शन होतं. त्यात दिल्ली capitals ने त्याला थेट captaincy ची संधी दिली. आणि त्याने त्या संधीचं सोन करून दाखवलं. २०१९ मध्ये दिल्लीला त्याने प्लेऑफस मध्ये पोहोचवलं. यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे २०२० साली दिल्ली आपल्या आयपीएल इतिहासातील पहिलीच फायनल match खेळली. हे सगळ श्रेयसच्या नेतृत्वात शक्य झालं.(Shreyas Iyer)

२०२१ ला त्याने श्रेयसने टेस्ट डेब्यू केलं. आणि आपल्या डेब्यूमध्येच त्याने डबल धमाका केला. पहिल्या इनिंगमध्ये त्याने सेंच्युरी ठोकली तर दुसऱ्या इनिंगमध्ये श्रेयसने हाफ सेंच्युरी केली. आणि असा पराक्रम करणारा तो पहिलाच भारतीय क्रिकेटर ठरला. पुढे २०२२ ला त्याने आयपीएलमध्ये कोलकाता टीममध्ये एन्ट्री केली. २२ आणि २३ मध्ये जबरदस्त batting केल्यानंतर कोलकाताने त्याच्या हातात captaincy दिली. कारण २०२३ च्या वर्ल्ड कपमध्ये त्याने दोन सेंच्युरी आणि तीन हाफ सेंच्युरीच्या जोरावर ५३० रन्स करत आपला swag वेगळाच आहे, हे दाखवून दिलं होतं.

२०२४ ला कोलकात्याचा captain म्हणून तो आला आणि १० वर्षांनी कोलकात्याला ट्रॉफी जिंकवून दिली. त्याची captaincy सगळ्यांनीच ओळखली. मुंबईला २०२४ ची रणजी ट्रॉफी जिंकवून देण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता. यानंतर मुंबईने इराणी ट्रॉफी जिंकली, ज्यामध्ये त्याने चांगला खेळ केला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्याने धमाका केला, तीही जिंकली. यंदाच्या Champions Trophy मध्येही श्रेयसने उत्तम खेळ केला. आता इतकं सगळ केल्यानंतर सरपंचांना पुन्हा एकदा captaincy मिलण साहजिकच होतं. पण ही captaincy मिळाली, पंजाब किंग्स टीमकडून… २०१५ साली श्रेयस अय्यरला २.६ कोटींनी विकत घेतलं गेलं होतं, त्याचं श्रेयसची २०२५ साली किंमत २६.७५ लाख इतकी झाली… सक्सेस यालाच म्हणतात.(Shreyas Iyer)

===============

हे देखील वाचा : IPL : बीसीसीआयही साजरा करणार ‘ऑपरेशन सिंदूर’चा विजयोत्सव

===============

श्रेयस प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्स टीममध्ये आला. पंजाब तशी आयपीएलमधली अंडररेटेड टीम…18 वर्षात एकदाच फायनलपर्यंत पोहोचली आहे. त्या टीमला दुसऱ्यांदा फायनलपर्यंत पोहोचवण्याचं काम श्रेयसने करून दाखवलं आहे. आणि यासोबतच तीन वेगवेगळ्या टीम्सना आयपीएलची फायनल दाखवणारा तो पहिला आणि एकमेव कॅप्टन ठरला आहे. इथे एक गोष्ट observe करण्यासारखी आहे की, त्याच्या नेतृत्वात ज्या टीम्स फायनलला गेल्या त्याना फायनलपर्यंत पोहोचायलाही काळ लोटला होता, म्हणजे बघा. दिल्ली पहिल्यांदा फायनलमध्ये गेली, कोलकाता १० वर्षांनी फायनलमध्ये गेली आणि जिंकली आणि पंजाबने ११ वर्षानंतर फायनल गाठली… असा अद्भुत अकल्पनीय चमत्कार करणारा वन end ओन्ली कॅप्टन म्हणजे श्रेयस अय्यर…(Shreyas Iyer)

पण त्याने बीसीसीआयचं काय घोडं मारलं आहे, माहित नाही. कारण प्रत्येक बाबतीत चांगली कामगिरी करत असतानाही त्यांना इंडियन टीममध्ये हवा तसा चान्स कधीच मिळाला नाही. त्याचे एकंदरीत stats पहायचे झाले तर तो आतापर्यंत तो १४ टेस्ट खेळला आहे, ज्यामध्ये त्याने १ सेंच्युरी ५ हाफ सेंच्युरीसोबत ८११ रन्स केले. वनडेमध्ये त्याने ७० matches मध्ये २८४५ रन्स केले, ज्यामध्ये ५ सेंच्युरी आणि 22 हाफ सेंच्युरी आहेत. यासोबतच तो ५१ टी-२० खेळला आहे, यामध्ये ८ हाफ सेंच्युरीसोबत ११०४ रन्स केलेले आहेत. त्यामुळे चांगल्या फॉर्ममध्ये असतानाही त्याला चान्स खूपच कमी मिळाले आहेत. पण आता पंजाबसोबत त्याने आपली जी तगडी captaincy दाखवून दिली आहे, त्यानुसार या मुंबईकर पठ्ठ्याला आतातरी चान्स मिळायला हवा, अशी सर्वच क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.