Home » Rajguru : राजगुरूंनी शेर मारला सगळेच शांत…मग झालं असं काही…

Rajguru : राजगुरूंनी शेर मारला सगळेच शांत…मग झालं असं काही…

by Team Gajawaja
0 comment
Rajguru
Share

हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच HSRA… या क्रांतिकारी संघटनेचा आग्राला एक सिक्रेट अड्डा होता. भगतसिंह, सुखदेव, राजगुरु, चंद्रशेखर आझाद आणि यांच्यासारखे बरेच क्रांतिकारी पोलिसांची नजर चुकवून इथे आग्राला लपून राहायचे, पुढची प्लॅनिंग करायचे, बॉम्ब बनवायचे. पण फक्त एवढंच नाही तर सगळे वेळ घालवायला ताजमहाल समोर बसायचे, गप्पा मारायचे, मजा मस्ती करायचे. यातले काही इतके अतरंगी होते, ते आपण इमॅजिनसुद्धा करू शकत नाही. या क्रांतिकरकांच्या टोळीमधल्या राजगुरूंचा स्वभाव म्हणजे एकदम बोलका स्वभाव.

त्यांचे मित्र सांगायचे ना, “राजगुरूचं तोंड एकदा का सुरू झालं, तर मग त्याच्या तावडीतून सूटायचं म्हणजे.. विचार पण नको! तो कधी काय बोलेल याचा काही नेम नाही.” तो स्वभाव असतो ना, ‘जो दिल मे, वही जुबां पे!’ असाच स्वभाव राजगुरू यांचा होता. पण बरेचदा प्रॉब्लेम काय व्हायचा की, ते बोलता बोलता असं पटकन बोलून जायचे ज्यामुळे काहीवेळा समोरचा हर्ट व्हायचा. आता काय राजगुरूंचं मन साफ होतं, पण समोरचा कधी कधी ते मनात धरून ठेवायचा. असंच एका दिवशी सगळे एकत्र बसले असताना, अचानक राजगुरूंनी एक शेर मारला आणि.. पुढे हा किस्सा काय घडला? ते आपण जाणून घेऊ. (Rajguru)

Rajguru

एकदा काय झालं.. HSRA चे सगळे क्रांतिकारक जण आपले सहजच ताजमहल समोर बसले होते. ती सगळ्यांची अखेरचीच भेट… सर्व क्रांतिकारकांचा एक खास गुण होता… ते म्हणजे सगळेच कवि मनाचे. सगळ्यांना शेर-ओ-शायरी आणि कवितांचा भयंकर शौक. आता या सगळ्यांमध्ये राजगुरू इतरांपेक्षा वेगळे होते. वेगळं म्हणजे, त्यांच्या कविता इतरांसारख्या नसायच्या, त्या जगावेगळ्याच असायच्या. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर, त्यांनी कधी शायरी किंवा कविता म्हटली की, मुश्किलीने एखादा वाह वाह मिळाला, तिच मोठी गोष्ट! (Top Stories)

त्यामुळे ‘राजगुरूंना भावनाच कळत नाही, मुळात त्यांना कविमनच नाही’, अशीच त्यांची इमेज त्यांच्या ग्रुपमध्ये तयार झाली. ताजमहल समोर त्यादिवशी सगळे शांत बसून चांदण्यांकडे एकटक बघत होते. सगळे आपापले रमले होते, माहोल एजॉय करत होते. राजगुरू त्यांच्या सोबत तिथेच बाजूला बसून पुस्तक वाचत होते. जरा वेळ झाला नाही आणि त्यांना शांतता खायला लागली. आता या सिचूएशनला शांत बसतील ते राजगुरू कसले. त्यांना खूप अस्वस्थ व्हायला लागलं आणि इतर सगळे इतके मग्न होते की, शांतता भंग केलेली त्यातल्या कोणालाच आवडली नसती. (Rajguru)

सगळ्यांना शांत बघून राजगुरू रघुनाथ यांना म्हणाले, “रघुनाथ… भाऊ. यांना इथेच थांबू दे. तू घरी जाऊन दंड बैठका मार, इथे कशाला आला आहेस?’ यावर कोणीच काही रिएक्ट झालं नाही. मग राजगुरूंना नाईलाज म्हणून कोपऱ्यात जावं लागलं. त्यांनी मुद्दाम मौन पाळायचं नाटक सुरू केलं आणि ते बराच वेळ गप्प राहिले. पण त्यांचं मन कुठे शांत बसतंय. त्यांनी बराच वेळ घेतला आणि मनात एक शेर तयार केला. पण तेव्हा ते काहीच बोलले नाहीत.

==============

हे देखील वाचा : Owana Maria : ‘त्या’ बेटावर ती १८ वर्ष एकटीच राहिली आणि मग… 

==============

दुसऱ्यादिवशी सकाळी सगळे चहा पित होते, कालच्या ताजमहलच्या सुंदरतेवर आणि माहौलवर छान गप्पा मारत होते. वातावरण एकदम हलकं फुलकं होतं. पण राजगुरूंना राहवत नव्हतं. आता बोलू, आता बोलू, अशी त्यांची अवस्था सुरू होती. त्यांना राहावलं नाही आणि त्यांनी मोठ्या आवाजात सगळ्यांवर शेर सोडला,

अब तक नहीं मालूम था इश्क क्या चीज है,
रोजे को देख कर मेरे भी इश्क ने बलवा किया!

हे ऐकून ऑकवर्ड सायलंस क्रिएट झाला. बटुकेश्वर दत्त राजगुरूंच्या तोंडाकडे बघतंच बसले. विजय बाबू तर जोरजोरात ओरडले. “इश्क ने बलवा किया, इश्क ने बलवा किया!” आणि छोटी शांतता पसरली. या शेरवर रीप्लाय म्हणून भगत सिंग यांनी काय करावं? तर त्यांनी बंदूक बाहेर काढली. बंदुकीची नळी स्वतःकडे ठेवत राजगुरुंना ती बंदूक दिली आणि म्हणाले, “तुला मला जिवंत ठेवायचं नसेल, तर हे घे आणि गोळी घाल, नाहीतर शपथ घे की, आजपासून कधीही हे शेर, चित्ता, बकरी, कुत्रा, गाय सर्व बनवणार नाहीस” हे ऐकून राजगुरू एकदम निराश झाले आणि यानंतर कधीच त्यांनी उर्दूमध्ये काय, मराठीतही काही लिहिलं नाही. तर असे होते राजगुरू, पण जेव्हा जेव्हा देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांची नावं घेतली जातात, तेव्हा राजगुरू हे नाव आजही कोणताच भारतीय विसरू शकत नाही.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.