Home » महागाईविरोधात काॅंग्रेसकडून संसदेजवळ धरणे आंदोलन

महागाईविरोधात काॅंग्रेसकडून संसदेजवळ धरणे आंदोलन

by Team Gajawaja
0 comment
धरणे आंदोलन
Share

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि सीएनजीच्या दरवाढीविरोधात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि इतर पक्षाच्या अनेक खासदारांनी गुरुवारी संसदेजवळ धरणे आंदोलन केले.

या धरणे आंदोलनात काँग्रेसचे सर्व बडे नेते सहभागी झाले होते. काँग्रेसच्या ‘महागाईमुक्त भारत’ मोहिमेचा एक भाग म्हणून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होण्यापूर्वी सुमारे दीड तास आधी पक्षाच्या खासदारांनी विजय चौकात धरणे धरले.

यादरम्यान राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधत सांगितले की, गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 9 वेळा वाढल्या आहेत. त्याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसत असल्याचे ते म्हणाले.

पेट्रोल आणि डिझेलचे दर तातडीने कमी करावेत, अशी आमची सरकारकडे मागणी आहे. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आज देशभरात आंदोलन करत आहे.

====

हे देखील वाचा: सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलमध्ये वाढ, नितीन गडकरींनी सांगितले इंधनदरवाढीचे कारण

====

या निदर्शनात राहुल गांधींव्यतिरिक्त काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि इतर अनेक खासदार सहभागी झाले होते. काँग्रेसच्या खासदारांनीही सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

यावेळी काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले की, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्या की इंधनाचे दर वाढतील, असा अंदाज आम्हाला आधीच होता.

इंधनाचे वाढलेले दर मागे घ्यावेत, अशी आमची मागणी आहे. इंधनाच्या वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास सरकारला समजू शकत नाही.

====

हे देखील वाचा: मोदी सरकारने जनतेच्या सुरक्षेसाठी पावले उचलावीत, राहुल गांधींचे केंद्राला आवाहन

====

काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले की, जेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतात, तेव्हा प्रत्येक वस्तूच्या किमती वाढतात. जगात कच्च्या तेलाचे दर सर्वात कमी असतानाही हे सरकार पेट्रोल-डिझेलचे दर वाढवत होते. 101 रुपयांचे तेल भरताना 52 रुपये अबकारी कर म्हणून सरकारकडे जात आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.