Office Stress Management Tips आजकाल बहुतांशजण ऑफिसच्या कामामुळे फार त्रस्त असतात. काहीजण ऑफिसचे काम घरी आल्यानंतरही पूर्ण करण्यामध्ये व्यस्त असतात. याचा परिणाम झोपेवर झाल्याचे दिसते. परिवारासोबत वेळही घालवता येत नाही. यामुळेही अधिक तणाव वाढला जातो. हळूहळू तणाव वाढून त्याचे डिप्रेशनमध्ये रुपांतर होते. डब्लूएचओच्या रिपोर्ट्सनुसार, वर्ष 2019 मध्ये कामाकाज करणाऱ्या 15 टक्के व्यक्तींमध्ये मानसिक आजार झाल्याचा अंदाज लावण्यात आला होता. यावरुन कळते की, कामाबद्दल लोक किती तणावाखाली आहेत. अशातच मानसिक तणाव कमी करण्यासाठी आपल्या दिवसाचे रुटीन कसे असावे याबद्दल पुढे जाणून घेऊया.
सकाळचे रुटीन
सकाळी उठण्याची वेळ निश्चित करावी. यासाठी रात्री झोपेचे वेळ ठरवावी. यामुळे सकाळी उठण्यास कोणाताही त्रास होणार नाही. ज्या व्यक्ती सकाळी उठल्यानंतर चहा किंवा कॉफी पिण्याएवजी कोमट गरम पाणी प्यावे. अथवा लिंबाचा रस घालून पाणी प्यावे. याशिवाय सकाळी फोनवर वेळ घालवू नये. यावेळी मेडिटेशन किंवा योगा करावा. हे रुटीन महिनाभर फॉलो केल्यानंतर तुम्हाला शरिरात सकारात्मक बदल झालेले दिसतील.

office stress management
ऑफिसमध्ये कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल?
ऑफिसचा ताण कमी करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट अशी की, कामात आळशीपणा करू नये. हा तणावाचे एक मोठे कारण आहे. ज्या व्यक्ती आजचे काम उद्यावर ढकलतात त्यांचे काम कधीच पूर्ण होत नाही. यामुळेही ताण अधिक वाढला जातो. यामुळे कामाची लिस्ट तयार करुन त्यानुसार ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. ऑफिसमध्ये प्रत्येक तीन तासांमध्ये 15-15 मिनिटांचा ब्रेक घ्या. ब्रिदींग एक्सरसाइज करा. ऑफिसचे काम घरी न आणण्याचा प्रयत्न करा आणि परिवारासोबत वेळ घालवा.
=======================================================================================================हेही वाचा :
Union Budget 2025 : मध्यमवर्गीयांसाठी हा अर्थसंकल्प गेमचेंजर ठरेल का ?
kalpana chawla : आपला मृत्यू होणार हे कल्पना चावला यांना आधीच माहीत होतं!
=======================================================================================================
डाएट कसा असावा?
संतुलित डाएट फॉलो करावे. ऑफिसमध्ये घरचे जेवण जेवावे. लंचव्यतिरिक्त बॅगेत फळ किंवा हेल्दी स्नॅक्स ठेवा. जेणेकरुन कामादरम्यान भूक लागल्यास त्याचे सेवन करावे. यावेळी जंकफूडचे सेवन करणे टाळा. काम करताना पाणी जरुर प्या. यामुळे शरीर हाइड्रेट राहण्यास मदत होईल. बहुतांशवेळा पाहिले जाते की, स्ट्रेस कमी करण्यासाठी काहीजण सतत चहा, कॉफी किंवा स्मोकिंग करतात. यामुळे तणाव कमी होत नाही उलट मानसिक आजारांसह आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवल्या जातात. (Office Stress Management Tips)
तणाव कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
-वॉक जरुर करा. दिवसातून तासभर चालण्यापेक्षा 15-15 मिनिटे चाला.
-ऑफिसमध्ये चिप्स किंवा पाकिटबंद अन्य कोणत्याही फूड्सचे सेवन करणे टाळा.
-चहा किंवा कॉफी अत्याधिक पिणे टाळा.
-शरीर हाइड्रेट राहण्यासाठी ताक किंवा लिंबू पाणी प्या.
-जेवणात सॅलडचे सेवन करा.
-सुट्टीच्या दिवशी सोशल मीडिया किंवा फोनपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
