Home » आता मलेशियाची ओरंगटान डिप्लोमसी

आता मलेशियाची ओरंगटान डिप्लोमसी

by Team Gajawaja
0 comment
Malaysia
Share

जगातील पाम तेल उत्पादक देश आहेत, त्यामध्ये मलेशिया (Malaysia) या देशाचा दुसरा क्रमांक लागतो.  मलेशियाची सर्वच अर्थव्यवस्था या पामतेलाच्या व्यवसायावर अवलंबून आहे.  भारत, चीन आणि युरोपमधील देश या पामतेलाचे प्रमुख खरेदीदार आहेत.  मात्र मलेशियाच्या या पामतेलाच्या निर्यातीमध्ये अलिकडे घट झाली आहे. यामुळे देशाचे बिघडलेले आर्थिक गणित सुधारण्यासाठी मलेशियानं एक अनोखा उपाय शोधला आहे.  मलेशिया आता पाम तेल खरेदी करणाऱ्या देशांना ओरंगुटानभेट देणार आहे. 

ओरंगुटान म्हणजे, वानराची विशिष्ट प्रजाती आहे. ओरंगुटान यांना त्यांच्या मोठ्या आकारमानामुळे आणि मानवासारख्या वैशिष्ट्यांमुळे महान वानर म्हणतात. मलेशियामध्ये ही दुर्मिळ वानराची प्रजाती आढळते. अर्थात तेथेही या ओरंगुटानचे प्रमाण कमी झाले आहे, तरीही मलेशिया या ओरंगुटानला अन्य देशात देण्याचा विचार करत आहे. त्यानिमित्तानं देशातील पाम तेलाचा व्यापार पुन्हा सुधरवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.  

गेल्या काही महिन्यापूर्वी चीननं पांडा डिप्लोमसी राबवली होती. आता तशीच एक डिप्लोमसी मलिशिया (Malaysia) देशानं जाहीर केली आहे.  ही आहे ओरंगुटान डिप्लोमसी. विशिष्ट प्रजातीमधील ही वानरं असून ती मलेशियामध्ये आढळतात. या वानरांचे आयुष्य हे अधिक असते, तसेच ती माणसासारखा व्यवहार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. 

त्यामुळे अनेक देशातील मोठ्या प्राणीसंग्रहालयांमध्ये त्यांना मोठी मागणी आहे.  आता मलेशियानं त्यासाठी पामतेल खरेदी करण्याची ऑफर दिल्यानं काही देशांनी नाराजी व्यक्त केली आहे.  मलेशिया मधून भारत आणि चीन मोठ्या प्रमाणात पामतेल खरेदी करतात.  तसेच युरोपातील देशही पामतेलाची खरेदी करतात. या देशांना ओरंगुटान भेट देण्यात येणार आहे. 

या योजनेला पहिला विरोध केला तो,  WWF म्हणजेच World Wide Fund for Nature ने.  प्राण्यांसाठी काम करणा-या या संघटनेने या योजनेवर आक्षेप घेत, यामुळे ओरंगुटान हे त्यांच्या मुळ अधिवासात रहाणार नाहीत.  नैसर्गिक अधिपासापासून दूर गेल्यानं त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.  ओरंगुटान हे मलेशिया आणि इंडोनेशिया येथील जंगलात आढळतात.  

मात्र जंगलांमधील त्यांचा अधिवासही धोक्यात आला आहे. या देशांमध्ये पाम तेलाच्या व्यापारासाठी पाम वृक्षांची शेती केली जाते.  त्यासाठी जंगलांची मोठी तोड होत आहे.  या सर्वांचा परिणाम ओरंगुटानवर झाला आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफ या जंगलचा माणूसम्हणते.  या संघटनेनुसार वृक्षतोडीमुळे ओरंगुटानची संख्या कमी झाली आहे. बोर्नियो बेटावर 105,000 आणि सुमात्रा येथे काही हजार ओरंगुटान शिल्लक आहे. हे प्रमाण महिन्या महिन्याला कमी होत असल्यामुळे संघटनेनं चिंता व्यक्त केली आहे.  

मलेशियानं (Malaysia) मात्र या सर्वाला विरोध केला आहे. ओरंगुटानच्या संवर्धनासाठी सर्व प्रयत्न चालू असल्याचे मलेशियाच्या मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.  पाम तेल हे उपजिविकेचे प्रमुख साधन असल्यामुळे त्याचे उत्पादन वाढवणे ही काळाची गरज असल्याचेही या देशानं स्पष्ट केले आहे.  पाम तेलाचा वापर चॉकलेट आणि मार्जरीन यांसारख्या खाद्यपदार्थांबरोबरच सौंदर्यप्रसाधने आणि साबणामध्येही मोठ्या प्रमाणात होतो.  त्याची वाढती मागणी पाहून मलेशियानं पामवृक्षांचे बगिचे तयार केले आहेत.(Malaysia)

============

हे देखील वाचा : चमचमत्या दुनियेचा मेट गाला म्हणजे नेमकं काय ?

============

यासाठी काही हेक्टर जंगलभाग तोडला आहे.  याच जंगलात ओरंगुटानचे वास्तव्य असून ते त्यामुळे धोक्यात आले आहे. आशिया खंडात आढळणारे ऑरंगुटान ही दुर्मिळ वानर प्रजाती आहे.  ते सर्व झाडावर राहणाऱ्या प्राण्यांमध्ये आकाराने सर्वात मोठे आहेत.  त्यांचे हात इतर सर्व वानरांपेक्षा लांब आहेत.  विविध प्रकारची साधने वापरण्यात पुढे असतात. रोज रात्री काठ्या आणि पानांनी ते स्वतःसाठी बिछानाही तयार करतात. मानवी अनुकरण करण्यात त्यांचा पुढाकार असतो. ओरंगुटान साधारणपणे ६० वर्षापर्यंत जगतात. त्यांच्या या सर्व वैशिष्ट्यामुळे त्यांना प्राणीसंग्रहालयात मोठी मागणी असते. काही दिवसांपूर्वी इंडोनेशिया मधील प्राणीसंग्रहालयातील ओरंगुटानचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या ओरंगुटानने त्याच्या चेह-याला झालेली जखम स्वतःच झाडपाल लावून बरी केली.  आता मलेशिया याच हुशार ओरंगुटानना त्यांची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी इतर देशांना भेट म्हणून देणार आहे.  

सई बने..

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.