भारताच्या G20 अध्यक्षतेच्या मुद्द्यावर परदेशी प्रकरणांच्या संसदीय सल्लाकार समितीच्या बैठकीदरम्यान खासदारांनी लंडनमध्ये देशाच्या लोकशाहीच्या स्थिती बद्दल दिलेल्या विधानावरुन राहुल गांधी यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रतिक्रिया दिल्या गेल्या. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी त्याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी असे म्हटले की, लंडनमध्ये मी देशाच्या लोकशाहीच्या स्थितीवर प्रश्न जरुर उपस्थितीत केले. पण कोणत्याही परदेशातील देशाच्या हस्तक्षेपाची मागणी कधीच केली नाही. परराष्ट्र मंत्रालयाच्या कंसल्टेटिव्ह कमेटीच्या बैठकीत राहुल गांधी आणि भाजपच्या सदस्यांमध्ये खुप वाद ही झाला. (Rahul Gandhi statement in London)
परराष्ट्र मंत्रालयाच्या कंसेल्टेटिव कमेटीच्या बैठकीत भाजपच्या सदस्यांनी राहुल गांधी यांच्यावर परदेशात देशाचा अपमान केल्याचा आरोप लावला. भाजपच्या एका खासदारांनी असे म्हटले की, आम्ही जी२० चे नेतृत्व करत आहोत. पण काही लोक बाहेर जाऊन देशाच्या लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या या बैठकीत याच मुद्द्यावर जोरदार गदारोळ झाला. या मुद्द्यावरुनच संसदेत ही एका आठवड्यापासून गोंधळ सुरु आहे.राहुल गांधी यांनी उत्तर देत असे म्हटले की, हिंडनबर्ग रिपोर्ट एका व्यक्तीबद्दल आहे. देश किंवा सरकार बद्दल नाही. अदानी देश आहे का? जेणेकरुन त्यांच्याबद्दल तपास केला जाऊ शकत नाही?
राहुल गांधी यांनी या आरोपाला फेटाळून लावले की, त्यांनी देशातील लोकशाहीला वाचवण्यासाठी कोणत्याही परदेशी ताकद अथवा देशाच्या हस्तक्षेप करण्यास सांगितले. राहुल यांनी असे म्हटले की, मी लोकशाहीचा मुद्दा जरुर उचलला आणि बोललो ही. पण असे सुद्धा म्हटले की, ही आमची अंतर्गत बाब आहे आणि यावर तोडगा काढू.
तर बैठकीत उपस्थितीत असलेल्या काँग्रेस खासदार शशि थरुर यांनी असे म्हटले की, २०२३ मध्ये जी२० च्या अध्यक्षता भारतालाच मिळणार आहे. यामध्ये सध्याच्या सरकारने काहीच केले नाही. ही गोष्ट शत्रुघ्न सिन्हा यांनी सुद्धा म्हटली. याच दरम्यान परदेशी मंत्र्यांनी राहुल गांधींना म्हटले की, मी तुमच्या मताशी असहमत आहे की, देशात लोकशाहीला धोका आहे. यावर राहुल गांधींनी म्हटले की, तुम्ही असहमत असलात तरीही लोकशाहीला धोका असल्याच्या गोष्टीवर मी ठाम आहे. (Rahul Gandhi statement in London)
हे देखील वाचा- लंडनमध्ये तेव्हा इंदिरा आणि आता राहुल…अमित शाह यांनी जुना किस्सा सांगत साधला निशाणा
दुसऱ्या बाजूला कमेटीचे अध्यक्ष परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राहुल गांधी यांना बैठकीत थांबवत असे म्हटले की, त्यांनी केवळ आजच्या विषयावर बोलावे. भाजपच्या खासदारांनी असे म्हटले की, जेव्हा चर्चा सुरु होती तेव्हा काही लोक भारताच्या जी२० च्या अध्यक्षता मिळालेल्या विषयावरुन लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत होते. तसेच भाजपने काँग्रेसवर प्रश्न उपस्थितीत करत असे म्हटले की, इमरेंजी भारताच्या लोकशाहीवरील सर्वाधिक मोठा डाग होता.