Home » साईभक्तांसाठी खुशखबर! शिर्डीसाठी रात्री ही विमानाने प्रवास करता येणार

साईभक्तांसाठी खुशखबर! शिर्डीसाठी रात्री ही विमानाने प्रवास करता येणार

by Team Gajawaja
0 comment
Shirdi Sai Baba
Share

साई बाबांच्या भक्तांसाठी खुशखबर आहे. कारण शिर्डीला पोहचण्यासाठी समृद्धी महामार्ग आणि वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन उपलब्ध झाल्याने साई भक्तांना एक मोठे गिफ्ट मिळाले आहे. आता शिर्डीतील विमानतळावर रात्रीच्या वेळी फ्लाइट लँन्डिंगला परवानगी दिली आहे. म्हणजेच आता शिर्डी विमानतळावर रात्री सुद्धा प्लेन टेक ऑफ आणि लँन्ड करणार आहेत डीजीसीएने यासाठी परवानगी दिली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएम नरेंद्र मोदी आणि नागरिक उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे आभार मानले आहेत. (Shirdi Sai Baba)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नाइट लँन्डिंगच्या सुविधेसाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत होते. आता त्यालाच यश मिळाले आहे. कोल्हापूर नंतर आता शिर्डीत नाइट लँन्डिंग आणि टेक ऑफ सुरु होणार आहे.

शिर्डीतील साई बाबांच्या भक्तांसाठी गेल्या दोन महिन्यात ही तिसरी मोठी आनंदाची बातमी आहे. सर्वात प्रथम रस्ते मार्गाची सुविधा वाढवण्यात आली आहे. पीएम मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले गेले. त्यानंतर रेल्वे मार्गाची सुविधा सुरु केली गेली. मुंबईत ते शिर्डीसाठी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची सुरुवात केली गेली. याची सुरुवात ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवत केली. आता विमानाची सुविधा सुरु झाली आहे.

या रात्रीच्या लँन्डिंगच्या सुविधेमुळे साई भक्तांना काकड आरतीसाठी सहभागी होणार आहेत. म्हणजेच आता साई भक्तांना रस्ते, रेल्वे आणि विमान अशा मार्गांनी भक्तांना दर्शनाची सुविधा मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नागरिक उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना आग्रह केला होता.याच अपीलवर विचार करत डीसीजीएने नाइट लँन्डिंग आणि टेक ऑफची सुविधा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. शिर्डी विमातळाची सुरुवात देवेंद्र फडवणीस यांच्या मुख्यमंत्री काळादरम्यान, २०१७ मध्ये झाली होती. डीजीसीएची परवानगी मिळाल्यानंतर आता मार्च-एप्रिल मध्ये रात्री विमान सेवा सुरु होणार आहे. सध्या शिर्डीसाठी १३ विमानांचे उड्डाण होणार आहे. यामुळे केवळ शिर्डी भक्तांना आरामच नव्हे तर आसपासच्या परिसराच्या विकासाला ही नवी दिशा मिळेल. (Shirdi Sai Baba)

हे देखील वाचा- महाशिवरात्री साजरी करण्यामागील महत्व जाणून घ्या

दरम्यान, यंदाच्या नव्या वर्षाच्या सुरुवातीला एका भक्ताने साई बाबांच्या चरणी ४७ लाखांचा सोन्याचा मुकुट चढवला होता. तर नुकत्याच दोन आठवड्यांपूर्वी हैदराबाद मधील एका महिलेने आपल्या पतीच्या स्मरणार्थ साई बाबांना २३३ ग्रॅम वजनाचा सोन्याचे कमळ अर्पण केले होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.