भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील सध्याचे वातावऱण कसे आहे, हे सांगण्याची गरज नाही. भारतानं पहलगाव हल्ल्यातील निरपराध नागरिकांच्या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूरची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत होणा-या हल्ल्यांनी पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण असले तरी त्याच्यापासून वेगळा होऊ पाहणा-या बुलचिस्तानमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून पाकिस्तानबरोबर जोडला गेलेला बलुचिस्तान, स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी हजारो बलुच सैनिक पाकिस्तान सैन्यावर हल्ला करत आहेत. हे बलुच सैन्य या युद्धजन्य वातावरणात एका देवीचा आशीर्वाद घेत युद्धासाठी सज्ज झाले आहेत. बलुचिस्तान येथील हिंगलाज माता मंदिरामध्ये सध्या या बलुच सैन्याची गर्दी होत आहे. (Operation Sindoor)
माता भगवतीचे हे मंदिर देवीच्या 51 शक्तीपिठांपैकी एक आहे. या मंदिराला स्थानिक बलुच नानी का हज म्हणतात. मात्र नाव काहीही असो, बलुचिस्तानमधील या शक्तीपिठामध्ये पाकिस्तानमधील हिंदू भाविक मोठ्या संख्येनं जातातच शिवाय या मंदिरात बलुच नागरिकही या हिंगलाज मातेला, वंदन करण्यासाठी या मंदिरात जातात. बलुचिस्तानमधील हे हिंगलाज माता मंदिर सर्वात अवघड अशा जागेवर आहे. ही हिंगलाज मातेची यात्रा सर्वात अवघड यात्रा मानली जाते. (Latest News)
आता याच हिंगलाज मातेचा फोटो शेअर करत बलुच आर्मीनं बलुचिस्तान हा स्वतंत्र देश असल्याचे जाहीर केले आहे. भारतात देवीची 51 शक्तीपिठे आहेत. त्यातील एक महत्त्वाचे शक्तिपिठ देशाच्या फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेले. ते शक्तिपिठ म्हणजे, माता हिंगलाज मंदिर. बलुचिस्तानमध्ये असलेले हे मंदिर समस्त हिंदू धर्मियांसाठी पूजनीय आहे. आता पाकिस्तानपासून वेगळे होऊ पाहणा-या बलुचिस्तानच्या या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. सध्या हा सर्व भाग बलुच आर्मीच्या ताब्यात असून बलुच आर्मीही या हिंगलाज मातेची पूजा करुन पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्याचा आशीर्वाद मागत आहे. (Operation Sindoor)
या मंदिरात स्थानिक मुस्लिम नागरिकही जातात, ते या मंदिराचा उल्लेख नानी का हज असे करतात. 1947 च्या फाळणीत अनेक हिंदू मंदिरे पाकिस्तानात गेली. यामध्ये 51 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या या हिंगलाज माता मंदिराचाही समावेश आहे. हा संपूर्ण प्रदेश आता बलुच आर्मीच्या ताब्यात आहेत. येथेच बुलच आर्मी आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यात वारंवार चकमक होत आहे. याच भागात बलुच आर्मीनं नुकतेच 12 पाकिस्तानी सैन्याच्या गाडी स्फोटानं उडवून दिली आहे. (Latest News)
बलुचिस्तानमधील लासबेला या शहरात हिंगलाज माता मंदिर आहे. या मंदिरात देवीचे सगळे उत्सव साजरे होतात. विशेष म्हणजे, या हिंगलाज माता मंदिरात नवरात्रौस्तव मोठ्या उत्सहानं साजरा होतो. यात पाकिस्तानमधील बहुसंख्य हिंदू भाविक सहभागी होतात. ही हिंगलाज माता जिथे विराजमान झाली आहे, तो भाग पर्वतरांगांचा आहे. या भागात पाकिस्ताननं कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीत. रस्ते, पाणी, वीज अशा सुविधांपासून या भागाला वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हिंगलाज मातेची यात्रा करणा-या भाविकांची मोठी परीक्षाच असते. त्यांना आवश्यक त्या सगळ्या वस्तू सोबत घेऊन 1000 फूट उंचीचा पर्वत चढावा लागतो. (Latest News)
हिंगलाज माता मंदिराकडे जातांना जसा 1000 फूट उंचीचा पर्वत चढावा लागतो, तसेच या मंदिराच्या एका भागात निर्जन वाळवंट पसरले आहे. या मंदिराची वाट सुरु होते, तिथे घनदाट जंगलही आहे. यात अनेक हिंस्त्र पशू असल्याची माहिती आहे. अशा तीन अवघड वाटा पार करत भाविक हिंगलाज मातेच्या चरणी जातात. या सर्व वाटेवर अनेक दशतवाद्यांचे केंद्रही होती. त्यामुळे त्यांचीही भीती या यात्रेकरुन होती. मात्र अलिकडच्या काही काळात या भागात बलुच आर्मीचे वर्चस्व वाढल्यावर या दहशतवाद्यांची भीती कमी झाली आहे. (Operation Sindoor)
=======
हे देखील वाचा : Buddha Purnima : बुद्ध पौर्णिमा
=======
सर्व धोक्यांमुळेच हिंगलाज मंदिरात एकट्याने जाण्यास मनाई आहे. भाविक 30-40 च्या गटानं या मंदिरात जातात. विशेष म्हणजे, हिंगलाज माता मंदिर कराचीपासून सुमारे अडीचशे किलोमीटर अंतरावर आहे. मात्र या मंदिराला जाण्याचा साधा रस्ताही पूर्णपणे बांधण्यात आलेला नाही. मातेच्या मंदिरात जाण्यासाठी 2007 मध्ये चीनने रस्ता बांधला आहे. त्यापूर्वी या मंदिरात जाण्यासाठी सुमारे 200 किमी अंतर पायी चालत जावे लागत असे. हिंदू पौराणिक कथेनुसार, माता सतीचे डोके जिथे पडले होते. सतीच्या शरीराचा पहिला भाग म्हणजेच डोके कीर्तर टेकडीवर पडले, तिथेच देवीचे मंदिर झाले आणि त्याचे नाव हिंगलाज माता मंदिर असे झाले. आता हेच मंदिर बलुचिस्तानमध्ये आहे, आणि बलुच नागरिक या देवीच्या मंदिरासह बलुचिस्तान पाकिस्तानच्या ताब्यातून स्वतंत्र झाल्याची घोषणा करीत आहेत. (Latest News)
सई बने