Home » Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानची मोठी कबुली; भारताच्या दाव्यापेक्षाही पाकचे मोठे नुकसान

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानची मोठी कबुली; भारताच्या दाव्यापेक्षाही पाकचे मोठे नुकसान

by Jyotsna Kulkarni
0 comment
Operation Sindoor
Share

पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांना उध्वस्त करण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत भारताने पीओकेमधील दहशतवादी ठिकाणांचा नायनाट केला. भारताच्या या मोहिमेची संपूर्ण संपूर्ण जगात चर्चा झाली आणि कौतुक देखील झाले. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ नष्ट केली. या सर्व उध्वस्त केलेल्या ठिकाणांची माहिती भारताने या ऑपरेशननंतर संपूर्ण जगाला दिली होती. केवळ दशतवाडी ठिकाणांना टार्गेट करून हा हल्ला भारताने केला होता. (Operation Sindoor)

मात्र आता या ऑपरेशन सिंदुरबद्दल मोठा खुलासा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत भारताने दावा केला त्यापेक्षा अधिक नुकसान पाकिस्तनाचे झाले आहे. या ऑपरेशन सिंदूर दरम्यान नुकसानीचा पाकिस्तानच्या डोजिअरमधून मोठा खुलासा झाला आहे. भारताकडून करण्यात आलेल्या दाव्यापेक्षाही अधिक नुकसान पाकिस्तानचे झाले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये भारताने केवळ आणि केवळ दहशतवादी अड्डे टार्गेट केले होते. मात्र या ऑपरेशननंतर पाकिस्तानी सैन्याने उलट भारतावर हल्ला सुरु केला. (Marathi News)

ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानी सेनाने प्रयत्न केला. परंतु भारतीय सैन्याने हा सर्व प्रयत्न हाणून पाडला. शिवाय पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर दिले. यात पाकिस्तानचे अनेक हवाई तळ उद्ध्वस्त देखील केले गेले. भारताने पाकिस्तानचा एअरबेस आणि सैन्य ठिकाणांवर हल्ला केला. त्यात पाकिस्तानचे प्रचंड नुकसान झाले. (Top Stories)

Operation Sindoor

ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तान अनेकदा जगासमोर खोटे बोलला आहे. जगासमोर त्यांनी कोणतेही नुकसान झाले नसल्याचा मोठा कांगावा केला आणि याउलट पाकिस्ताननेच भारताचे नुकसान केल्याचे सांगितले. परंतु त्यांच्याच कागदपत्रांनी त्यांचे पितळ उघड केले आहे. पाकिस्तानच्या कागदपत्रांमध्ये स्पष्ट दिसून आले आहे की भारताने पाकिस्तनमध्ये आत खोलवर घुसूत त्यांना प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी पाकिस्तानमध्ये २० नव्हे तर २८ ठिकाणी हल्ले केले होते. (Marathi Latest News)

भारतीय लष्कराने घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना हल्ला केलेल्या ठिकाणांचा कोणताही उल्लेख केला नाही. परंतु कागदपत्रांमध्ये ही ठिकाणं देखील उघड झाले आहे. पेशावर, सिंध, झांग, गुजरांवाला, भावलनगर आणि चोरसह अनेक ठिकाणी पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. भारताने पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांना लक्ष्य केले होते. यात नूर खान, रफीकी, मुरीदके, सुकरूर, सियालकोट, पसरूर, चुनियान आणि सरगोधा यासह एकूण ११ हवाई तळांवर प्रत्युत्तर दिले गेले. नुकतेच मॅक्सर टेक्नॉलॉजीजने काही सेटलाइट इमेजेस जगासमोर आणल्या आहेत. या इमेजेसमधून आपल्याला ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या लष्करी तळांना झालेले नुकसान स्पष्ट दिसते. (Todays Marathi Headline)

भारताने बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाच्या प्रशिक्षण केंद्रासह नऊ ठिकाणी कारवाई केली होती. बलूचिस्तान प्रांतात क्वेटा, तुर्बत आणि ग्वादरमध्ये भारताने कारवाई केल्याचे डोजियरमध्ये म्हटले आहे. तसेच खैबर पख्तूनख्वा (केपी) मध्ये पेशावर आणि डेरा इस्माइल खान याला टारगेट केले गेले. गिलगिट- बाल्टिस्तानमधील स्कार्दूमध्येही भारताने कारवाई केल्याचे म्हटले आहे. भारताच्या या ऑपरेशन सिंदूरमध्ये जवळपास १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. पाकिस्तानच्या कागदपत्रांवरून असेही दिसून येते की भारताने कबूल केल्यापेक्षा खूपच खोलवर आणि कठोर हल्ला केला आहे. (Top Marathi Headline)

Operation Sindoor

ऑपरेशन सिंदूर
२२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर आतंकवाद्यांनी मोठा हल्ला चढवला आणि निर्दोष पर्यटकांवर गोळीबार करत त्यांना मारले. यात अनेक भारतीय पर्यटकांनी आपला जीव गमावला. यानंतर ६ आणि ७ मे रोजी भारतीय वायू सेनेने पाकिस्तनमध्ये आणि पीओकेमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. भारताने याच मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव दिले. या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी पायाभूत सुविधांवर अचूक हल्ले केले. (Social Updates)

=======

हे देखील वाचा : Shi Mingze : हार्वर्डमध्ये शिकतेय चीनची उत्तराधिकारी

LIC : 24 तासातच केलेल्या LIC च्या ‘या’ विक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

=======

त्यानंतर पाकिस्तानने ८, ९ आणि १० मे रोजी भारतीय लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सैन्याने पाकिस्तानी हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत विमानतळ, हवाई संरक्षण प्रणाली, कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि रडार साइट्ससह अनेक प्रमुख पाकिस्तानी लष्करी ठिकाणांना उध्वस्त केले. या ओप्रेशनवरून भारताने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे की, भारत कोणत्याही नापाक गोष्टी खपवून घेणार नाही. भारत जशास तसे उत्तर देण्यास कायम सक्षम आहे. (International News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.