Parenting Tips : प्रत्येक आई-वडिलांना आपले मुल हेल्दी आणि मजबूत राहावे असे वाटते. अशातच बहुतांश पालक कमी वयातच मुलांना जिममध्ये पाठवतात. पण वास्तवात लहान मुलांना जिममध्ये पाठवणे योग्य आहे का? बहुतांश शोधात असे सांगितले जाते की, कमी वयात हेव्ही एक्सरसाइज केल्याने आरोग्यासाठी नुकसान होऊ शकते.
हाडांसाठी धोकादायक
लहान मुलांमध्ये कमी वयात शारिरीक विकास होत असतो. अशातच लहान मुलांना जिममध्ये पाठवणे धोकादाक ठरू शकते. खासकरून मुलांच्या हाडांसाठी धोकादायक ठरू शकते.
स्नायूंवर ताण पडतो
लहान मुलं ज्यावेळी हेव्ही वजन उचलतात त्यावेळी स्नायूंवर ताण पडला जातो. यामुळे मुलांचे स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि त्यांना दुखापतही होऊ शकते. यामुळे लहान मुलांना हेव्ही व्यायाम करण्यापासून दूर ठेवावे.
थकवा जाणवतो
जर लहान मुल जिममध्ये खूप वेळ व्यायाम करतात त्यावेळी ते अधिक थकतात. त्यांच्या शरिरातील उर्जा कमी होऊ शकते. यामुळे मुलांचे अभ्यास आणि खेळण्यात मन लागत नाही.
शारिरीक विकास मंदावतो
ज्यावेळी लहान मुलं अधिक कसरत करतात त्यावेळी त्यांच्या शरिरातील हार्मोनमध्ये गडबड निर्माण होऊ शकते. याच्या परिणामामुळे मानसिक आणि शारिरीक विकास मंदावलो जातो. (Parenting Tips)
जिममध्ये जाण्यासाठी योग्य वय?
जिममध्ये जाण्याच्या योग्य वयाबद्दल बोलायचे झाल्यास हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली असावी. या वयात मुलांची हाडे आणि स्नायू बळकट झालेली असतात. अशातच व्यायाम केला तरीही मुलांना इजा होऊ शकत नाही. तुमची मुल हेल्दी आणि आनंदी राहावीत असे वाटत असल्यास त्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी पाठवावे.