Relationship Depression : आजच्या धावपळीच्या आणि व्यस्त आयुष्यात प्रत्येकजण आपल्या कामात ऐवढा व्यस्त झाला आहे की, त्याला स्वत: सह परिवाराला वेळ देणे शक्य होत नाही. अशातच वेळेअभावी कपल्स पार्टनरला पुरेसा वेळ देऊ शकत नाही आणि हळूहळू कपल्समध्ये दूरावा निर्माण होतो. याआधी असे लॉग्न डिस्टेंस रिलेशनशिपमध्ये अधिक पाहायला मिळते. पण आता सर्व कपल्समध्ये हे सर्वसामान्य झाले आहे. वेळ आणि प्रेमाच्या कमतरतेमुळे त्यांचे नाते डिप्रेशनमध्ये जाते. यालाच रिलेशनशिप डिप्रेशन म्हणतात. जर वेळीच तुम्ही यामध्ये सुधारणा केली नाही तर नाते मोडले जाऊ शकते.
रिलेशनशिप डिप्रेशनची कारणे
-जेव्हा कधी एखाद्या रिलेशनशिपमध्ये प्रेम आणि एकमेकांप्रती विश्वास कमी होणे
-कपल्समध्ये बातचीत बंद होणे
-पार्टनर तुमच्याकडे दुर्लक्ष करणे
– पार्टनर नेहमीच चिडचिड करणे
-काही चुकीचे झाले तर नेहमीच पार्टनरला दोषी धरणे
-नवरा किंवा बायकोसंबंधित अन्य नाती जसे की, आई-वडील यांचा सन्मान न करणे किंवा भाऊ-बहिणीबद्दल वाईट बोलणे
रिलेशनशिपच्या डिप्रेशनपासून असे राहा दूर
कपलमध्ये कोणत्याही कारणास्तव कितीही मोठे भांडण झाले असले तरीही त्यांनी एकमेकांशी बोलणे बंद करू नये. तुमचे नाते दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी तुम्ही वाद मिटवण्यासाठी स्वत: हून बोलण्यासाठी पुढाकार घ्या. अन्यथा तुमच्यामध्ये दूरावा निर्माण होऊ शकतो.
एकमेकांसोबत वेळ घालवा
नात्यात प्रेम-भावना दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी तुम्ही एकमेकांसोबत संवाद साधण्यासह वेळही घालवला पाहिजे. बहुतांशजण असे करतात की, आपल्या पार्टनरला पुरेसा वेळ न देता केवळ महागडे गिफ्ट देऊन असा विचार करतात की, आपले नाते सुधारले जाईल. पण असा विचार करणे खरंच चुकीचे आहे. पार्टनरसोबत उत्तम नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला पार्टनरला वेळ देणे अत्यंत गरजेचे आहे. याशिवाय पार्टनरसोबत भांडण, वाद करून नव्हे प्रेमाने वागले पाहिजे. (Relationship Depression)
स्वत:मध्ये बदल करा
नात्यामध्ये नेहमीच वाद होतात. पण वाद मिटवताना तुमच्यामध्ये अहंकाराची भावना नसावी. यामुळे नाते मोडले जाऊ शकते. अशातच रिलेशनशिपमध्ये पार्टनरचे म्हणणे ऐकून घेऊन, त्याची बाजू लक्षात घेऊन योग्य ते उत्तर द्या. याशिवाय स्वत:मध्ये थोडा बदल करत पार्टनरप्रती नेहमीच सकारात्मक विचार करा. तरच तुमचे रिलेशनशिप नेहमी आनंदी, उत्साही राहिल.