Home » खरी सिल्व्हर ज्वेलरी अशी ओखळा, फसवणूकीपासून रहाल दूर

खरी सिल्व्हर ज्वेलरी अशी ओखळा, फसवणूकीपासून रहाल दूर

ज्वेलरी खरेदी करणे प्रत्येकालाच आवडते. गोल्ड ते सिल्व्हर ज्वेलरीची एक वेगळीच ओखळ असते. पण मार्केटमध्ये गोल्ड आणि सिल्व्हर ज्वेलरमध्ये ग्राहकांची कधीकधी फसवणूक केली जाते. अशातच ज्वेलरी खरेदी करताना त्याबद्दलच्या काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

by Team Gajawaja
0 comment
Pure Silver Test
Share

Pure Silver Test : चांदीची ज्वेलरी महिलांना घालणे आवडते. यामुळेच मार्केटमध्ये चांदीचा भाव नेहमीच वाढलेला दिसतो. यामागे काही कारणेही आहेत. पण चांदीच्या वस्तू, दागिने नागरिक आवर्जून खरेदी करतात. ज्योतिष शास्रानुसार, चांदीचा थेट संबंध मनाशी येतो. चांदीमुळे मन शांत राहते, भावनांवर नियंत्रण राहते. यामुळेच चांदीची ज्वेलरी घालण्यास सांगितले जाते. पण मार्केटमध्ये खरी चांदी ओखळायची कशी असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. याबद्दलच्या काही टिप्स जाणून घेऊया सविस्तर….

हॉलमार्क
सोन्याप्रमाणे चांदीच्या दागिन्यांवरही हॉलमार्क असते. हे मार्क नेहमीच ज्वेलरीवर कुठे ना कुठेतरी असते. ते अक्षर किंवा एखाद्या सिम्बॉलच्या रुपात असू शकते. हॉलमार्क पाहण्यासाठी भिंगाचा वापर करू शकता.

चुंबकचा वापर
चांदी कधीच चुंबकाकडे आकर्षित होत नाही. यामुळे चांदीची ज्वेलरी खरेदी करण्यास जात असल्यास एक लहान आकाराचा चुंबक सोबत ठेवू शकता. जेणेकरून तुमची चांदी खरेदी करताना फसवणूक होणार नाही.(Pure Silver Test)

बर्फाचा तुकडा
खरी सिल्व्हर ज्वेलरी ओखळण्यासाठी बर्फाच्या तुकड्याचा वापर करू शकता. चांदीच्या ज्वेलरीवर बर्फाचा एक तुकडा ठेवा. यानंतर बर्फाचा तुकडा लगेच वितळण्यास सुरूवात झाल्यास समजून जा चांदी खरी आहे.

(अशाच गाजावाजासंबंधित वेगवेगळ्या माहितीसाठी येथे क्लिक करा.)

आणखी वाचा :
आधार कार्डच्या माध्यमातून काढता येतील पैसे, जाणून घ्या प्रोसेस
नव्या बाळासाठी शॉपिंग करताना ‘या’ 5 गोष्टी नक्की खरेदी करा
जुने घर विक्री करताना किती टॅक्स भरावा लागतो?

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.