Home » Saudi Arabia : सौदीत आणखी एक स्वप्नातील शहर

Saudi Arabia : सौदीत आणखी एक स्वप्नातील शहर

by Team Gajawaja
0 comment
Saudi Arabia
Share

सौदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्स मुहम्मद बिन सलमान अल सौद यांनी सौदीला जगातील सर्वोत्कृष्ट पर्यटन देश बनवण्यासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. सौदी अरेबियासाठी त्यांनी व्हिजन 2030 ची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत सौदीमध्ये निऑन शहर उभारण्यात येत आहे. याशिवाय आता सौदी प्रिन्स मुहम्मद बिन सलमान यांनी आणखी एका स्वप्ननगरीची घोषणा केली आहे. या शहराचे नाव दिरियाह असणार असून यामध्ये सौदी अरेबियासह भारतातील मान्यवर कंपन्याही गुंतवणूक करणार आहेत. सौदीमधील रियाध, हित्तीन, अल-मलका, अल-यास्मिन, अल-अरिद आणि अल-नरजिस ही सर्व शहरे अतिशय सुंदर आहेत. या सर्वांपेक्षा दिरियाह शहर अधिक आधुनिक आणि सुनियोजीत असणार आहे. (Saudi Arabia)

या शहरासाठी सौदीनं तब्बल 63 अब्ज डॉलर्स एवढी गुंतवणूक केली आहे. या दिरियाह मध्ये 40 अलिशान हॉटेल उभारण्यात येणार असून गोल्फ कोर्स आणि मोठ्या जलतरण तलावांचाही समावेश असणार आहे. दिरियाह या स्वप्नवत शहराची मुहूर्तमेढ सौदीचे प्रिन्स मुहम्मद बिन सलमान यांनी ठेवली आहे. या शहरासाठी अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. हे संपूर्ण शहर सुनियोत असणार आहे. त्याचा आराखडा प्रिन्स मुहम्मद यांनी मंजूर केला आहे. त्यानंतर दिरियाहची घोषणाही त्यांनी केली. या शहरात हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉल यांच्याबरोबरच जगातील सर्वात मोठं विद्यापीठही उभारण्यात येणार आहे. याशिवाय या शहरात कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठे कलाभवनही उभारण्यात येत आहे. यात नाट्यकृती सादर करण्यासाठी सर्वात मोठा ऑपेराही असणार आहे. International News)

या दिरियाह शहराची व्याप्ती इतकी मोठी आहे की, यात 20 हजार आसनक्षमतेचे बंदिस्त मैदान बांधण्यात येणार आहे. याशिवाय घोडेस्वारीची आवड असणा-यांसाठी अन्य मोठे मैदान तयार करण्यात येणार आहे. सध्या सौदीमध्ये अशाच प्रकारचे काम अन्यत्रही चालू आहे. मिशन 2023 साठी प्रिन्स मुहम्मद यांनी अनेक बदल केले आहेत. विशेषतः सौदीमधील महिलांवर असलेली अनेक बंधने दूर करत महिलांनाही समान अधिकार देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सौदीची अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून आहे. मात्र भविष्यात हे साठे पुरेसे पडणार नाहीत, याची जाणीव ठेवत सौदी प्रिन्स यांनी या देशाला पर्यटनात अग्रेसर करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याशिवाय सौदीमध्ये गुंतवणूक करणा-या देशांना विशेष सवलती देण्यासही सुरुवात केली आहे. सौदी अरेबियानं केलेल्या अवाहलानुसार आयटी, बांधकाम, दूरसंचार आणि ऊर्जा क्षेत्रातील सुमारे 3000 कंपन्यांनी या देशातील विकासकामांमध्ये गुंतवणूक केली आहे. (Saudi Arabia)

आता या दिरियाह शहरासाठीही अशीच गुंतवणूक होत असून त्यामध्ये भारतीय कंपन्यांनी आघाडी घेतली आहे. भारत हा सौदी अरेबियाचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारतातील टाटा आणि ओबेरॉय या कंपन्यांची गुंतवणूक दिरियाह शहरात असणार आहे. या टाटा आणि ओबेरॉय समुहाची अलिशान हॉटेल उभारली जाणार आहेत. त्यात टाटा समुहाचे ताज हॉटेलची भव्य वास्तू असेल. यात 202 खोल्या असतील. दिरियाहमध्ये सुरु होणारे हे टाटा समुहाचे 250 वे हॉटेल असेल. दिरियाह शहराच्या या उभारणीचा खर्च 63 अब्ज डॉलर्समध्ये असणार आहे. या शहराची उभारणी जेरी इंझेरिलो यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. या शहरात 1 लाख घरांची उभारणी होणार आहे. तेवढीच आधुनिक सुविधा असलेली कार्यालयेही असणार आहेत. सौदी अरेबियाची राजधानी रियाधच्या बाहेर बांधले जाणारे हे नवीन शहर परदेशी नागरिकांच्या वास्तव्यासाठीही खुले कऱण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सौदीच्या जीडीपीमध्ये 18.6 अब्ज डॉलर्सचे योगदान मिळेल आणि दोन लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. (International News)

============

हे देखील वाचा : Tanaji Malusare : यशवंत घोरपडे की यशवंती नावाची घोरपड?

============

दिरियाह नगरीचे सर्वात मोठे वैभव हे तेथील म्युझियम असणार आहे. जगभरातून य़ेणा-या पर्यटकांना सौदी अरेबियाची संस्कृती सांगणारे हे म्युझियम अनेक कलाकृतींनी सजवण्यात येणार आहे. यामध्ये अनेक कलाकृती असतील, शिवाय सौदीच्या खाद्यसंस्कृतीचीही ओऴख पर्यटकांना करुन देण्यात येणार आहे. पृथ्वीवरील अदभूत शहर अशा शब्दात सौदी अरेबिया दिरियाह शहराची जाहिरात करण्यात येत आहे. अशा शहरांमध्ये येणा-या परकीय पर्यटकांमुळे सौदीची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न सौदी राजकुमार मुहम्मद करीत आहेत.(Saudi Arabia)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.