Home » UPSC ची तयारी करणाऱ्या तिघांचा मृत्यू !

UPSC ची तयारी करणाऱ्या तिघांचा मृत्यू !

by Team Gajawaja
0 comment
Rau's IAS Coaching Centre
Share

२७ जुलै रोजी दिल्लीत पावसामुळे राऊ’स आयएस कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये UPSC तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी आणि कुटुंब नावाच्या NGO ने प्रशासन आणि कोचिंग सेंटरच्या विरोधात कारवाईची मागणी केली. नंतर दिल्ली महानगरपालिकेने ७५ संस्थांना नोटिसा पाठवून ३५ संस्थाना बंद केले आणि २५ संस्था सील केल्या. (Rau’s IAS Coaching Centre)

२७ जुलै दिल्लीत मुसळधार पाऊस पडत होता. पण राऊ’स आयएस कोचिंग सेंटर च्या बेसमेंटमध्ये UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा काहीच फरक पडत नव्हता, त्यांनी अभ्यासात आपलं लक्ष केंद्रित केल होतं. त्यातल्या २ दोन विद्यार्थिनी म्हणजे श्रेया यादव आणि तन्या सोनी, तिथे पुस्तक घेण्यासाठी आणखी एक विद्यार्थी येतो नाव नेविन दलविन असंख्य स्वप्नं आणि ते पूर्ण करण्याचं ध्येय मनाशी घेऊन हे विद्यार्थी जगत असतात. पण या कोचिंग सेंटर च्या बेसमेंटमध्ये अचानक पावसामुळे इतक पाणी भरत की या तिघांना बेसमेंट मधून बाहेर पडताच येत नाही. आणि त्या विद्यार्थ्यांचा तिथेच बुडून मृत्यू होतो. या मृत्यूला जबाबदार कोण ? प्रशासनाने या कोचिंग सेंटर विरोधात काही अॅक्शन घेतलीये का ? (Rau’s IAS Coaching Centre)

राऊ’स कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये तिघा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर UPSC तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोचिंग सेंटरच्या व्यवस्थापना विरोधात आणि महानगरपालिके विरोधात जोरदार निदर्शनं केली. कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये लायब्ररी चालवण्याच्या नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दल दोषींवर कठोर कारवाईची मागणी सुद्धा केली गेली. विद्यार्थ्यांनी कँडल लाईट मोर्चा देखील काढला आणि प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवला. त्यांनी Muncipal Corporation Of  दिल्ली आणि दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. (Rau’s IAS Coaching Centre)

या सगळ्या दुर्घटने नंतर कुटुंब नावच्या NGO ने हाय कोर्टात एक याचिका दाखल केली आणि या दुर्घटनेच्या चौकशीसाठी High Level Committee ची मागणी केली. याआधी सुद्धा 2019 मध्ये एका हॉटेलला लागलेल्या आगीत एक आयआरएस अधिकारी आणि एका Foreigner चा मृत्यू झाला होता आणि आता ही घटना. आपण काय जंगलात राहतो का, जिथे आग किंवा पाण्यासारख्या गोष्टींमुळे लोक मारले जात आहेत. असा मुद्दा या याचिकेत मांडण्यात आला आहे. त्या शिवाय राऊ’स आयएस कोचिंग सेंटरच्या विरोधात २६ जून २०२४ ला तक्रार केली गेली होती. (Rau’s IAS Coaching Centre)

पण दोन वेळा Reminder देऊन सुद्धा महानगर पालिके ने त्याकडे दुर्लक्ष केलं. जर त्यांनी वेळेवर अॅक्शन घेतली असती तर आज ते तिघ जीवंत असते. अस ही कुटुंब NGO चं म्हणण आहे. दिल्ली महानगर पालिका या नंतर जागी झाली आणि त्यांनी ७५ संस्थाना नोटिस पाठवली ३५ संस्थाना बंद केलं आणि २५ संस्था सील केल्या. ज्या मध्ये १२th fail फेम आणि सोशल मिडीयावर सुद्धा प्रसिद्ध असलेले विकास दिव्यकीर्ति यांच्या दृष्टि IAS कोचिंग सेंटरविरोधात सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. तरीही कोर्टात दिल्ली महानगर पालिका जबाबदारी अग्निशामक दलावर ढकलताना दिसली.

================

हे देखील वाचा : टाटा ग्रुपच्या झुडिओच्या यशस्वी होण्यामागचं रहस्य ?

================

त्यामुळे हाय कोर्टाने दिल्ली महानगर पालिकेला चांगलेच खडेबोल सुनावले. बहुमजली बिल्डिंग बांधण्याची परवानगी तुम्ही देत आहात, पण तुमच्या कडे चांगल्या ड्रेनेजची व्यवस्था नाहीये. सव्वातीन कोटींहून अधिक लोक या शहरात राहतात, आणि या शहराची तयारी फक्त ६-७ लाख लोकांनुसार करण्यात आलीये. चांगल्या व्यवस्था न वाढवता एवढ्या लोकांना तुम्ही कसे या शहरात सुरक्षित आसरा देणार आहात. तुम्ही जूनियर अधिकाऱ्यांना टर्मिनेट केले, पण ज्या सीनियर अधिकाऱ्यांच काम देखरेख करणं होतं, त्यांचं काय? असं म्हणत दिल्ली महानगर पालिकेला खडसावलं.

हाय कोर्टाने या प्रकरणात दिल्ली पोलिसांनाही सहभागी केल आहे. २ ऑगस्टरोजी होणाऱ्या सुनावणीत दिल्ली पोलिसांचे डीसीपी आणि या प्रकरणाचे तपास अधिकारीही सर्व कागदपत्रांसह हजर राहणार आहेत. शिवाय दिल्ली महानगर पालिकेचे मुख्य आयुक्त यांना ही उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी कोचिंग सेंटरच्या मालक अभिषेक गुप्ता आणि व्यवस्थापक देशपाल सिंग यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अजूनही कोर्टात या केसची सुनावणी सुरू आहे. पण त्या तिघांच्या मृत्यूला हाय कोर्ट नेमकं कोणाला जबाबदार ठरवेलं हे येणाऱ्या दिवसात कळेलचं. (Rau’s IAS Coaching Centre)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.