Home » अवघाचि संसार……’पायी वारी ते ऑनलाइन वारी’

अवघाचि संसार……’पायी वारी ते ऑनलाइन वारी’

by Correspondent
0 comment
Pandharpur Wari | K Facts
Share

आषाढीचा आनंद सोहळा संपन्न होतो तेव्हा पंढरपुरी भक्तीची पेठ फुलते. पण सध्याचं दृश्य काही वेगळंच सांगतंय…. चहू बाजूंनी निर्बंधाच्या विळख्यात अडकलेली वारी पंढरीच्या राजापासून भक्तांना दूर लोटतेय असं वाटू लागलं असतानाच काही वारकरी मंडळींनी अनोखी शक्कल लढवली आहे. ज्यामुळे त्यांच्या ‘वारी’मध्ये कसलीही बाधा न येता ते विठुरायाचे दर्शन घेऊ शकणार आहेत…….

आषाढी वारी () रद्द केल्यामुळे कोरोना वाढत असून ​आषाढी वारीला परवानगी द्या म्हणजे कोरोना जाईल, अशी मागणी आणि इतर वादग्रस्त विधाने करताना आपण अनेक लोकांना बघतोय, ऐकतोय. पण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याचा सुवर्णमध्य काढणारे तुरळकच. अशाच काही वारकऱ्यांची शक्कल आपण जाणून घेतल्यावर त्यांचा हा निर्णय कौतुकास्पद वाटतो एवढं नक्की.

आषाढातली पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानली जाते. पण यंदा कोरोना विषाणूची साथ आणि लॉकडाऊनमुळे वारीवर अनिश्चिततेचं सावट आहे अशातच ही ‘ऑनलाइन वारी’ यातल्या सुवर्णमध्याची पावती देते.

वारकऱ्यांच्या काही गटांनी काढलेला हा सुवर्णमध्य….. ‘संगीतवर्षा’ प्रस्तुत ही ‘ऑनलाइन आषाढी वारी’ संत ज्ञानेश्वरांच्या पालखी प्रस्थानापासून विठुरायाच्या चरणापर्यंत पोहोचवणारी आहे. आषाढी वारीचा परिपूर्ण आनंद देणारी आणि भक्तिभावाने भरलेली ही वारी कोरोनाच्या सगळ्या नियमांच्या संकल्पनेच्या पलीकडची आहे. मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही आषाढीकच्या पायी वारी सोहळ्यावर निर्बंध घालण्यात आले असले तरी काही मानाच्या पालख्यांसोबत आषाढी पायी वारीचा हा सोहळा पार पडणारच आहे.

पण सगळ्यांना याचा आनंद घेता येणार नाही. म्हणूनच ऑनलाइन वारीचा पर्याय या वारकऱ्यांना सर्वोत्तम वाटला. आत्तापर्यंत आपण ऑनलाइन शाळा, ऑनलाइन कॉलेज, ऑनलाइन क्लासेस, ऑनलाइन ऑफिस वगैरे गोष्टी ऐकल्यात आणि अनुभवल्या आहेत मात्र ‘ऑनलाइन वारी’ ची संकल्पना आत्ताच पहिल्यांदा बघत असू. या संकल्पनेत काही विशेष घटक आहेत, काही उपक्रम आणि सोहळे आहेत जे वारकऱ्यांना वारी ची अनुभूती देतात.

१ जुलै २०२१
अभंग : कानडा राजा पंढरीचा
गायक : कुमार सात्विक प्रसाद सुतार

                      
१) २ जुलै २०२१ (जेष्ठ कृ.८)
ज्ञानोबा माऊली पालखी प्रस्थान
वारी मुक्काम : आळंदी
अभंग : अवघाची संसार सुखाचा करीन | आनंदे भरीन तिन्ही लोक||
गायिका : कुमारी हर्षदा हनुमंत देसाई
निरूपणकार : चैतन्य महाराज पडाळे

२) ३ जुलै २०२१ (ज्येष्ठ कृ.९)
वारी मुक्काम : पुणे
अभंग : पंढरीसी जारे आल्यानो संसारा | दीनाचा सोयरा पांडुरंग ||
गायक : कुमारी प्रियंका दत्तात्रय कदम
निरुपणकार : गुरुवर्य ह.भ.प. श्री. ज्ञानोबामाऊली महाराज गोजेगावकर

३) ४ जुलै २०२१ (जेष्ठ कृ.१०)
वारी मुक्काम : पुणे
अभंग : होईन भिकारी | पंढरीचा वारकरी ||
गायक/निरूपणकार : ह.भ.प. श्री. प्रदिप महाराज जाधव

४) ५ जुलै २०२१ (जेष्ठ कृ.११)
वारी मुक्काम : सासवड
अभंग : नाम गाऊ, नाम घेऊ | नाम विठोबाला वाहू ||
गायिका : कुमारी वैभवी अशोक पाचांगने
निरूपणकार : ह.भ.प. श्री. अमोल महाराज सुळं

५) ६ जुलै २०२१ (जेष्ठ कृ.१२)
वारी मुक्काम : सासवड
अभंग : माझे जीवीची आवडी | पंढरपुरा नेईन गुढी||
गायिका : कुमारी हर्षदा हनुमंत देसाई
निरुपणकार : ह.भ.प. बालकीर्तनकार ज्ञानेश्वरताई विजय घाडगे

६) ७ जुलै २०२१ (जेष्ठ कृ.१३)
वारी मुक्काम : जेजुरी
अभंग : भेटी लागी पंढरीनाथा | जीवा लागली तळमळ व्यथा ||
गायिका : कुमारी संगमेश्वरी अशोक मोरे
निरुपणकार : ह.भ.प. आजाद महाराज गुजर

