काही पालकांना अशी समस्या उद्भवते की ते आपल्या पर्सनल आणि प्रोफेशन लाइफ मधील संताप हा आपल्या मुलांवर काढतात. मात्र त्यांना नंतर याचा पश्चाताप ही होते. पण तेव्हा स्थिती हाताबाहेर निघून गेलेली असते आणि मुल तुम्हाला पारखू लागतात. ऐवढेच नव्हे तर तुमच्या अशा वागण्यामुळे मुलात आणि तुमच्यात दूरावा निर्माण होण्यास सुरुवात होते. परंतु असे काही उपाय आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा राग नियंत्रणात ठेवू शकता आणि मुलासोबत उत्तम नातं तयार करु शकता.(Parents Anger Management)
मुलाच्या पालनपोषणावेळी अशा प्रकारे स्वत:ला करा नियंत्रित
-दीर्घ श्वास घ्या
जर तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे त्रस्त आहात आणि अशातच मुलाची एखादी समस्या आल्यास तर प्रथम मोकळ्या हवेत जा आणि दीर्घ श्वास घ्या, असे तुम्ही १० वेळा करा. यामुळे तुमचे मन नियंत्रणात येईल आणि तुम्ही शांतपणे मुलाच्या समस्येवर तोडगा काढू शकता.

-ब्रेक घ्या
जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्हाला स्थिती हाताळता येत नाही आणि मुलांचे वागणे ही सहन होत नसेल तर त्या ठिकाणाहून थोडा वेळ निघून जा. ब्रेक घ्या, फ्रेश होण्याचा प्रयत्न करा. जेव्हा शांत व्हाल तेव्हा तुम्हाला बरं वाटेल आणि समस्यांचे समाधान ही होईल.
-माफी मागणे गरजेचे
जर तुम्ही स्वत:ला नियंत्रित करु शकत नाही आणि मुलावर तुमचा राग निघाला असेल तर लगेच त्याची माफी मागा. त्याची समजूत काढा आणि सॉरी बोला. असे केल्याने तुमचे मुलं तुमच्या भावना समजून घेऊ शकतात आणि एखाद्यावर ओरडल्यानंतर ही ते वेळोवेळी चुकीचे धरणार नाहीत. (Parents Anger Management)
हे देखील वाचा- तुमची मुलं तुमच्यापासून दूर-दूर जात आहेत का? ही असू शकतात कारणं…
-शिक्षा देऊ नका
मुलांना शिस्त शिकवणे म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की, त्यांच्यासोबत नेहमीच वाकड्यात वागले पाहिजे. तुम्ही सकारात्मकतेसह त्याची समस्या ऐकून घ्या आणि या विषयावर चर्चा करा. त्यांना समजावून सांगा आणि समस्येवर खुलेपणाने चर्चा करा.
-काही नियम बनवा
जर तुम्हाला मुलांवर राग व्यक्त करण्याची सवय असेल तर अशा स्थितींसाठी काही नियम तयार करा. तुम्ही जे वागलात त्याचा पश्चाताप तुम्हाला होईलच. पण ते वागल्यावर आपण काय केले पाहिजे या संदर्भातील नियम ही स्वत:साठी तयार करा. जेणेकरुन तुम्हाला कालांतराने अशा स्थितीत स्वत:ला सांभाळता येईल.