Home » “तो पुन्हा आला..तो सुद्धा दिमाखात….!!” देवेंद्र फडणवीसांबद्दल सलील कुलकर्णींची खास पोस्ट

“तो पुन्हा आला..तो सुद्धा दिमाखात….!!” देवेंद्र फडणवीसांबद्दल सलील कुलकर्णींची खास पोस्ट

by Jyotsna Kulkarni
0 comment
Saleel Kulkarni
Share

नुकताच महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून श्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहे. २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीने मोठा विजय संपादन केला. भाजपाला देखील या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या. श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा मोठा विजय महायुतीने मिळवला आहे.

या निकालानंतर सगळ्यांचेच लक्ष लागले होते ते मुख्यमंत्री कोण होणार याकडे. आणि झालेही सगळ्यांच्याच अपेक्षेप्रमाणेच. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी सगळ्यांची इच्छा होती आणि तेच झाले. फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता सर्वच क्षेत्रातील दिग्गज त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

अशातच मराठी संगीत क्षेत्रातील लोकप्रिय गायक, संगीतकार, दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देताना त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहे. सध्या सलील यांची ही पोस्ट खूपच चर्चेत आली आहे.

सलील कुलकर्णी यांनी पोस्ट शेअर करताना एक फोटो देखील पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुरलीधर मोहोळ पाहायला मिळत आहे. याच फोटोच्या आठवणीबद्दल त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले,


“माननीय देवेंद्रपंत..
मनःपूर्वक अभिनंदन..
दहा वर्षांपूर्वी ..म्हणजे २०१४ मध्ये परममित्र मुरलीअण्णांनी आयोजित केलेल्या कोथरूड महोत्सवात मिळालेल्या पुरस्काराच्या निमित्ताने झालेली ही देवेंद्रजी फडणवीस ह्यांची झालेली पहिली निवांत भेट…त्याचा हा फोटो !!
गुरू जयमालाबाई आणि कीर्ती शिलेदार ह्यांच्या उपस्थितीत मिळालेला हा पुरस्कार…
ही भेट देवेंद्रजीनाही अजून लक्षात आहे ही या माणसाची कमाल आहे…
या माणसाकडे काहीतरी वेगळीच शांतता आहे…
समाजमध्यामावर झालेली टीका..
कुटुंबीयांची झालेली चेष्टा….
या माणसाने ज्या पद्धतीने हाताळली ..ही गोष्ट स्पृहणीय आहे.
या फोटोत एकीकडे तेव्हाचे नगरसेवक आणि आत्ताचे केंद्रीय मंत्री आणि खासदार मुरलीअण्णा मोहोळ आहेत आणि एकीकडे तेव्हाचे युवा प्रदेशाध्यक्ष आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत…
दोघांनीही निष्ठा आणि कष्ट यातून मिळवलेलं यश अभिमानास्पद आहे….आणि त्यांच्याशी आपण सहज बोलू शकतो , आपलं म्हणणं मांडू शकतो अशी ही दोन माणसं…!!
एखाद्याने स्वप्न पाहावे आणि पूर्ण करावे तर असे…
“ मी पुन्हा येणार” म्हणणारा माणूस…पुन्हा आला..तो सुद्धा दिमाखात….!!
सगळ्या साथीदारांना बरोबर घेऊन…!!
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी फडणवीस ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !!
माननीय एकनाथराव शिंदे आणि अजितदादा ह्यांचेही मनापासून अभिनंदन !!”

दरम्यान ५ डिसेंबरला आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी खास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज मंडळींनी उपस्थिती लावली होती. यासोबतच मनोरंजन, क्रीडा आणि इतरही अनेक क्षेत्रातील दिग्गज लोकांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.