Home » पितृदोष कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

पितृदोष कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

by Jyotsna Kulkarni
0 comment
Pitru Paksha 2024
Share

१८ सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात झाली. आपल्या हिंदू धर्मामध्ये देवासोबतच आपल्या पितरांना आणि पूर्वजांना देखील मोठे स्थान देण्यात आले आहे. त्यांचा कधीही विसर पडू नये आणि त्यांचा आशीर्वाद कायम आपल्या वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांवर राहावा यासाठी हा पितृपक्ष असतो. या काळात आपल्या पूर्वजांना जेवू घातले जाते.

आपल्या धर्मातील दोन मुख्य पुराण मानल्या जाणाऱ्या रामायण आणि महाभारतमध्ये पितृपक्ष, श्राद्ध आणि तर्पण याचा उल्लेख दिसतो. असे म्हणतात की पितृपंधरवड्यात आपले पूर्वज धरतीवर येतात आणि पिंडदान मिळाले की तृप्त होवून आशिर्वाद देवून निघून जातात.

हिंदू पुराणशास्त्रात चार ऋण मुख्य ऋण सांगितले आहेत. पहिले देव ऋण, दुसरे ऋषी ऋण, तिसरे पितृ ऋण तर चौथे समाज ऋण तुम्हाला यातील पितृ ऋण फेडायचे असेल तर पितृपंधरवडा हा अत्यंत उत्तम काळ मानला जातो.

  • पिंडदान, ब्राह्मण भोजन, तर्पण, दान इत्यादी कार्य करण्यासोबतच आपण अनेक असे उपाय करू शकतो ज्यामुळे पितृदोष कमी होतो. चला जाणून घेऊया या उपायांबद्दल.
  • पिंपळ आणि वड या दोन वृक्षांना शास्त्रात खूप महत्त्व आहे. धार्मिक विधी आणि पर्यावरणासाठी हे वृक्ष फार महत्त्वाचे आहेत. पिंपळ १०० टक्के ऑक्सिजन देतो आणि प्राणवायू शिवाय आपण जगू शकत नाही. त्यामुळे कावळ्यांना जेवू घालून आपण निसर्ग ऋण देखील कमी करतो.
  • पितृ पक्षात ब्राह्मनांना भोजन आणि वस्त्र दान करुन श्राद्ध करणे फार शुभ मानले जाते. या पक्षमासात गाय, कावळा, कुत्रा आणि मुंग्यांना भोजन देणे फार लाभदायक मानले जाते.
  • दर्भाद्वारे काळे तीळ पाण्यात मिसळून दक्षिण दिशेला अर्पण केल्यास पूर्वज प्रसन्न होतात. तसेच काही विशेष तिथीमध्ये श्राद्ध केल्यास पितृदोषातून मुक्ती मिळते.
  • मान्यतेनुसार, ज्या लोकांच्या कुंडलीत पितृ दोष होतो त्यांनी या काळात गया, उज्जैन आणि इतर धार्मिक ठिकाणी पिंडदान करावं.
  • पितृपक्षाच्या दरम्यान कांदा आणि लसूणसह तामसिक पदार्थांचं सेवन करु नये. या काळात विवाह, पूजा तसेच कोणत्याही शुभ कार्य करण्यास मनाई केली जाते.

Pitru Paksha 2024

  • प्रत्येक अमावास्येला आपल्या घरी श्रीमद्भागवतातील गजेंद्र मोक्ष अध्यायाचे पठण करावे. प्रत्येक चतुर्दशी, अमावस्या आणि पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध अर्पण करणे आणि भगवान विष्णूची प्रार्थना करणे शुभ मानले जाते.
  • मान्यतेनुसार, या कालावधीत कपडे आणि बूटं खरेदी करु नयेत. असे म्हणतात की, या दरम्यान केस कापणे, नखं कापणे यांसारखी कामे करु नयेत. या काळात नवीन वस्त्र, सोनं, चांदी यांसारख्या वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते. पितृ पक्षाच्या दरम्यान गृह प्रवेश करणं वर्जित मानले जाते. मान्यतेनुसार, असं करणं अशुभ मानलं जातं.
  • पितृदोष असलेल्या व्यक्तीने सव्वा किलो तांदूळ आणून दररोज 7 वेळा डोक्यावरून उतरवून मूठभर तांदूळ काढून पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ठेवावे. असे 21 दिवस सतत केल्याने पितृदोषापासून आराम मिळू शकतो.

=======

हे देखील वाचा : पितृ पक्षातील तिथीनुसार श्राद्ध पक्षाच्या तारखा आणि महत्व

=======

  • जर कुंडलीत पितृदोष तयार होत असेल तर घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर आपल्या पूर्वजांचा फोटो लावून त्यांना हार घालून त्यांची रोज पूजा करावी आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा. पितृपक्षात किंवा ज्या तिथीला तुमच्या पूर्वजांचे निधन झाले आहे त्या तिथीला पितृदोष शांती (श्राद्ध) विधिवत केल्याने पितृदोष कमी होतो.
  • पितृदोषाच्या उपायासाठी प्रत्येक शनिवारी उडीद पिठापासून बनवलेला पदार्थ काळ्या कुत्र्याला खाऊ घातल्यास शनि, राहू, केतू या तिन्ही ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी होतो.

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.