अचला सप्तमी ही सूर्य देवतेची उपासना करण्याचे पर्व आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीला सूर्य सप्तमी, अचला सप्तमी, रथ आरोग्य सप्तमी अशा नावांनी ओळखले जाते. या दिवशी देवी नर्मदा यांची जयंती सुद्धा साजरी केली जाते. रथसप्तमीला सूर्य देवाची उपासना, व्रत केल्याने सर्व रोग बरे होतात असे म्हटले जाते. (Ratha Saptami)
रथ सप्तमी का म्हटले जाते?
माघ शुक्ल सप्तमी ही अचला सप्तमी किंवा रथ सप्तमीच्या रुपात ओळखली जाते. या दिवशी सूर्य देवतेची पूजा केल्याने मनुष्याला प्रत्येक कामात विजय मिळतो. त्याचसोबत मनुष्यातील रोगांचे ही नाश होत तो आरोग्यवान होतो. सूर्याची जागा ही नवग्रहात असल्याने भगवान भास्कराची कृपा मिळाल्यास आयुष्यात ग्रहांचा कोणताही दुष्परिणाम होत नाही.
याचे महत्व आणि मान्यतेनुसार, खरमास पूर्ण होण्यापूर्वी भगवान सूर्याचा रथात अश्वांची संक्या ७ होऊन पूर्ण होते. अखेर या दिवसाला रथ सप्तमी असे म्हटले जाते. ऋतूत बदल होण्यासह भगवान सूर्याचे तेज ही वाढू लागते, जे शीत ऋतू पूर्वी ग्रीष्म ऋतूच्या आगमनाचे संकेत असतात.
सध्याच्या काळातही सूर्यचिकित्सा आयुर्वेदिक आणि निसर्गोपचार पद्धतींमध्ये वापरली जाते. सूर्याच्या दिशेला तोंड करुन त्याची पूजा केल्यास शारिरीक रोग नष्ट होतात. संतान प्राप्तीसाठी हे व्रत फार महत्वाचे आहे. हे व्रत जर श्रद्धेने आणि विश्वाने ठेवल्यास वडिल आणि मुलांमध्ये प्रेम कायम राहते.
रथसप्तमी पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्णाचे पुत्र शाम्ब यांना आपल्या शारिरीक बळावर खुप गर्व झाला होता. एकदा दुर्वसा ऋषी भगवान श्रीकृष्ण यांना भेटण्यासाठी आले होते. ते खुप दिवस तप करुन आले होते आणि यामुळे त्यांचे शरिर खुप थकले होते. (Ratha Saptami)
शाम्ब त्यांची ही अवस्था पाहून जोरजोरात हसू लागला आणि आपल्या अभिमानाच्या कारणास्तव त्यांचा त्याने अपमान केला. तेव्हा दुर्वासा ऋषींनी अत्यंत क्रोधित होत शाम्ब याची अशी वागणूक पाहून त्याचा कुष्ठरोग्याचा श्राप दिला. शाम्बची ही स्थिती पाहून श्रीकृष्णाने त्याने भगवान सूर्याची उपासना करण्यास सांगितली. वडिलांची आज्ञा मानत शाम्बने भगवान सूर्याची प्रार्थना करण्यास सुरुवा केली. अशातच त्याला त्याचे फळ म्हणून काही काळातच त्याला कुष्ठ रोगापासून मुक्तता मिळाली.
हे देखील वाचा- भारतातील ‘या’ मंदिरांमध्ये गैर हिंदूना परवानगी नाही
यामुळे जे भाविक रथ सप्तमीच्या दिवशी भगवान सूर्याची पूजा भक्तीभावाने करतात. त्यांना आरोग्य, पुत्र आणि धनाची प्राप्ति होते.
शास्रात सूर्याला आरोग्यवर्धक असे म्हटले गेले आहे. तसेच सूर्याची उपासना केल्याने रोग मुक्तीचे मार्ग सुद्धा सांगितले आहेत.