Home » लग्नाआधी पार्टनरमध्ये ‘या’ सवयी दिसून येत असल्यास व्हा सावध

लग्नाआधी पार्टनरमध्ये ‘या’ सवयी दिसून येत असल्यास व्हा सावध

कोणत्याही व्यक्तीसोबत काही काळ राहणे आणि आयुष्यभर राहणे यामध्ये फार मोठा फरक आहे. जर तुम्ही लग्नाचा विचार करताय तर पार्टनरमध्ये काही सवयी दिसून आल्या ज्या तुम्हाला पटत नाही तर आधीच भावी आयुष्याचा विचार करा.

by Team Gajawaja
0 comment
Relationship
Share

Relationship Advice :  लग्न आयुष्यातील सर्वाधिक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असतो. मुलगा असो किंवा मुलगी दोघांनी लग्नाआधी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेणे आवश्यक आहे. अशातच लग्नाआधी पार्टनरसोबत लग्न करण्याआधी त्याचा काही सवयी तुम्हाला पटत नसतील तर भावी आयुष्याचा मोठा निर्णय घेण्याआधी विचार करा.

दिखावा करणे
तुमचा पार्टनर अधिक पैसे कमावणारा असल्यास तर गरजेचे नाही की, तो दिखावा करेल. काहींना दिखावा करण्याची सवय आधीपासूनच असते. अशातच तुम्ही दिखावा करणाऱ्या व्यक्तींची ओखळ केली पाहिजे. अशा प्रकारच्या व्यक्ती आपल्या प्रतिष्ठेसाठी आयुष्यातील कोणत्याही वळणावर एकटे सोडू शकतात. अशातच पार्टनरला दिखावा करण्याची सवय असेल तर लग्नाआधी याबद्दल विचार करा.

वेळोवेळी खोट बोलण्याची सवय
खोट बोलण्याची सवय कोणालाही आवडत नाही. तुमचा पार्टनर वारंवार तुमच्याशी खोट बोलत असल्यास किंवा एखादी गोष्ट सांगण्यास घाबरत असेल तर तुम्ही सावध राहिले पाहिजे. अन्यथा भविष्यात अशा व्यक्तीवर विश्वास ठेवणे तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. याशिवाय तुमच्या आयुष्यावर याचा परिणाम होऊ शकतो. (Relationship Advice )

केवळ स्वत: बद्दल विचार करणे
काहीजणांना सवय असते की, केवळ स्वत: बद्दल विचार करणे किंवा बोलण्याची. अशी सवय असणारा व्यक्ती कधीच तुम्हाला आयुष्यभर साथ देईल. प्रत्येकवेळी तो तुमच्याशी वाद आणि भांडण करेल. यामुळे स्वत: बद्दल विचार करणाऱ्या पार्टनरपासून दूर राहणे फायद्याचे ठरेल.


आणखी वाचा :
मुलांना असे बनवा Emotionally Strong, आयुष्यातील प्रत्येक संकटात राहतील खंबीरपणे उभे
रिलेशनशिपच्या डिप्रेशनपासून स्वतःला असे सावरा
मुलांना घरात एकटे सोडण्याआधी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.