कुत्रे कोणाला आवडत नाहीत. त्यांना सुद्धा आपल्यासारख्या भावना असतात. त्यांना ही आपल्यासारखे दु:ख होत असल्याचे एका संशोधनातून समोर आले होते. दुसऱ्या बाजूला कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले केले जात असल्याच्या घटना ही समोर येऊ लागल्या आणि त्यात अधिक वाढ होत चालली आहे. अशातच पाळीव असेल किंवा रस्त्यावरील कुत्रा असो त्याने एखाद्यावर हल्ला केल्याचे प्रकार आपण पाहिलेच. अशातच यमुनागर मध्ये दोन पाळीव पिटबुल कुत्र्यांनी त्यांच्याच मालकांना फॉर्म हाउसवर चावून मारले. तर नोएडात साह महिन्याच्या मुलाला सुद्धा मृत्यूच्या दारात उभे केले. याच कारणास्तव कुत्र्यांबद्दल लोकांच्या मनात एक वेगळीच भीती निर्माण झाली आहे. पण त्यांची तरी काय चुकी? याच पार्श्वभुमीवर प्रशासनाने कुत्रे चावण्याच्या घटनांवर आळा घालण्यासाठी नियम तयार केले आहेत. हरियाणात आता परवानगी शिवाय कुत्रे पाळण्यावर बंदी घातली आहे. (Rules for Pet Dog)
हरियाणाच्या सरकारने कुत्रे प्रेमींना झटका देत निर्देशन दिले आहेत की, राज्यातील लोकांना घरात एकच कुत्रा पाळता येणार आङे. त्यासाठी त्यांना परवाना अनिवार्य असणार आहे. सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना फिरण्याासाठी घेऊन जाताना त्याला मास्क लावावा लागणार आहे. जेणेकरुन तो इतरांना चावणार नाही. निर्देशनानुसार, लोकांना कुत्रा पाळण्यासाठी सरल पोर्टलवरुन अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी रजिस्ट्रेशन करुन परवानाची प्रक्रिया पूर्ण करतील. सरकारकडून घराबाहेर कुत्र्याला फिरवण्यासंबंधित नियमांचे सुद्धा पालन करावे लागणार आहे.
कुत्र्यांना पाळण्यासंदर्भातील नियमात जर एखाद्याने चुक केल्यास त्याला तुरुंगात सुद्धा जाऊ शकते. सरकारने कठोर नियमाअंतर्गत न मानणाऱ्यांना ५ हजार रुपयांपर्यंतचा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. हरियाणातील नव्या नियमानुसार, घरात एकच कुत्रा आता नागरिक पाळू शकतात. या निर्णयामुळे पेट्सचा व्यवसाय करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण काही लोक आपल्याच घरी कुत्रे पाळून त्याची विक्री करायचे. (Rules for Pet Dog)
हे देखील वाचा- भारतातील ‘या’ समाजात वराला मुलीकडून दिले जातात चक्क २१ साप, काय आहे ही परंपरा?
एका रिपोर्ट्सनुसार, हरियाणात दररोज जवळजवळ २० प्रकरणे ही कुत्रे चावण्याची समोर यायची. चंदीगढ आणि अंबाला मध्ये ही स्थिती अत्यंत वाईट आहे. येथे १०० हून अधिक प्रकरणे ही कुत्रे चावण्याची असतात. सरकारने याच कारणास्तव कठोर नियम काढले आहेत.