महाभारताबद्दल आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अशातच या काळात बहु पति असण्याची प्रथा सुद्धा होती. जी आज ही एका ठिकाणी अद्याप सुरुच आहे. येथे द्रौपदी प्रमाणे महिलांना पाच किंवा त्या पेक्षा अधिक नवरे असतात. खरंतर ही प्रथा हिमाचल प्रदेशातील किन्नोर जिल्ह्यातील आहे. येथे एकाच घरात कितीही पुरुष मंडळी असो त्यांचे लग्न एकाच महिलेशी होते. म्हणजेच सर्व भावडांची एकच बायको. तर जाणून घेऊयात याच परंपरेबद्दलची अधिक माहिती. (Polyandry Tradition)
महाभारतात द्रौपदी हिचा विवाह अर्जुनाच्या चुकीमुळे सर्व भावडांसोबत झाला होता. मात्र हिमाचल मधील किन्नोर मध्ये मुद्दाम एका पेक्षा अधिक नवऱ्यांसोबत एक पत्नी राहते. खास गोष्ट अशी की,या परंपरेमुळे एकता, प्रेम आणि सन्मान अशा गोष्टी पहायला मिळतात.
पर्टनाच्या दृष्टीने प्रसिद्ध आहे हे गाव
हिमाचल प्रदेशातील किन्नोर गाव हे पर्यटनाच्या दृष्टीने फार प्रसिद्ध आहे. थंडीच्या दिवसात येथे लोक बर्फवृष्टी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात. त्याचलोबत येथील संस्कृती आमि परंपरा जाणून घेण्यासाठी सुद्धा येथे लोक येणे पसंद करतात. या गावात महिलांचा खुप सन्मान केला जातो आणि त्यांना सर्वोच्च दर्जा ही दिला जातो.
महिला असतात परिवाराच्या प्रमुख
घरातील प्रमुख व्यक्ती म्हणून महिला सर्व सुत्र सांभाळते. महिला नवरा आणि मुलांची काळजी घेण्यासह घर आणि शेतात काम ही करते. खास गोष्ट अशी की, येथे केवळ पुरुषच नव्हे तर महिला सुद्धा जेवणासोबत दारु पितात. येथील दारुच्या सेवनाने थंड असलेल्या बाहेरील वातावरणात शरिर हे गरम राहते.
या ठिकाणी आहे एकापेक्षा अधिक पती करण्याची प्रथा
केवळ हिमाचलच नव्हे तर उत्तराखंड मधील काही कबाइली समाजात बहु पति प्रथा आहे. यामागील कारण असे की, प्रेम आणि संपत्ती मधील होणाऱ्या विभागणीपासून होणारा बचाव. दक्षिण भारत आणि नॉर्थ ईस्ट मध्ये सुद्धा काही जातींमध्ये ही प्रथा पाळली जाते.
कधीपासून सुरुयं ही प्रथा?
हिमाचल मधील किन्नोर यांचे असे मानणेआहे की, ही प्रथा महाभारतापासून चालत आली आहे. यामागे कारण असे सांगितले जाते की, वनवासादरम्यान जेव्हा १ वर्षांचा अज्ञातवास होता तेव्हा पांडव येथेच लपले होते. तर जेव्हा येथे एखाद्या मुलाचे लग्नाचे वय होते तेव्हा सर्व भावंडांचे लग्न ही त्याच दिवशी होते आणि सर्व जण वर म्हणून लग्नासाठी उभे राहतात.(Polyandry Tradition)
दरवाज्यावर ठेवली जाते टोपी
जर एखादा भाऊ वधूसोबत एकत्रित खोलीत असेल तर तो दरवाज्यावर आपली टोपी ठेवतो. अन्य भाऊ या परंपरेचा सन्मान करतात. दरवाज्यावर टोपी असल्याने दुसरा कोणताही भाऊ आतमध्ये खोलीत जात नाही.
हे देखील वाचा- चीन मध्ये मृतांचे केले जाते लग्न तर अविवाहित पुरुषांच्या कबर मध्ये टाकतात महिलांची हाडं
आज सुद्धा का सुरु आहे ही प्रथा?
किन्नोरमध्ये बहु पति प्रथा काही लोक पाडवांच्या सुद्धा आधीची असल्याचे मानतात. वधूसह ते वेळीच योग्य विभाजन होत असल्याने ही प्रथा दांपत्याच्या जीवनावर अनुचित दबाव टाकत नाही. सर्व मुल आपल्या कायदेशीर वडिलांना बाबा आणि त्यांच्या भावंडांना लहान बाब असे म्हणतात.
या परिवारातील संपत्तीची विभागणी होत नाही. घरात समृद्धी नेहमीच टिकून राहते. परिवारात फूट पडत नाही. बहु पति प्रथा जगणारी महिला महिला स्वत:ला अधिक सुखी आणि सुरक्षित मानते. एक पति असणाऱ्या महिलांच्या तुलनेत ही तिला अधिक उदार मानते. तिला नवऱ्याच्या मृत्यूनंतर विधवा म्हणून ही संबोधले जात नाही. ती प्रत्येक नवरा जीवंत असे पर्यंत सौभाग्यवती असते.