प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभमेळ्यासाठी जगभरातून भाविक येणार आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मंत्रीमंडळातील प्रत्येक नेत्याला आणि अधिका-यांना महाकुंभमेळ्याच्या आमंत्रणासाठी देशातील प्रत्येक राज्यात पाठवले आहे. शिवाय परदेशातील अनेक राजदूत आणि परराष्ट्र अधिका-यांना या महाकुंभमेळ्यात सहभागी होऊन अमृतस्नानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. यामुळे महाकुंभमेळ्यात किमान 45 करोड भाविक आणि जगातील अनेक सर्वोच्च नेते, राजनैतिक अधिकारी येण्याची शक्यता आहे. येवढ्या सर्व भाविकांना योग्य सुरक्षा मिळण्यासाठीही प्रयागराज येथे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या सर्वांसाठी सरताज, फरिश्ता, नीलकंठ ही विशेष-15 पोलिस ब्रिगेडची टिम चोवीस तास कार्यरत आहे. हे सरताज, फरिश्ता आणि नीलकंठ म्हणजे, अन्य कोणीही नसून प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात असणारी 130 प्रशिक्षीत घोड्याचे पथक आहे. प्रयागराजसाठी उत्तरप्रदेशमधील अकादमीमधील प्रशिक्षीत घोड्यांना विशेष ड्युटीवर तैनात कऱण्यात येणार आहे. (Prayagraj)
याशिवाय महाकुंभमेळ्यामध्ये अमृतस्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांना कोणतीही गैरसोय वाटू नये म्हणून 40 हजार पोलीस तैनात राहणार आहे. या कुंभमेळ्यात ड्रोनविरोधी बंदुका घेतलेले पोलीस संगम स्नावावर विशेष गस्त घालणार आहेत. चोवीस तास हा सुरक्षा रक्षकांचा गरडा या ठिकाणी राहणार असून या सर्वांवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत आधुनिक असे कॅमेरेही लावण्यात आले आहेत. प्रयागराज येथील हे सुरक्षा कवचही मोठा उत्सुकतेचा विषय झाले आहे. प्रयागराज नगरी महाकुंभमेळ्यासाठी तयार झाली आहे. या भव्य असा नगरीमध्ये हजारो भाविक दाखल झाले आहेत. 13 जानेवारीपासून महाकुंभमेळा सुरु होणार आहे. साधु-संताचे पहिले शाही स्नान झाल्यावर मग भाविक या अमृतस्नानाचा लाभ घेणार आहेत. या सर्वांना कुठलिही गैरसोय वाटू नये आणि सुरक्षतेची हामी वाटावी यासाठी उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं विशेष मोहीम राबवली आहे. महाकुंभमेळा असलेल्या सर्व भागात चोवीस तास 40 हजार पोलीस तैनात आहेत. या सर्वभागात ड्रोन उडणवण्यास विशेष परवानगी घेण्याची सक्ती करण्यात आली आहे. (Social News)
या परवानगीशिवाय जे ड्रोन उडवण्यात येणार आहेत, ते ड्रोन जप्त होणार आहेत. याशिवाय महाकुंभमेळ्यात होणा-या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुरादाबादच्या डॉ. भीमराव आंबेडकर पोलीस अकादमीचे 15 घोडे गस्त घालत आहेत. उर्वी, स्वस्तिक, दामिनी, राठौर नावाच्या या घोड्यांना कुंभातील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. या 15 घोड्यांसह अन्य पोलीस अकादमीमधूनही घोडे प्रयागराजमध्ये आणण्यात आले आहेत. या 130 घोड्यांच्या दलात मॉर्टिना, चेतक, अग्निवीर, उर्वी, दामिनी, राठौर, गौरव, सरताज, बादल, नीलकंठ, रिमझिम, रामू, कौशल, स्वस्तिक, नगीना, फरिश्ता अशा घोड्यांचा समावेश आहे. पोलीस अकादमीमधील हे घोडे प्रशिक्षित आहेत. विशेष म्हणजे, प्रयागराज येथील संगमस्थानावर असलेल्या मातीच्या भरावामुळे हे घोडे सराईतासारखे फिरत आहेत. त्यावर स्वार झालेल्या पोलीसांना अधिक दूरवर नजर ठेवणे शक्य झाले आहे. हे दिमाखदार घोडे आणि त्यावर स्वार झालेले पोलीस सध्या प्रयागराजमध्ये सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. (Prayagraj)
========
हे देखील वाचा : श्री पंचायती बडा उदासीन आखाडा
======
या सर्वच घोड्यांकडून गर्दीचा सराव करुन घेण्यात आला आहे. प्रशिक्षणादरम्यान घोड्यांना उठणे, बसणे, चालणे, गर्दीत चालणे आणि कशानेही विचलित न होण्याचे प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यामुळे गर्दीत वावरतांनाही हे घोडे कोणत्याही भाविकांना हानी करणार नाहीत. याशिवाय प्रयागराजमध्ये विशेष बंदुका घेतलेले 40 हजार पोलीस आत्तापासून गस्त घालत आहेत. यामध्ये ड्रोनविरोधी पोलीस दलाचाही समावेश आहे. ड्रोनच्या माध्यमातून कोणी भाविकांवर हल्ल करु नये, यासाठी ही विशेष काळजी घेण्यात आली आहे. या पथकात काही सायबर तज्ञांचाही समावेश आहे. महाकुंभमेळ्याच्या भागात उडणा-या एकाही ड्रोनमधून संशयास्पद हालचाल वाटली तर हे ड्रोन जागीच निष्क्रिय करण्याच्या सूचना या तज्ञांतर्फे विशेष बंदुका घेतलेल्या पोलीसांना देण्यात येणार आहेत. यातून हे ड्रोन पाडण्यात येऊन त्याच्या चालकावर कारवाई करण्यात येणार आहे. यासर्वात कानपूर आरपीएफमधील ‘सीझर’ आणि ‘जिक्स’ नावाचे दोन खास कुत्रेही सर्व महाकुंभपरिसर पिंजून काढत आहेत. हे दोन्हीही कुत्रे स्फोटके ओळखण्यात माहिर आहेत. देशविदेशातून येणा-या भाविकांसाठी या सगळ्या सुरक्षा यंत्रणांचे कवच असणार असून यामुळे या अमृतस्नान सोहळ्याचा भाविक मोठ्या उत्साहात आनंद घेणार आहेत. (Social News)
सई बने