कंगना रनौत प्रकरणावर मी नाराज नसून त्याच्याशी माझं काही देणंघेणं नसल्याची प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कंगना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलेला पाहायला मिळत आहे. यावर राज्यपाल कोश्यारी नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कॉफीटेबल बुकचं आज दुपारी 4 वाजता प्रकाशन झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांना राज्यातील अनेक विषयांना हात घातला.
ज्यांना नाव पाठवायचं आहे ते नाव पाठवत नाही आणि राज्यपालांना शिव्या देणार हे बरोबर नाही, असे म्हणत राज्यपाल नियुक्त आमदारांवरुन कोश्यारी यांनी सरकारला टोला लगावला. एक वर्ष राहिलो तर चांगलं मराठीत भाषण करु शकेन. जेव्हा मला कळलं मला महाराष्ट्रातच राज्यपाल व्हायचं आहे, तेव्हा विश्वास वाटत नव्हता. इथे आल्यावर राज्यात मुसळधार पाऊस होता. त्यानंतर अतिवृष्टी झाली. निवडणूक झाली, युती झाली व त्यांचे सरकार आले नाही. राज्यात आधी दुष्काळ, मग अतिवृष्टी मग राजकीय पाऊस आला. मात्र, तरीही सर्वांचा स्नेह मिळाला असल्याचे कोश्यारी यांनी सांगितले.
54
previous post