७) ८ जुलै २०२१ (जेष्ठ कृ.१४)
वारी मुक्काम : वाल्हे
अभंग : आनंदाचे डोही आनंद तरंग | आनंदची अंग आनंदाचे ||
गायिका : सौ. संगीता बागडे
निरूपणकार : ह.भ.प. श्री. सुशांत महाराज जाधव

८) ९ जुलै २०२१ (जेष्ठ अमावस्या)
वारी मुक्काम : लोणंद
अभंग : माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव |आपणचि देव होय गुरु ||
गायक : श्री. किरण महाराज भोसले
निरूपणकार : भागवताचार्य श्री. अभिषेक महाराज पवार

९) १० जुलै २०२१ (ज्येष्ठ अमावस्या)
वारी मुक्काम : लोणंद
अभंग : वारकरी पंढरीचा | धन्य धन्य जन्म त्यांचा ||
गायक : कुमारी वैष्णवी भारत कारंडे
निरुपणकार : ह.भ.प. श्री. वसंत महाराज पाटील

१०) ११ जुलै २०२१ (आषाढ शु.१)
वारी मुक्काम : तरडगाव (उभं रिंगण)
अभंग : पंढरीचे वारकरी | ते आधिकारी मोक्षाचे ||
गायक :श्री अशोक सूर्यवंशी

११) १२ जुलै २०२१ (आषाढ शु.२)
वारी मुक्काम : फलटण
अभंग : बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल l
करावा विठ्ठल जिवेभावे ll
गायक : ह. भ. प. श्री गणेश महाराज भगत

१२) १३ जुलै २०२१ (आषाढ शु ३)
वारी मुक्काम : बरड
अभंग :  तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल l देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल ll
गायक : कुमार अर्णव मच्छिंद्र बुवा
निरूपणकार : ह.भ.प. श्री. संतोष महाराज टिकार

१३) १४ जुलै २०२१ (आषाढ शु ४)
वारी मुक्काम : नातेपुते
अभंग :  विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म l
भेदाभेद भ्रम अमंगळ ll
गायक : कुमारी प्राजक्ता माधव पंढरीनाथ
निरूपणकार : ह.भ.प. श्री. राजू महाराज शामगांवकर

१४) १५ जुलै २०२१ (आषाढ शु ५/६)
वारी मुक्काम : माळशिरस
अभंग :  होय होय वारकरी l पाहे पाहे रे पंढरी
गायक : भागवताचार्य जनार्दन महाराज शिंदे
निरूपणकार : ह.भ.प. श्री. विठ्ठल महाराज खापरकर

१५) १६ जुलै २०२१ (आषाढ शु ७)
वारी मुक्काम : वेळापुर (धावा)
अभंग : ये ग ये ग विठाबाई l माझे पंढरीचे आई ll
गायक : संगीता आचार्य
निरूपणकार : ह.भ.प. श्री. हरीदासजी महाराज पिपरे

१६) १७ जुलै २०२१ (आषाढ शु ८)
वारी मुक्काम : भंडीसेगाव
अभंग : आवडे पंढरी भीमा पांडुरंग l चंद्रभागा लिंग पुंडलिक ll
गायक : ह.भ.प. श्री. मुकुंद पाटेकर
निरूपणकार : मृदंगाचार्य ह.भ.प. श्री. मदन महाराज कदम, सातारा

१७) १८ जुलै २०२१ (आषाढ शु ९)
वारी मुक्काम : वाखरी (गोल रिंगण)
अभंग : संपदा सोहळा नावडे मना ला l लागला टकळा पंढरीच ll
गायक : ह.भ.प. श्री. प्रदीप महाराज जाधव
निरूपणकार : ह.भ.प. श्री. सुरेश महाराज जाधव

१८) १९ जुलै २०२१ (आषाढ शु १०)
वारी मुक्काम : पंढरपूर
अभंग : संत भार पंढरीत l कीर्तनाचा गजर होतो ll
गायिका : सौ. देवता प्रसाद सुतार
निरूपणकार : भागवताचार्य जनार्दन महाराज शिंदे

१९) २० जुलै २०२१ (आषाढ शु ११)
मुक्काम : पंढरपूर
अभंग : धर्माची तू मूर्ति पाप पुण्य तुझे हाती ||
गायिका : कुमारी नंदिनी अंगद गायकवाड
निरूपणकार : ह.भ.प. श्री. संजय महाराज वेळूकर

२०) २१ जुलै २०२१ (आषाढ शु १२)
मुक्काम : पालखी पंढरपूर मध्ये पोहोचली
अभंग : आता कोठे धावे मन |
तुमचे चरण देखलिया ll
गायक : कु. सिद्धेश्वर टिकार
निरूपणकार : भगवतचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज गई (पाटील)

संकल्पना, लेखन, एडिटिंग :
सौ. वर्षा इंदलकर जाधव

निवेदक/निवेदिका :
सौ. वर्षा इंदलकर जाधव, काकासाहेब जाधव, श्री. विजय सुर्यवंशी सर, सौ. विद्या नितेश पानसरे, श्री. सतीश हांडे सर, सौ. हर्षला जाधव, सौ. उज्वला शिवरकर

राम कृष्ण हरी !

सध्याची वस्तुस्थिती पाहता हा सुवर्णमध्य असला तरी  करोनाच्या महामारीतून सारे विश्व मुक्त कर आणि पुढच्या वर्षी मुक्त वारी घडू दे! एवढीच विनवणी आपण विठुरायाला करू शकतोय.

शब्दांकन – शामल भंडारे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.