Home » नवरात्राची चौथी माळ – कुष्मांडा देवी पूजन

नवरात्राची चौथी माळ – कुष्मांडा देवी पूजन

by Jyotsna Kulkarni
0 comment
Devi Kushmanda
Share

सध्या सगळेकडे शारदीय नवरात्र मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरे होताना दिसत आहे. घरातील घटस्थापना ते मोठमोठ्या मंडळांमधील देवीची पूजाअर्चना करत सगळेच लोकं देवीच्या भक्तीमध्ये तल्लीन आहे. आपल्या धर्मामध्ये शारदीय नवरात्राला मोठे महत्व आहे. नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा करत आदिमायेला प्रसन्न केले जाते. आज नवरात्राची चौथी माळ आहे.

नवरात्रीच्या चौथ्या दिवसाची प्रमुख देवता देवी कुष्मांडा आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा केली जाते. कुष्मांडा देवीला आठ हात आहेत. दुर्गा देवीचे चौथे स्वरुप असलेली कुष्मांडा देवी अष्टभुजा आहे. ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातांत क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृतकलश, चक्र आणि गदा आहेत. आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे. मनुष्य नेहमी स्वत:मध्येच गुंतलेला असतो. त्यामुळे कधी नकारात्मक विचार, ईर्षा, घृणा, मत्सर त्याच्या मनात सुरू राहतो. या सगळ्यांपासून सुटका करून घेण्यासाठी हिमालयात जाऊन बसणं शक्य नसतं. त्यामुळेच या दिवसांत देवीची उपासना केल्यावर समाधान मिळतं म्हणून ही पूजा करतात.

आपल्या स्मित हास्यामुळे संपुर्ण ब्रह्मांडांत देवी कुष्मांडाला ओळखले जाते. याच स्मित हास्याने देवीने ब्रह्मांडांची उत्पत्ती केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. कुष्मांडा देवीची प्रतिमा ही अतिशय तेजस्वी आणि अष्टभुजाधारी आहे. तिच्या सात हातांत कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृतकलश, चक्र आणि गदा आहेत. आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे. देवीची उपासना केल्यावर समाधान मिळतं म्हणून ही पूजा करतात.

Devi Kushmanda

नवरात्रीतील आई भगवतीचे चौथे रूप कुष्मांडा नावाने परिचित आहे. आपल्या स्मित हास्याद्वारे देवी कुष्मांडा संपूर्ण जगाला मोहून घेते. तीच या ब्रह्मांडाची जन्मदात्री आहे, म्हणून तिला कुष्मांडा असे म्हटले जाते. कु म्हणजे छोटे, उष्म म्हणजे ऊबदार आणि अण्ड म्हणजे तिच्या दिव्य बीजातून ब्रह्माण्ड उत्पन्न झाले, म्हणून देवीला, कुष्मांडा हे नाव दिले गेले. जेव्हा सृष्टीचे अस्तित्त्व नव्हते आणि चारही बाजूंना अंधार होता, तेव्हा देवीने आपल्या `ईषत्’ हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून देवीला सृष्टीची आदि-स्वरूपा म्हटले जाते.

ब्रह्मांडात असलेल्या सर्व मनुष्य आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे. ‘कुष्मांडा’ म्हणजे सर्व प्रकारच्या पीडांपासून रक्षण करणारी असे देखील म्हटले जाते. कुष्मांडा मातेचे ध्यान केल्यामुळे मन शुद्ध होते. मन निरोगी होऊन मनाचे वैश्विक ज्ञान वाढते. मन तेजस्वी होते. कुष्मांडा देवीची उपासना मनु्‍ष्याला रोगापासून मुक्त करून सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे अशी मान्यता सांगितली जाते.

कुष्मांडा देवीची पूजा
देवीचे पूजन करताना लाल रंगाची फुले, जास्वंद किंवा गुलाबाचे फूल आवर्जुन वहावे. यानंतर धूप, दीप आणि नैवेद्य दाखवावा. देवीचे पूजन करताना हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. कुष्मांडा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये दही, साखर फुटाणा असल्यास उत्तम असते. पूजेच्या शेवटी मातेचा मंत्र म्हणा आणि आरती करा.

कुष्मांडा देवीचे मंत्र
ॐ देवी कूष्माण्डायै नमः॥
या देवी सर्वभू‍तेषु माँ कूष्माण्डा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

कुष्मांडा देवीचा नैवेद्य
देवी कुष्मांडाच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाचा पेठा किंवा मिठाई ठेवावी. तसेच पूजेत पांढऱ्या वस्तू देखील ठेवू शकतात. यात प्रामुख्याने मालपुआ आणि बताशे असतात.

========

हे देखील वाचा : नवरात्राची तिसरी माळ – चंद्रघंटा देवी

========

कुष्मांडा देवी आरती

कूष्मांडा जय जग सुखदानी।
मुझ पर दया करो महारानी॥

पिगंला ज्वालामुखी निराली।
शाकंबरी माँ भोली भाली॥

लाखों नाम निराले तेरे ।
भक्त कई मतवाले तेरे॥

भीमा पर्वत पर है डेरा।
स्वीकारो प्रणाम ये मेरा॥

सबकी सुनती हो जगदंबे।
सुख पहुँचती हो माँ अंबे॥

तेरे दर्शन का मैं प्यासा।
पूर्ण कर दो मेरी आशा॥

माँ के मन में ममता भारी।
क्यों ना सुनेगी अरज हमारी॥

तेरे दर पर किया है डेरा।
दूर करो माँ संकट मेरा॥

मेरे कारज पूरे कर दो।
मेरे तुम भंडारे भर दो॥

तेरा दास तुझे ही ध्याए।
भक्त तेरे दर शीश झुकाए॥


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.