Home » मोदी सरकारचा मोठा निर्णय; पबजीसह ११८ मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी

मोदी सरकारचा मोठा निर्णय; पबजीसह ११८ मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी

by Correspondent
0 comment
Share

मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. पबजीसह ११८ मोबाईल ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. याआधी मोदी सरकारनं जवळपास १०० हून अधिक मोबाईल अधिक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.


यानंतर आता आणखी ११८ अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं घेतला आहे.पबजीसह कॅमकार्ड, बायडू, कट कट, वूव, टेन्सेंट वेयून, राईज ऑफ किंग्डम्ज, झॅकझॅक यांच्यासह अनेक अ‍ॅप्सवर सरकारनं बंदी घातली आहे. देशाच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला धोका असल्यानं बंदीची कारवाई करत असल्याचं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे.


या कारवाईमुळे कोट्यवधी भारतीय मोबाईलधारक आणि इंटरनेट वापरकर्त्यांच्या हितांचं संरक्षण होईल. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे, असं मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे.केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं ६९ ए च्या अंतर्गत पबजीसह ११८ मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या अ‍ॅप्सबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा विचारात घेऊन अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला गेला, अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे. अँड्रॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवरील अनेक अ‍ॅप्सबद्दल सरकारकडे तक्रारी आल्या होत्या, असंही मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.