राजा-राणींचे युग आता संपले आहे. असे असले तरी जगभरातील निवडक राजघराणी ही लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. यात स्पेनच्या राजघराण्याचा समावेश होतो. स्पॅनिश राजघराणे हे युरोपमधील प्रतिष्ठित राजघराणे म्हणून ओळखले जाते. सध्या या राजघराण्याची कमान राजे फेलिप यांच्या हाती आहे. या राजघराण्याची पुढची वारसदार म्हणून राजकुमारी लिओनोरचे नाव निश्चित झाले आहे. 20 वर्षाच्या या राजकुमारी लिओनोरच्या सौंदर्याची चर्चा नेहमी होते. त्याचबरोबर राजकुमारी कुठल्या तरुणाबरोबर विवाह करणार याचीही चर्चा होते. कारण राजकुमारी लिओनोरसोबत जो तरुण विवाह करणार तो स्पेनचा भावी राजा ठरणार आहे. यामुळेच राजकुमारी लिओनोरच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. या सर्वातच बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू पाब्लो गावी याच्यावर राजकुमारी लट्टू असल्याची बातमी चर्चेत आली. (Princess Leonor)
खुद्द राजा फेलिप यांनी या फुटबॉलस्टारची सही राजकुमारीच्या एका टीशर्टवर घेतल्याचे फोटो आले, आणि राजकुमारीचे हे गोड गुपित चर्चेत आले. पण ही चर्चा चालू असतानाच फुटबॉलपटू पाब्लो गावी याचा एक व्हिडिओ पाहण्यात आला आणि राजकुमारीच्या चाहत्यांवर मोठा आघात झाला. या व्हिडिओमध्ये पाल्बो गावी आपल्या एका मैत्रिणीला सामन्यादरम्यान मिठी मारतांना दिसत आहे. पाल्बोची ही कृती म्हणजे, स्पॅनिश राजकुमारीला अप्रत्यक्ष नकार असल्याचा संदेश असल्याचे स्षष्ट झाले आणि राजकुमारीसह तिचे चाहतेही नाराज झाले. स्पेनचा राजा होण्याची संधी फुटबॉलपटू पाब्लो गावी यानं गमावली आहे. त्यानं चक्क एका राजकुमारीच्या प्रेमाला नकार दिला आहे. ही न फुललेली प्रेमकहाणी आहे, फुटबॉलपटू पाब्लो गावी आणि स्पेनची राजकुमारी लिओनोर यांची. (International News)
31 ऑक्टोबर 2005 रोजी जन्म झालेली राजकुमारी लिओनोर ही स्पेनचे राजे फेलिप यांची मोठी मुलगी आहे. ती स्पॅनिश सिंहासनाची वारसदार आहे. राजकुमारी 18 वर्षाची झाली आणि तिच्या राणी बनण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. लिओनोर ही तिच्या सौंदर्यामुळे प्रसार माध्यमांची लाडकी आहे. अशा या रुपवान राजकुमारीचे ज्या तरुणाबरोबर लग्न होईल, तो स्पेनचा राजा होणार आहे. आता राजकुमारी 20 वर्षाची आहे, आणि स्पेनच्या राजघराण्याच्या नियमांनुसार तिचा विवाह पुढील दोन वर्षात होणे अपेक्षित आहे. यासाठी राजकुमारीच्या भावी पतीची शोधाशोध सुरु आहे. या सर्वातच राजकुमारी बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू पाब्लो गावी याची चाहती असल्याची बातमी पुढे आली. 2022 मध्ये राजे फेलिप यांनी गावी याची एका जर्सीवर स्वाक्षरी घेतली. ती जर्सी राजकुमारी लिओनोरची होती. त्यामुळे राजकुमारीच्या मनातील नाजूक भावना सार्वजनिक झाल्या. (Princess Leonor)
त्यानंतर राजकुमारी गावी आणि फुटबॉलपटू पाब्लो यांची भेट 2024 मध्ये झाली. राजे फेलिप यांनी त्याच्यापुढे आपल्या मुलीबरोबर लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवल्याचेही सांगण्यात येऊ लागले. फुटबॉलपटू पाब्लो गावी हा बार्सिलोनाचा प्रसिद्ध मिडफिल्डर आहे. त्याने चॅम्पियन्स लीग, स्पॅनिश सुपर कप, कोपा डेल रे, युरो कपला लीगा यासारख्या अनेक चॅम्पियनशिपमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. फुटबॉल मैदानावर त्याची खेळण्याची शैली खूपच आकर्षक आहे. त्यामुळे त्याचे लाखो चाहते आहेत. यात राजकुमारी लिओनोरचाही समावेश आहे. अर्थात याच राजकुमारीबरोबर आलेला लग्नाचा प्रस्ताव मात्र गावी यांनी नाकारला. कारण स्पेनच्या राजघराण्याचा राजा होण्यासाठी त्याच्यापुढे अनेक अटी ठेवण्यात आल्या होत्या. (International News)
===========
हे देखील वाचा : Jonas Masetti : कोण आहेत, पद्मश्री जोनास मासेट्टी !
Kim Jong Un : किमची युद्धनौका फुस्स !
===========
राजघराण्यातील कडक नियम त्याला पाळावे लागणार होते. त्यातील सर्वात जाचक अट म्हणजे, त्याला फुटबॉल खेळावर पाणी सोडावे लागणार होते. पाब्लो गावी, आपले पहिले प्रेम फुटबॉल असल्याचे नेहमी सांगतो. त्यामुळे पहिल्या प्रेमासाठी त्यानं स्पेनचे राजेपद नाकारले आहे. पाब्लो गावी हा सध्याचा सर्वाधिक श्रीमंत फुटबॉलपट्टू म्हणूनही ओळखला जातो. गावी अनेक मोठ्या ब्रँडबरोबर काम करत आहे. त्यात क्रीडा जगातील सर्वोच्च ब्रँड अॅडिडासचाही समावेश आहे. फुटबॉलपट्टू म्हणून गावीचे भविष्य किती उज्ज्वल आहे. हाच गावी एका सामन्यात आपल्या बालमैत्रिणीसोबत दिसला आणि इथेच राजकुमारी लिओनोर आणि त्याची न सुरु झालेली प्रेमकहाणी संपल्याची चर्चा सुरु झाली. (Princess Leonor)
सई बने