Home » गयामधील पितृपक्ष मेळ्यातील अजिब कथा

गयामधील पितृपक्ष मेळ्यातील अजिब कथा

by Team Gajawaja
0 comment
Pitrupaksha Melas in Gaya
Share

सध्या पितृपंधरवडा सुरु आहे. त्यालाच पितृपक्ष असेही म्हणतात. पितृपक्ष हा 16 दिवसांचा कालावधी आहे. या दिवसात हिंदू धर्मिय त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात. तसेच त्यांना पिंड दान करतात. याच पितृपक्षात एक मेळा भरवला जातो. या मेळ्यात जगभरातील हिंदू धर्मिय सहभागी होतात, ज्यांना आपले पूर्वजांचा मृत्यू कधी, कुठे, कसा झाला आहे, हे माहित नाही, तेही या मेळ्यात येतात आणि आपल्या पूर्वजांचे विधीपूर्वक पिंड दान करतात. एक-दोन नाही तर पंधरा लाखाहून अधिक भाविक या पितृपक्ष मेळ्यात हजर असतात. हा मेळा भरतो बिहारमधील गया येथे. आत्ताही बिहारच्या या गयामध्ये पितृपक्ष मेळा सुरु झाला असून त्यात आपल्या पूर्वजांच्या नावानं पिंडदान करण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. (Pitrupaksha Melas in Gaya)

पितृ पक्ष हा मृत आत्म्यांना समर्पित आहे आणि त्यांना संतुष्ट करण्यासाठी, क्षमा मागण्यासाठी आणि पितृ दोषापासून मुक्त करण्यासाठी या पितृपक्षाचे महत्त्व हिंदू धर्मात मोठे आहे. या काळात श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान यांसारखे विधी जन्म, जीवन आणि मृत्यूच्या चक्रातून मृत आत्म्याला प्रसन्न करण्यासाठी केले जातात. यासाठी प्रसिद्ध असलेला पितृपक्ष मेळा बिहारच्या गया येथे सुरू झाला आहे. गयामध्ये विधी करणाऱ्यांना पितृदोषातून मुक्ती मिळते आणि त्यांच्या पूर्वजांना जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते असे मानले जाते. 18 सप्टेंबर पासून सुरु झालेला हा मेळा 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. पितृपक्ष हा हिंदू धर्मियांसाठी पूर्वजांचे स्मरण कऱण्यासाठीचा महत्त्वाचा काळ असतो. एखाद्या सणासारखे हा पंधरवडा साजरा होतो. ज्या तिथिला पूर्वजांचे श्राद्ध आहे, तेव्हा घरी ब्राह्मणांकडून श्राद्धाचे विधी करुन घेतले जातात. यावेळी सगळे कुटुंबिय उपस्थित असतात. आपल्या पूर्वजांचे आभार मानत हे कुटुंबिय त्यांच्यापुढे नतमस्तक होतात. मात्र अनेकांना आपल्या पूर्वजांची माहिती नसते, शिवाय त्यांच्या मृत्यूची तिथीही माहिती नसते, अशांसाठी गयायेथील पितृपक्ष मेळा खूप उपयोगी पडतो. (Pitrupaksha Melas in Gaya)

गयामध्ये भरणा-या या पितृपक्ष मेळ्याचा इतिहास अनेक वर्षांचा आहे. यात सहभागी होणारे लोक आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण आणि श्राद्ध करतात. हा मेळा दरवर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान भरतो. यात लाखो भाविक सहभागी होतात. हे भाविक आपल्या कुटुंबातील पूर्वजांसाठी पिंडदान आणि इतर धार्मिक विधी करतात. गयायेथील या पितृपक्ष मेळ्यात सहभागी होणारे अनेक पिढ्यांपासूनचा इतिहास सांगतात. गयाचे महत्त्व धार्मिक दृष्टीकोनातून खूप महत्वाचे आहे, या स्थळाला “पूर्वजांचे तीर्थ” देखील म्हटले जाते. यावर्षी, म्हणजेच 2024 मधील हा पितृपक्ष मेळा 16 दिवसांचा असणार आहे. यात किमान 15 लाखांहून अधिक भाविक सामिल होतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. यासाठी देशाच्या विविध राज्यातून आणि जगभरातूनही येणा-या भाविकांनी आपली नोंदणी केली आहे. हा मेळा गया प्रदेशातील फाल्गु नदीच्या काठावर असलेल्या विष्णुपद मंदिर परिसरात भरतो. या संपूर्ण मेळ्यासाठी जिल्हा प्रशासन महिनाभर आधीच तयारी सुरु करते. (Pitrupaksha Melas in Gaya)

==============

हे देखील वाचा : पितृदोष कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

===============

यासाठी गयायेथील मैदाने आणि सार्वजनिक स्थळी मोठे तंबू उभारले जातात. मेळ्यात सहभागी होणा-या यात्रेकरुंची आता आधी नोंदणी होत असल्याने अधिक सुविधा उपलब्ध करुन देणे, प्रशासनाला सोप्पे पडत आहे. या मेळ्यासाठी उपस्थित रहाणारे आणि विधीमध्ये भाग घेणा-यांसाठी ऑनलाईन बुकींगची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच यात निवासाची आणि विधी, श्राद्ध करण्यासाठी पुजा-यांचीही निवड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. या विधीसाठी येणारे यात्रेकरु हे बिहार वगळता अन्य राज्यातून आणि देशाबाहेरुनही येतात. या सर्वांसाठी निवासाची सोयही ऑनलाईन पद्धतीनं करण्यात येत आहे. यात बुंकीग करणा-या यात्रेकरुना त्यांना कुठल्या पद्धतीचे दान करायचे आहे, त्या पिंडदानाचे शुल्क, पूजा साहित्य, पिंडदान पूजेसाठी कुठले स्थान हवे आहे, हे निवडण्याचे स्वातंत्र्यही देण्यात आले आहे. या पितृपक्ष मेळ्यात फाल्गु नदी, विष्णू मंदिर आणि अक्षयवट वृक्ष येथे पिंडदानाची पूजा होते. मेळ्यात येणारे यात्रेकरु त्यांच्या सोयीनुसार ही ठिकाणे आधीच बुक करु शकत आहेत. या ऑनलाईन सुविधेमुळे गयामध्ये किती भाविक येणार हेही स्पष्ट झाले आहे. (Pitrupaksha Melas in Gaya)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.